ADVERTISEMENT
home / आरोग्य
benefits-of-eating-garam-masala-in-winter

थंडीत गरम मसाला खाण्याचे आहे हे 5 फायदे

थंडी मुंबईत तशी तर जास्त नसते. पण साधारण नोव्हेंबरपासून गारवा सुरू होतो. हिवाळ्यात साधारण आपल्या शरीराला उष्णता मिळेल असे डाएट आपण आपल्या आहारात समाविष्ट करतो. त्यामुळे तुम्ही थंडीमध्ये गरम मसाल्याचे पदार्थ अथवा गरम मसाला आपल्या आहारामध्ये समाविष्ट करून घ्यायला हवा. थंडीच्या दिवसात गरम मसाला हा आपल्या शरीरासाठी नक्कीच उत्तम ठरतो. तुम्हाला गरम मसाल्याचा गंध आवडत नाही का? अथवा त्याचा वापर कसा करावा हे जर माहीत नसेल तर तुम्ही घरच्या घरी गरम मसाला पावडर कशी तयार करायची हेदेखील जाणून घ्या. भारतीय स्वयंपाकघरात सर्वाधिक वापरण्यात येणारा मसाला म्हणजे गरम मसाला. साधारणतः लवंग, दालचिनी, जिरे, वेलची, तमालपत्र आणि काळी मिरी याचे मिश्रण या मसाल्यामध्ये असते. मसाल्याचा वापर आपण वेगवेगळ्या पदार्थांमध्ये करून त्याचा स्वाद वाढवू शकतो. पण तुम्हाला माहीत आहे का पदार्थांचा स्वाद वाढविण्याशिवाय इतरही अनेक फायदे आहेत. मसाल्यामध्ये अनेक मिनरल्स असून आपल्या आरोग्यासाठी मसाला फायदेशीर ठरतात. पण त्याचा काय फायदा आहे हे पाहण्याआधी आपण गरम मसाला कसा घरी करावा हे जाणून घ्या. 

अधिक वाचा – घरीच बनवा मॅगी मसाला, या सोप्या टिप्स करा फॉलो

गरम मसाला घरी कसा बनवावा?

तसं तर गरम मसाला बाजारामध्ये मिळतोच. पण रेडीमेड मसाला प्रत्येकाला आवडतोच असं नाही. त्यामुळे काही जण गरम मसाला घरीच तयार करतात. तुम्हारा घरी मसाला तयार करायचा असेल तर जाणून घ्या रेसिपी. 

साहित्य 

ADVERTISEMENT
  • 5-6 मोठी वेलची 
  • 6 हिरवी वेलची 
  • जायपत्री 4
  • काळी मिरी पाव चमचा 
  • दालचिनी 5 स्टिक 
  • जिरे 1 चमचा 
  • तमालपत्र 6 

तुम्हाला बडिशेप जायफळ अशा पदार्थांचाही वापर तुम्ही यामध्ये करू शकता

बनविण्याची पद्धत 

  • एका पॅनमध्ये सर्व मसाले घाला आणि त्याचा सुगंध येईपर्यंत तुम्ही भाजा
  • भाजल्यानंतर मसाले थंड होऊ द्या 
  • मसाल्याचे मिश्रण तुम्ही ब्लेंडरमध्ये टाका आणि पावडर तयार करून घ्या
  • एका एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करा आणि मसाल्याचा उपयोग करा

गरम मसाला आपल्या डाएटमध्ये कसा समाविष्ट करावा 

गरम मसाला एक मसाला असा पदार्थ आहे जो शाकाहारी अथवा मांसाहारी कोणत्याही पदार्थांमध्ये वापरता येतो. इतकंच नाही भाजीचा स्वाददेखील अधिक वाढतो. थंडीत गरम मसाला खाण्याचे काय फायदे आहेत ते आपण जाणून घेऊया. 

अधिक वाचा – किचनमध्ये मसाल्याचा डबा असायला हवा असा

थंडीत गरम मसाला खाण्याचे फायदे 

शरीर ठेवते फिट 

फिटनेस तुम्हाला राखायचा असेल तर तुम्हाला अधिकतम लोक हे नियमित व्यायाम करताना दिसतात. पण थंडीच्या दिवसात आपला दिनक्रम बिघडण्याचीही शक्यता असते. अशावेळी तुम्ही तुमच्या भाजी अथवा अन्य पदार्थांमध्ये गरम मसाला घाला. गरम मसाल्यामध्ये विटामिन्स, अँटिऑक्सिडंट्स, फॅटी अॅसिड आणि नैसर्गिक तेलासारखे विभिन्न घटक असतात. हे शरीराला हेल्दी आणि फिट ठेवण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. 

ADVERTISEMENT

ओरल हेल्थसाठी चांगले

लोक नेहमी श्वासाचा दुर्गंध आणि अन्य ओरल आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त असल्याची तक्रार करतात. तुम्ही गरम मसाल्याच्या वापराने ही समस्या नक्कीच घालवू शकता. एक चमचा गरम मसाला तुम्ही वापरून श्वासाचा दुर्गंध आणि दाताची समस्या दूर करू शकता. यामध्ये ओमेगा 6 आणि कॅल्शियम बॅक्टेरिया दूर ठेवण्यास मदत करतो. 

मेटाबॉलिक रेट वाढविण्यासाठी उपयुक्त 

गरम मसाला हे वेगवेगळ्या मसाल्यांचे कॉम्बिनेशन असून याचा अद्भुत लाभ होतोय. यातील फायटोन्यूट्रिएंट्सने समृद्ध आहे जे शरीराला मेटाबॉलिक रेट वाढविण्यास मदत करतो. हा मसाला वजन कमी करण्याचा प्रयत्न करण्यासाठीदेखील चांगला असतो. हाय मेटाबॉलिकचा अर्थ आहे की, शरीरातील अधिक कॅलरीज हा जाळतो. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीचा मेटाबॉलिक रेट अधिक असल्यास आणि अधिक कॅलरीचे सेवन केल्यास, त्याचे वजन वाढणार नाही. गरम मसाला आपल्या डाएटमध्ये समाविष्ट करून घ्या आणि तुम्ही तुमची कॅलरी बर्न करू शकाल. 

अधिक वाचा – वजन कमी करण्यासाठी आहारातून घ्या हे गरम मसाले

पचनतंत्रात आणते सुधारणा 

आपल्या भोजनाची तयारी करताना गरम मसाल्याचा समाविष्ट करून घेण्याचा फायदा म्हणजे तुमच्या पचनतंत्रामध्ये सुधारणा आणण्यास मदत करते. या मसाल्यामध्ये गॅस्ट्रिक ज्युस मोकळा करण्यासाठी मदत करण्याची क्षमता आहे. याशिवाय मलत्याग करण्यासाठी याचा फायदा होतो आणि पचनसंबंधित समस्या उदा. अॅसिडिटी, सूज, अपचन रोखण्यासाठी याचा फायदा होतो. 

ADVERTISEMENT

हृदयासाठी आहे अप्रतिम

तुम्हाला आपले हृदय चांगले ठेवण्यासाठी जर कोणता पदार्थ हवा असेल तर तुम्ही गरम मसाल्याचादेखील वापर करू शकता. गरम मसाल्यामध्ये असणारी वेलची ही हृदयासाठी अप्रतिम ठरते. या मसाल्याचा आपल्या डाएटमध्ये उपयोग करून घेऊन तुम्ही तुमच्या शरीरातील रक्तदाबाची पातळी नियंत्रित करण्यासाठीही उपयोग करू शकता. तसंच यामुळे हृदयात सुधारणा आणण्यास मदत मिळते. 

गरम मसाल्याचे अनेक फायदे आहेत. पण याचे सेवन अधिक करणेदेखील योग्य नाही. कारण यामुळे आरोग्याच्या समस्याही निर्माण होऊ शकतात. तसंच तुम्हाला कोणत्याही प्रकारची अलर्जी नाही ना याची खात्री करूनच याचे सेवन करावे. 

08 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT