ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर बच्चन पांडेचा जलवा

‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर बच्चन पांडेचा जलवा

अक्षय कुमार वर्षभरच त्याच्या अनेक चित्रपटांच्या कामात व्यस्त आहे. सध्या त्याच्या आगामी बच्चन पांडे या चित्रपटाची सगळीकडे चर्चा आहे. या चित्रपटात क्रिती सॅनन, जॅकलीन फर्नांडिस आणि अर्शद वारसी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. अक्षयचा रंजक अवतार आणि लोकांच्या पसंतीस उतरलेल्या गाण्यांमुळे हा चित्रपट सध्या चांगलाच गाजत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय कुमार व क्रिती सॅनन या दोघांना झी मराठी वाहिनीवरच्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात निमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात अक्षयने डेनिम व निळा शर्ट असा कॅज्युअल लूक केला होता, तर क्रिती लाल आणि काळ्या फुलांच्या साडीमध्ये सुंदर दिसत होती.

चला हवा येऊ द्या मध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांची हजेरी 

चला हवा येऊ द्या हा झी मराठीवरील खूप लोकप्रिय कार्यक्रम आहे.या कार्यक्रमातील कलाकार प्रेक्षकांचे गेली अनेक वर्षे मनोरंजन करीत आहेत. हा कार्यक्रम केवळ सगळीकडेच लोकप्रिय आहे ,म्हणूनच मराठी व अनेक हिंदी कलाकारही नियमितपणे ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर येत असतात. नुकतेच बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार आणि अभिनेत्री क्रिती यांनी ‘चला हवा येऊ द्या’ सेटवर हजेरी लावली. पुढील आठवड्यात प्रेक्षकांना हे विशेष भाग पाहायला मिळतील. 

बच्चन पांडे अक्षय कुमारने फक्त या मंचावर कलाकारांचे कौतुक तर केलेच शिवाय क्रिती सोबत एक जबरदस्त परफॉर्मन्स सुद्धा दिला. त्यांचा हा परफॉर्मन्स पाहून सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे कौतुक केले व अक्षयने देखील चला हवा येऊ द्याच्या कलाकारांबरोबर खूप धमाल केली. या भागात प्रेक्षकांना अक्षय कुमारचा मराठमोळा अंदाज देखील बघायला मिळणार आहे. 

खराखुरा बच्चन पांडे 

अक्षय कुमार व चित्रपटातील इतर कलाकारांना भेटण्यासाठी चला हवा येऊ द्या मध्ये लातूरहुन एक खास पाहुणा आला होता. या पाहुण्याचे नाव धनंजय असे आहे. धनंजय हा खऱ्या आयुष्यातील बच्चन पांडे आहे असे म्हटले जाते कारण त्याच्याकडेही चित्रपटातील बच्चन पांडे प्रमाणेच निळ्या रंगाचा खोटा डोळा आहे. धनंजय हा अक्षय कुमारचा मोठा चाहता आहे. 

ADVERTISEMENT

बच्चन पांडेची सर्वत्र चर्चा 

बच्चन पांडेचे  ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट अनेक गोष्टींमुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची  गाणी इंटरनेटवरही ट्रेंडिंग आहेत. चित्रपटाचे निर्माते आणि कलाकार तो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सध्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.  या चित्रपटाच्या प्रमोशनच्या पहिल्याच दिवशी, चित्रपटाचे कलाकार ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये गेले होते. गंमत म्हणजे या ठिकाणी रील लाईफ बच्चन पांडेची रिअल लाईफ बच्चन पांडेशी भेट झाली. सध्या या चित्रपटातील ‘सारे बोलो बेवफा’ हे नुकतेच रिलीज झालेले गाणे फार गाजते आहे. या गाण्यात अक्षय एका गँगस्टरच्या अवतारात मनापासून नाचताना दिसतो आहे. या महिन्यातील सर्वात मोठा चित्रपट म्हणून बच्चन पांडे कडे प्रेक्षक व बॉलिवुडचेही लक्ष लागले आहे. निर्माता आणि चित्रपट व्यवसाय तज्ज्ञांच्या मते अक्षय कुमारचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला यशस्वी होऊ शकेल.

फरहाद सामजी दिग्दर्शित, बच्चन पांडेच्या ट्रेलरला आणि अलीकडेच रिलीज झालेल्या गाण्याला प्रेक्षकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. बच्चन पांडे मध्ये अक्षय व क्रिती बरोबरच अर्शद वारसी, पंकज त्रिपाठी, संजय मिश्रा, अभिमन्यू सिंग आणि जॅकलीन फर्नांडिस हे कलाकार देखील दिसतील. हा चित्रपट 18 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

09 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT