ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
amla powder use

केसांसाठी आवळा पावडर वापरण्याच्या 5 पद्धती, केस होतील घनदाट

आपल्याला नेहमीच केसांसाठी आवळा हा फायदेशीर ठरतो हे लहानपणापासून सांगण्यात आलेले असते. तसेच आवळा पावडरचाही फायदा होतो. तर काही जणांनी याचा लहानपणीपासून उपयोगही केला असतो. पण आवळा नक्की आपल्या केसांवर कसा परिणाम करतो त्याप्रमाणे केस घनदाट होतील की नाही ते पाहावे लागते. आवळ्यामध्ये जास्त प्रमाणात विटामिन सी असते आणि यामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट्सदेखील असतात. म्हणूच केसांची वाढ होण्यासाठी आणि केस घनदाट होण्यासाठी नियमित आवळा पावडरचा (Amla Powder) उपयोग करावा असेही सांगण्यात येते. तसंच काही आयुर्वेदिक डॉक्टरांच्या मते हेअर फॉलिकल्सच्या (hair follicles) आत जाऊन आवळा पोषण देते आणि केसांना अधिक मुलायम बनविण्यासाठी याची मदत मिळते. 

आवळा पावडरचा केसांवर होणार परिणाम – 

आवळा पावडरचा केसांवर चांगलाच परिणाम होतो. अनेक तपासांमधूनही हे सिद्ध झाले आहे. याचा नक्की काय परिणाम होतो जाणून घ्या – 

  • आवळ्याच्या मदतीने केसांना मजबूती देण्यास फायदा होतो 
  • आवळ्यामुळे केसांची वाढही चांगली होते
  • आवळ्यामध्ये असणारे लोह हे स्काल्प निरोगी राखण्यास मदत करते 
  • आवळा अन्य नैसर्गिक वनस्पतींसह मिक्स करून केसांना लावल्यास, केस मजूबत होण्यास मदत मिळते 
  • यातील विटामिन सी हे तुमच्या कोरड्या आणि निस्तेज केसांना अधिक मऊ, मुलायम आणि चमकदार बनविण्यास मदत करते 
  • आवळा पावडरचा उपयोग करून थांबवा केसगळती

कसा करावा 5 पद्धतीने आवळा पावडरचा वापर 

आवळा पावडर केसांसाठी चांगली आहे हे सर्वांनाच माहीत आहे. पण त्याचा कसा वापर करावा हे जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. तुमच्याजवळ जास्त वेळ नसेल तर तुम्ही अशा प्रकारे त्याचा उपयोग करून घेऊ शकता.

1. आवळा हेअर ऑईल (Amla Hair Oil)

3 मोठे चमचे ऑलिव्ह ऑईल, 1 मोठा चमचा आवळा पावडर, 8-10 कडिपत्याची पाने मिक्स करून गॅसवर गरम करा आणि त्याला उकळी येऊ द्या. त्यानंतर उकळलेले तेल गाळून घ्या. तेल कोमट झाल्यानंतर तुम्ही केसांना लावा. तुम्ही रात्रभर हे तसंच केसांना लाऊन ठेवा. अधिक परिणामासाठी तुम्ही हे रात्रभर ठेऊ शकता. नको असेल तर किमान आंघोळीच्या एक तास आधी तुम्ही लावा आणि मग केस धुवा. 

ADVERTISEMENT

2. मेंदीमध्ये मिक्स करा आवळा पावडर (Amala powder with Mehndi)

mehndi mix

तुम्ही जर केसांना नियमित मेंदी लावत असाल तर तुम्ही मेंदी लावताना त्यामध्ये एक चमचा आवळा पावडर मिक्स करा. यामुळे तुमच्या केसांना अधिक पोषण आणि मॉईस्चराईजर मिळते. तसंच हे लावताना केवळ एक गोष्ट लक्षात ठेवा की, मेंदी आणि आवळा पावडरचे हे मिश्रण तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसात लावा. जेणेकरून केस थंड राहतील. थंडीच्या दिवसात याने त्रास होऊ शकतो. 

3. आवळा आणि अन्य वनस्पती (Amla powder and herbs)

आवळा पावडरही तुम्ही शिकाकाई, रीठा आणि भृंगराज पावडरचाही वापर करून घेऊ शकता. तुम्ही हे मिश्रण एकत्र करून केसांना लावा. आवळा, शिकाकाई, रीठा आणि भृंगराज सर्व 1-1 चमचा घ्या आणि कोमट पाण्यात भिजवा आणि थोडा वेळ भिजत ठेवा. त्यानंतर ही पेस्ट केसांना लावा आणि मग काही वेळानंतर केस धुवा. केसांना अधिक मुलायमपणा मिळतो. 

4. आवळा हेअर मास्क (Amla hair mask)

आवळा पावडर आणि अंड्याचा हेअर मास्क बनवला जातो. यासाठी तुम्ही 2 अंड्याचा सफेद भाग फेटून घ्या आणि त्यात आवळा पाडवर मिक्स करा. हे मिश्रण केसांना लावा. हा मास्क साधारण अर्धा तास केसांवर तसाच राहू द्या आणि मग थंड पाण्याने केस धुवा. हा हेअर मास्क प्रोटीनयुक्त असून केसांना अत्यंत मऊ, मुलायम आणि चमकदार ठेवण्यास मदत करतो. 

5. पाण्यासह आवळा पावडर (Amla powder with water)

तुमच्याजवळ अजिबातच वरच्या सर्व गोष्टी करण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही आवळा पावडरमध्ये केवळ पाणी मिक्स करून पेस्ट बनवा आणि ती केसांना लावा. काही वेळ ठेऊन नंतर माईल्ड शँपूने केस धुवा. 

ADVERTISEMENT

या सर्व टिप्स केसांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. पण ज्यांना आवळा पावडरची अलर्जी आहे अथवा इन्फेक्शन आहे त्यांनी वापरू नये. आवळा पावडर वापरण्याआधी पॅच टेस्ट करा अथवा आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

05 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT