ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
आलिया भट साकारणार करिअरमधील सर्वात छोटी भूमिका

आलिया भट साकारणार करिअरमधील सर्वात छोटी भूमिका

एस एस राजमौलीच्या ‘आरआरआर’ चित्रपटाची प्रेक्षक आतूरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटगृहे सुरु झाल्याने पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर हिट चित्रपटांचा धुमाकूळ सुरू झाला आहे. आरआरआरची पहिली झलक आणि शूटिंगचे फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. या निमित्ताने बाहुबलीनंतर एक भव्यदिव्य चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहे. आरआरआरमध्ये बॉलीवूड अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री आलिया भट यांची वर्णी लागलेली आहे. मात्र असं असलं तरी या दोघांच्या भूमिका चित्रपटात जास्त वेळ नसणार आहेत. अजय देवगणचा यात स्पेशल कॅमियो असल्यामुळे तो फक्त आठ मिनिट या चित्रपटात दिसणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यात आलियाची भूमिकाही खूपच छोटी आहे. ज्यामुळे ही भूमिका आलियाच्या करिअरमधील सर्वात छोटी भूमिका ठरणार आहे.

का दिवसात एका चित्रपटगृहात झिम्माचे 18 खेळ हाऊसफुल्ल

कशी असेल आरआरआरमध्ये आलियाची भूमिका

आलिया भट्ट जरी एस एस राजमौलीच्या आरआरआर या बिग बजेच चित्रपटातून झळकणार असली तरी तिची भूमिका यामध्ये फक्त पंधरा मिनिट असणार आहे. इतका छोटा रोल आलियाने आजवर साकारलेला नाही त्यामुळे ही भूमिका आलियाच्या करिअरमधील सर्वात लहान भूमिका असणार आहे. बॉलीवूडमध्ये सध्या आलिया एक टॉपची अभिनेत्री आहे. एकीकडे ती संजय लीला भंन्सालीच्या ‘गंगूबाई काठियावाडी’मध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. त्यामुळे या चित्रपटात सगळीकडे तिचाच ठसा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मात्र अशा प्रकारच्या तगड्या भूमिका साकारत असताना आलियाने एकीकडे आरआरआरमध्ये एवढा छोटा रोल करण्यास का होकार दिला असेल असा प्रश्न चाहत्यांना आता पडला आहे.

आधी कोर्ट मॅरेज करणार विकी आणि कतरिना, नंतर रंगणार शाही विवाह सोहळा

ADVERTISEMENT

या कारणासाठी आलिया साकारतेय सर्वात छोटी भूमिका

आलिया भटला एका मुलाखतीत तिने आरआरआरमधील एवढा छोटा रोल का स्वीकारला असं विचारण्यात आलं होतं. तेव्हा तिने उत्तर दिलं होतं की, आलियाचं एक स्वप्न होतं की तिला आयुष्यात दोन दिग्दर्शकांसोबत काम करण्याची इच्छा आहे. ज्यामध्ये संजय लीला भन्साली आणि एस एस राजमौली या दोघांची नावे होती. अचानक तिचं स्वप्न असं एकत्रित पूर्ण होण्याची संधी तिला मिळाली. संजय लीला भन्सालीने तर तिला ड्रिम प्रोजेक्टची ऑफर दिली. पण यासोबतच आलेल्या आरआरआरची ऑफर ती नाकारू शकली नाही. आरआरआरमध्ये तिची भूमिका छोटी असली तरी तिचं यामुळे एस एस राजमौलीसोबत काम करण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. 

आला रे आला ‘पांडू’ चा ट्रेलर आला

26 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT