ADVERTISEMENT
home / मनोरंजन
actor-nikkhhil-chavaan-awarded-by-chatrapati-sambhaji-maharaj-gaurav-puraskar-2022in-marathi

अभिनेता निखिल चव्हाणच्या शिरपेचात मानाचा तुरा

मालिका, चित्रपटातील वेधक आणि मुख्य भूमिकांमधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला चार्मिंग चेहरा म्हणजे निखिल चव्हाण (Nikkhhil Chavaan) होय. अल्पावधीतच लोकप्रियता मिळवलेल्या निखिलचा नाटक, मालिका, चित्रपट, वेबीसिरीज असा वाढतच जाणारा अभिनयकौशल्याचा आलेख वाखाणण्याजोगा आहे. कुठल्याही कलाकाराचा प्रवास साधा सरळ सोपा असा कधीच नसतो. तसेच आजवर निखिललासुद्धा अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागलं. त्याची धडपड, शिकण्याची उर्मीच त्याला आज कामी आली असे म्हणणे वावगे ठरणार नाही. कारण संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) यांच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा मानाचा राज्यस्तरीय “छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार 2022” (Chatrapati Sambhaji Maharaj Gaurav Puraskar 2022)  सिनेक्षेत्रातील योगदानाबद्दल सिनेअभिनेता निखिल चव्हाणला जाहीर करण्यात आला आहे. 

सिनेक्षेत्रातील योगदानाबद्दल निखिलने मारली बाजी

छत्रपती संभाजी महाराजांचा जयंती सोहळ्यानिमित्त 14 मे 2022 ला पुरंदर किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमात युवराज शहाजीराजे संभाजीराजे भोसले ,सुप्रिया सुळे, महाराष्ट्र राज्यमंत्री विश्वजित कदम, रोहित पवार, संजय जगताप, प्रवीणदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या शुभहस्ते या पुरस्काराने निखिलला सन्मानित करण्यात आले. विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. आजवर सिनेक्षेत्रात या पुरस्काराचे मानकरी दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule), अभिनेता अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe), अभिनेता भरत जाधव (Bharat Jadhav), अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Choudhary), अभिनेता अशोक समर्थ (Ashok Samrth) हे ठरले होते, यंदा या मानकरांच्या यादीत अभिनेता निखिल चव्हाणने मानाचा तुरा रोवला आहे. 

निखिलने व्यक्त केले मनोगत 

याबाबत बोलताना निखिल असे म्हणाला की, “अभिनयक्षेत्रात आजवर केलेल्या कामगिरीची यापेक्षा चांगली पोचपावती असूच शकत नाही, कारण “छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार 2022” हा यंदाचा राज्यस्तरीय पुरस्काराचा मानकरी मी ठरलो, आणि हा पुरस्कार मला छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मस्थळी म्हणजेच पुरंदर किल्ल्यावर मिळाला आहे, आणि किल्ल्यावर पुरस्कार मिळणे ही फार मोठी गोष्ट आहे, कारण महाराजांचे किल्ले आपल्यासाठी आदरणीय आहेत असे मला वाटते, अजून एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटतेय ती म्हणजे, हा गडकिल्ला इंडियन डिफेन्सच्या हातात आहे, त्या गडकिल्ल्यावर हा पुरस्कार मला मिळाला ही नक्कीच माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. खरंच भरून पावलो. दिग्गज सिनेअभिनेते या पुरस्काराचे याआधी मानकरी ठरले आहेत मी माझी बरोबरी अर्थात त्यांच्याबरोबर नाही करू शकत मात्र त्यांच्या बरोबरीने मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी कायमच लक्षणीय असेल. माझे कुटुंब, माझे चाहते आणि संबंध जनतेचा मी कायम ऋणी असें कारण आज त्यांच्यामुळे मी आहे असे मला वाटते. या पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल मी संबंध मान्यवरांचा आभारी आहे.” निखिलने अतिशय मनापासून या पुरस्काबद्दल आपले मनोगत व्यक्त केले आहे. तसंच या पुरस्काराने अत्यंत भारावल्याचेही निखिलने सांगितले आहे. 

कोणत्याही कलाकाराला अशा पुरस्काराने सन्मानित होण्याचा मान मिळतो हे त्या कलाकारासाठी नक्कीच भारावल्यासारखे असते हे वेगळं सांगायला नको. यामुळे निखिलला पुढील कामासाठी नक्कीच नवा हुरूप आला असेल आणि आता अधिक जोमाने निखिलचे काम प्रेक्षकांना पाहायला मिळेल अशीच आता त्याचे चाहते अपेक्षा करत आहेत. 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

16 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT