ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
summer hair styles

उन्हाळ्यात तुमची उष्णता कमी करण्यासाठी 5 हेअर ट्रेंड्स

एखाद्या लूकसाठी हेअरस्टाईल निवडताना आपल्याला जसे आपण कुठले कपडे घालणार आहोत हे लक्षात घ्यावे लागते तसेच आपण जिथे ती हेअरस्टाईल करून जाणार आहोत तिथले वातावरण कसे आहे हा विचार देखील करावा लागतो. जेव्हा उन्हाळा येतो तेव्हा हेअरस्टाईल अधिक महत्त्वाची बनते, कारण या ऋतूमध्ये तुम्हाला अशी केशरचना करावी लागते जी केवळ दिसायलाच छान नसेल तर तुम्ही ती खूप लवकर आणि कोणत्याही त्रासाशिवाय करू शकता. त्याच वेळी, त्या हेअरस्टाइलमुळे तुम्हाला गरम होणार नाही याचीही काळजी घ्यावी लागते. कारण उन्हाळ्यात आपल्या त्वचेवर उष्णतेचा प्रभाव जसा होतो, त्याचप्रमाणे उष्णतेमुळे तुमचे केस आणि टाळू देखील खराब होऊ शकतात. तुम्हीही उन्हाळ्यात सोप्या आणि उष्णता कमी करणाऱ्या हेअरस्टाइल शोधत असाल तर पुढे वाचा. 

फिशटेल वेणी

सर्वसाधारणपणे आपल्याला असे वाटते की फिशटेल वेणी घालणे खूप कठीण आहे. कारण ही वेणी दिसायला थोडी किचकट दिसते पण सुंदर दिसते. लक्षात घ्या ही वेणी सर्वात सोपी आहे. उन्हाळ्यात तुम्ही फिशटेल वेणी अनेक प्रकारे घालू शकता. उदाहरणार्थ, मध्यभागी भांग पाडून केसांचे दोन भाग करा आणि दोन्ही बाजूंनी फिशटेल वेणी घालू शकता किंवा साधी एक फिशटेल वेणी देखील घालू शकता. याशिवाय तुम्ही समोरच्या केसांच्या मदतीने फिशटेल वेणी घालून त्याला हेडबँड लुक देऊ शकता. अशा प्रकारे, ही वेणी तुम्ही तुमच्या हेअरस्टाईलमध्ये अनेक प्रकारे घालू शकता. वेणी घातल्याने उन्हाळ्यात केस बांधलेले राहतात आणि गर्मी कमी होते. 

Hairstyles To Beat The Heat
Hairstyles To Beat The Heat

हाय पोनीटेल

उन्हाळ्यात काही स्त्रियांना उष्णतेमुळे व उन्हामुळे मायग्रेनचा त्रास होतो. तुम्हालाही जर मायग्रेन किंवा डोकेदुखीचा त्रास असेल तर तुम्ही ही हेअरस्टाईल करू नका. पण जर तुम्हाला डोकेदुखीचा कुठलाही त्रास नसेल तर तुम्ही हाय पोनीटेल नक्कीच घालू शकता. ही केशरचना जितकी साधी आहे तितकीच ती स्टायलिश आहे. फक्त केस चांगले विंचरा आणि ते पूर्ण मागे घ्या व नंतर हेअर टायच्या मदतीने पोनीटेल बांधून टाका. तुम्ही हाय पोनीटेल बनवत असल्याने पोनीटेल किंचित वर बांधा. यात देखील सगळे केस बांधले असल्याने मानेला घाम येत नाही व गर्मी कमी होते. 

Hairstyles To Beat The Heat
Hairstyles To Beat The Heat

हाफ बन लूक 

हा लूक खास तरुण मुलींना छान दिसतो. यासाठी, केस विंचरून क्राऊनच्या भागाच्या केसांच्या मदतीने टॉप बन किंवा छोटा अंबाडा घाला.  ही एक अतिशय साधी केशरचना आहे आणि जर तुम्हाला मोकळ्या केसांचा लूक आवडत असेल तर तुम्ही सहज ही हेअरस्टाईल ट्राय करू शकता.

ADVERTISEMENT
Hairstyles To Beat The Heat
Hairstyles To Beat The Heat

टॉप नॉट बन 

जेव्हा उन्हाळ्यात सोप्या केशरचनांचा विचार केला जातो, तेव्हा या हेअरस्टाइलचा यादीत समावेश करणे आवश्यक आहे. ही अशी केशरचना आहे जी काही सेकंदात बनवता येते आणि दिसायला खूप छान दिसते. यासाठी, फक्त सर्व केस वर घेऊन वरच्या बाजूला एक अंबाडा घाला व हेअर टायच्या मदतीने बांधून घ्या.

Hairstyles To Beat The Heat
Hairstyles To Beat The Heat

सिल्क स्कार्फ ऍक्सेसरी म्हणून वापरा

ही अशी केशरचना आहे जी उन्हाळ्यासाठी योग्य आहे. यासाठी तुम्ही केसांची पोनीटेल बनवा किंवा बन लूक करा. यानंतर त्यावर सिल्कचा स्कार्फ गुंडाळा. याने तुम्हाला एकदम कूल स्टायलिश लूक मिळेल. 

उन्हाळ्यात या हेअरस्टाईल करून आपण उष्णता तर कमी करू शकतो पण उन्हाळ्यात केस टाळूची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. उन्हाळ्यात उष्णता व घामामुळे केस व टाळू चिकट आणि तेलकट होते. त्यामुळे कोंडा होण्याचा धोका वाढतो. कोंडा कमी होण्यासाठी बाजारात अनेक अँटी डँड्रफ शॅम्पू मिळतात. पण नैसर्गिक घटकांनी युक्त आणि रसायनमुक्त उत्पादने वापरणे केव्हाही आपल्या केसांसाठी फायदेशीर असते. ऑरगॅनिक हार्वेस्टचा ऑरगॅनिक अँटी डँड्रफ शॅम्पू हा टी ट्री ऑइल व ऍपल सायडर व्हिनेगरने युक्त आहे. हा हळुवारपणे कोंडा दूर करतो व केस मऊ ,निरोगी व चमकदार बनवतो. याबरोबरच ऑरगॅनिक हार्वेस्टचे अँटी डँड्रफ कंडिशनर देखील वापरा. यामुळे तुमचे केस तजेलदार व चमकदार होतील. 

हानिकारक रसायनांनी युक्त उत्पादने वापरण्यापेक्षा ऑरगॅनिक उत्पादने वापरणे शहाणपणाचे आहे. 

ADVERTISEMENT

Photo Credit – pinterest, istockphoto

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

25 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT