ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
hair mask

निरोगी केसांसाठी करा घरगुती हेअर मास्कचा उपयोग

रोजच्या धावपळीत आपण आपली काळजी घ्यायला मात्र विसरतो. आपल्या शरीरासह आपण आपल्या केसांचेही योग्य पोषण आणि काळजी घ्यायला हवी. पण आपल्याजवळ इतका वेळ आहे का? असा प्रश्नही आपल्याला पडतो. आपल्याला ना आपल्या शरीराची ना आपल्या केसाची काळजी घ्यायला तितकासा वेळ आहे. कारण आपला वेळ कामामध्येच इतका निघून जातो की स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. त्यामुळे केसांचे अधिक प्रमाणात नुकसान होते. यामुळे केसांमध्ये कोंडा होणे, केसगळती, केसांचे तुटणे, केस कोरडे होणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तुमच्या केसांमध्ये कमी पोषण असले की अशी समस्या निर्माण होते. तुमच्याजवळ वेळही कमी असेल आणि तुम्हाला बाजारातील महाग केमिकलयुक्त उत्पादनांचाही वापर करायचा नसेल आणि त्याशिवाय केसांची काळजी घ्यायचीही असेल तर त्यासाठी तुम्ही 2 हेअरमास्कचा वापर करू शकता. आम्ही तुम्हाला हे सोपे हेअर मास्क सांगत आहोत. तुम्हीही याचा उपयोग करून पाहा आणि निरोगी केसांसाठी फायदा मिळवा. 

केळं आणि अंड्याचा हेअर मास्क (Banana and Egg Hair Mask)

साहित्य 

  • 1 केळे 
  • अंड्याचा एक सफेद भाग 

बनविण्याची पद्धत 

  • केळे ब्लेंडरमध्ये मॅश करून त्याची पेस्ट तयार करून घ्या 
  • अंड्याचा सफेद भाग याच्यामध्ये मिक्स करा आणि व्यवस्थित मिक्स होईपर्यंत ब्लेंड करा 
  • हे मिश्रण तुम्ही केसांना आणि स्काल्पला लावा 
  • साधारण 1-2 तास तसंच ठेवा 
  • अधिक चांगल्या आणि योग्य परिणामांसाठी हे तुम्ही रात्रभर ठेऊ शकता 
  • त्यानंतर नेहमीच्या पद्धतीने केस धुवा. केमिकलयुक्त शँपू वापरू नका आणि माईल्ड शँपूचा उपयोग करा 
  • त्यानंतर केस कंडिशन करणे आणि मॉईस्चराईज करणे विसरू नका 

फायदे 

ADVERTISEMENT
  • अंड्यातील सफेद प्रोटीन एक समृद्ध स्रोत आहे. हे स्काल्पमधील अतिरिक्त केल स्वच्छ करण्यासाठी मदत करते आणि केसांना मजबूती प्रदान करते. तसंच केसांचा विकास करण्यासाठी आणि केसांमधील कोंडा घालविण्यासाठी याचा उपयोग होतो. केसांच्या वाढीसाठी आणि पोषणासाठी उत्तम आहे अंड्याचा हेअरमास्क
  • केळ्यातील पोटॅशियम, विटामिन आणि नैसर्गिक तेल केसांमध्ये मऊपणा आणि चमकदारपणा आणण्यासाठी उपयोग ठरतो

कोरफड हेअर मास्क (Aloe Vera Hair Mask)

साहित्य 

  • कोरफड जेल एक कप
  • नारळाचे तेल 2-3 मोठे चमचे

बनविण्याची पद्धत 

  • एक कप कोरफड जेल घ्या. नैसर्गिक कोरफड जेलचा वापर करा
  • नारळाचे तेल 2-3 मोठे चमचे घ्या आणि त्यात कोरफड जेल व्यवस्थित मिक्स करा 
  • हे तुमच्या केसांना आणि स्काल्पला लावा आणि साधारण 1-2 तास तसंच ठेवा 
  • त्यानंतर नियमितप्रमाणे तुमचे केस धुवा आणि केमिकलयुक्त शँपूचा वापर अजिबात करू नका

फायदे 

  • कोरफड जेलमध्ये अनेक मिनरल्स असतात जे तुमच्या केसांना मजबूती प्रदान करतात आणि तेलकट केस असतील अथवा खाज येणारे स्काल्प असेल तर नियंत्रणात आणण्यासाठी याची मदत मिळते. केसांची वाढ होण्यास मदत मिळते. तसंच घनदाट केसांसाठीही कोरफड जेलचा फायदा होतो.
  • केस निरोगी राखण्यासाठी नारळाच्या तेलाचा वापर होतो आणि केसांना अधिक मऊ आणि मुलायम बनवून यातील कोरडेपणा कमी करण्यास मदत करते आणि केस तुटत असतील तर याचा फायदा मिळतो 

या दोन्ही हेअरमास्कचा उपयोग करणे अत्यंत सोपे आहे आणि याचा नियमित वापर केसांना निरोगी राखण्यास मदत करतो. घरच्या घरी तुम्ही नक्कीच याचा योग्य उपयोग करून घेऊ शकता. उपयोग केल्यानंतर याचा कसा फायदा झाला हे आम्हाला नक्की कळवा. हे दोन्ही हेअरमास्क नैसर्गिक आहेत. मात्र तरीही तुम्ही याचा वापर करण्यापूर्वी एकदा पॅच टेस्ट नक्की करून घ्या. 

ADVERTISEMENT

अधिक वाचा – आयुर्वेदिक पद्धतीने घ्या केसांची काळजी

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

13 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT