घर विकत घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतो. माणूस स्थलांतर करून गावाच्या पाठीवर कुठेही गेला अगदी परदेशातही तरी तिथे त्याला स्वतःचं घर असावं असं वाटत असतं. बऱ्याचदा छोट्या शहरातून मोठ्या शहरात येणाऱ्यांना अशा समृद्ध शहरांमध्ये घर घेणं हे स्वप्नवत वाटत असतं. लग्न झाल्यावरही आपला संसार आपल्या नवीन घरी सुरु व्हावा अशी इच्छा असते. मात्र घर विकत घेणं हा एक मोठा आणि आर्थिक निर्णय असल्यामुळे याबाबत काही गोष्टींचा आधीच विचार करणं गरजेचं असतं. यासाठी स्वतःचं घर विकत घेण्यापूर्वा या काही प्रश्नांची उत्तरे जरूर मिळवा.
आनंदी वास्तूसाठी खास नावे (Home Names In Marathi)
घर विकत घेण्याचं मुळ कारण काय ?
घर आपण कशासाठी विकत घेत आहोत हा प्रश्न घर खरेदी करण्यासाठी निर्णायक ठरतो. कारण घर खरेदीची प्रत्येकाची गरज निरनिराळी असू शकते. कुणाला स्वतःचं पहिलं घर खरेदी करायचं असतं, कोणाला छोट्या घरातून मोठ्या घरात राहायला जायचं असतं, कुणी गुंतवणूक म्हणून प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतवतं तर कुणाला निरनिराळ्या शहरात कामानिमित्त प्रवास करावा लागतो यासाठी सोय म्हणून स्वतःचं घर हवं असतं. एकदा तुमचा घर घेण्यामागचा उद्देश ठरला की तुम्हाला निर्णय घेणं सोपं जातं.
किचनसाठी हॉब खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात
घराच्या लोनचे ईएमआय सहज देणं शक्य आहे का ?
मुंबई सारख्या शहरात स्वतःच घर घ्यायचं म्हणजे होमलोन अर्थात गृहकर्जाची साथ घ्यावीच लागते. मात्र तु्म्हाला हे माहीत आहे का की तुम्हाला तुमच्या उत्पन्नावर नेमकं किती लोन मिळेल. नसेल तर त्याची आधीच चौकशी करा. शिवाय तुम्ही जे घर विकत घेत आहात त्याच्यावर तुमचे किती लोन असेल हे अवलंबून आहे. त्यामुळे याचा सरासरी विचार करून लोनचे हप्ता दर महिन्याला किती असेल याचा आधीच अंदाज घ्या.
तुमचा मासिक खर्च किती आहे ?
घर खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला तुमचा नियमित मासिक खर्च किती आहे हे माहीत असायला हवं. कारण एकदा घर खरेदी केल्यावर तुम्हाला हे खर्च अचानक कमी करता येत नाहीत. यासाठी या सर्व गोष्टींचा सावधपणे विचार करा.
घर खरेदी घ्यायचं की भाड्याने घ्यायचं ?
जर तुम्ही एखाद्या शहरात कामानिमित्त स्थलांतर केलं असेल तर लगेच तिथे घर विकत घेण्याची घाई करू नका. कारण मोठ्या शहरांमध्ये घरांच्या किंमती जास्त असतात, शिवाय तुम्ही तिथे तुमचा जम अजून बसवलेला नसतो. त्यामुळे काही वर्ष अशा ठिकाणी घर भाड्याने घ्या. तिथे रुळल्यावर आणि व्यवस्थित रिसर्च केल्यावर तुम्हाला हवं तिथे हवं तसं घर घ्या.
काही वर्षांनी खरंच होम लोनपेक्षा घराची किंमत वाढेल का ?
काही वर्षांपूर्वी घरांच्या किंमती झपाट्याने वाढत होत्या. मात्र सध्या या किंमती पूर्वीपेक्षा थोड्या कमी गतीने वाढत आहेत. त्यामुळे तुम्ही होमलोन मध्ये गुंतवलेले पैसे ठराविक काळानंतर वाढणार का याचा अंदाज घ्या. यासाठी अशा ठिकाणी घर खरेदी करा जिथे प्रॉपर्टीला चांगली व्हॅल्यू मिळेल.
घरासाठी तुम्हाला तुमच्या कोणत्या इच्छांना मुरड घालवी लागेल ?
घर खरेदी हा आयुष्यातील एक मोठा आर्थिक निर्णय आहे. सहाजिकच यासाठी तुम्हाला तुमच्या इतर काही इच्छांना मुरड घालावी लागू शकते. यासाठी तुम्ही तयार आहात का? कारण जेव्हा घरांच्या जाहिरात दाखवल्या जातात त्यांच्या पेक्षा घराची मुळ किंमत नक्कीच जास्त असते. घरासोबत घर खरेदीची नोंदणी, घर सजावटीचा खर्च या गोष्टींचाही विचार करा.
असं बनवा तुमचं स्वयंपाकघर इको फ्रेंडली, फॉलो करा या टिप्स
तुम्ही या घरात किती वर्ष राहणार आहात ?
तुम्ही ज्या शहरात घर खरेदीचा निर्णय घेतला आहे. तिथे तुम्ही किती वर्ष राहणार आहात याचा विचार करा. कारण करिअरसाठी जर तुम्ही इतर शहर अथवा परदेशी जाणार असाल तर तुम्ही केलेली गुंतवणूक वाया जाऊ शकते. यासाठी योग्य शहराची निवड करून मगच घर खरेदी करा.