मराठी कलाकारांनी भरलेली अशी हिंदी वेबसीरिज ‘सिटी ऑफ ड्रिम्स’ चांगलीच गाजली. प्रिया बापट, सिद्धार्थ चांदेकर आणि अतुल कुलकर्णी यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सीझन चांगलाच गाजला. आता दुसऱ्या सीझनच्या तयारीत सगळे असताना या सीरिजमधील वेगवेगळ्या गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. मेकर्सकडून नव्या सीझनचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. त्यामुळे या नव्या सीझनची उत्सुकताही चांगलीच वाढली आहे. पण प्रत्येक नवा सीझन हा ट्विस्ट घेऊन येतो. अगदी तसाच या नव्या सीझनमध्येही एक ट्विस्ट आला आहे. सिटी ऑफ ड्रिम्सचा दुसरा भाग आला असून त्यामध्ये हा मराठी चेहरा दिसून आला आहे. हा चेहरा अन्य कोणी नसून आदिनाथ कोठारे आहे.
पसंतीस उतरतोय नवा सीझन
दुसरा सीझन आलेला आहे. खूप दिवसापासून या दुसऱ्या सीझनची सगळ्यांनाच प्रतिक्षा होती. आता हा सीझन आलेला आहे. हा सीझनही खूप जणांना आवडलेला आहे. तुम्ही अजून याचे कोणतेही एपिसोड पाहिलेले नसतील तर या सीझनमध्ये तुम्हाला आदिनाथ कोठारे दिसणार आहे. महेश कोठारेने यामध्ये एका सामाजिक नेत्याची भूमिका बजावली आहे. त्याच्या या भूमिकेविषयी त्याने या आधी काहीही सांगितले नव्हते. त्यामुळे त्याला या सीरिजमध्ये पाहून खूप जणांना सुखद धक्का बसला होता. या भूमिकेविषयी त्याला ज्यावेळी विचारण्यात आले त्यावेळी त्याने सांगितले की, सिटी ऑफ ड्रीम्समधील महेश आरवलेची व्यक्तिरेखा प्रेक्षकांसाठी एक गुपित होते. हे गुपित प्रेक्षकांना आवडत आहे. याचा आनंद नक्कीच आहे. अनेकांचे अभिनंदनाचे फोन, मॅसेजेस येत असून सोशल मिडीयावर त्याचे कौतुक होत आहे. प्रेक्षकांच्या आणि सगळ्यांच्या या प्रेमाबद्दल मी खूप आभारी आहे. प्रेक्षकांच्या या प्रेमामुळे एक प्रकारची ऊर्जा मिळते तसेच अजून उत्तम काम करण्याचा हुरूप येतो.
आदिनाथचा अभिनय सगळ्यांनाच आवडला
आदिनाथचा अभिनय पाहून सगळ्यांनाच आनंद झाला आहे. आदिनाथने यामध्ये महेश आरवलेची भूमिका साकारली आहे. तो एक सामाजिक नेता दाखवण्यात आला आहे. आदिनाथला अशा लुकमध्ये पाहून तुम्हालाही नक्कीच आनंद होईल. हिंदीतील या सीरिजमध्ये जास्ती जास्त वाटा हा मराठी कलाकारांचा असल्यामुळे खूप जणांना ही सीरिज चांगलीच भावलेली आहे. त्यामुळे ही मालिका नक्कीच बघावी अशी आहे.
राजकारणावर आधारीत सीरिज
राजकारणावर आधारीत अशी ही सीरिज आहे. सत्तेसाठी धडपडणारे एक कुटुंब आणि कुटुंबातील राजकारण यामध्ये दाखवण्यात आले आहे. सत्तेचा मोह कोणालाच आवरत नाही. सत्ता हवी असेल तर त्या मार्गात येणाऱ्या अगदी सख्ख्या लोकांनाही कधीकधी मार्गातून बाहेर काढावे लागते. अशीच स्टोरी लाईन असलेली ही सीरिज आहे.या सीरिजमध्ये सगळ्यांच्याच भूमिका वाखाणण्यासारख्या होत्या.
आदिनाथचे अनेक प्रोजेक्ट प्रतिक्षेत
आदिनाथ आपल्याला ‘८३’, ‘पाणी’, ‘पंचक’ यांसारख्या आगामी चित्रपटांमधून दिसणार आहे. ‘८३’ हा १९८३ च्या वर्ल्डकपवर आधारित चित्रपट आहे. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंग, दिपीका पदुकोण यांचासोबत आदिनाथही झळकणार आहे. माधुरी दीक्षित निर्मिती ‘पंचक’ या चित्रपटातही आदिनाथ कोठारे दिसणार असून माधुरी सोबतचा त्याचा हा दुसरा चित्रपट आहे. आदिनाथ दिग्दर्शित ‘पाणी’ या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
तुम्ही अजूनही ही सीरिज पाहिली नसेल तर नक्की पाहा