ADVERTISEMENT
home / मनोरंजन
बापबीपमधून उलगडणार वडील मुलाच्या नात्यातील गुंता

‘बापबीपबाप’मधून उलगडणार वडील-मुलाच्या नात्यातील गुंता

वडील- मुलाचे नाते हे नेहमीच वेगळे असते. काही ठिकाणी ते तणावाचे तर काही ठिकाणी ते फार प्रेमाचे असते. आई-मुलांच्या नात्याइतकी सहजता कोणत्याही नात्यात नसते. म्हणूनच वडिलांचा धाक हा सगळ्यांच्याच घरी थोड्याफार प्रमाणात असतोच. यासाठी कारणीभूत असतो तो म्हणजे संवाद. खूप जण वडिलांच्या दराराऱ्याला इतके घाबरतात की, त्यांच्याशी बोलण्याचा मुक्तपणाने विचार मांडण्याचा मुळीच विचार करत नाही. अनेकदा प्रेम असूनही ही संवादाची ही दरी वाढत राहते. अशाच गुंतागुंतीवर भाष्य करणारी एक वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्लॅनेट मराठीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज सगळ्यांना 31 ऑगस्टपासून पाहता येणार आहे. जाणून घेऊया याविषयी अधिक

शमा सिकंदरची हॅट ट्रिक, व्हायरल झाले बोल्ड फोटो

लॉकडाऊनने बदलले आयुष्य

लॉकडाऊन हा आता सगळ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे. खूप जणांना या दिवसांनी बरेच काही शिकवले आहे. एरव्ही एकमेकांपासून शारिरीक लांब असलेली लोकं या लॉकडाऊनमुळे घरी अडकून पडली.खूप जणांना नाईलाजास्तव एकमेकांसोबत वेळ घालवावा लागला. अशावेळी नेमकं काय होतं? हे दाखवणारी ही मालिका आहे. जेव्हा या काळात वडील-मुलाला एकमेकांशिवाय पर्याय नसतो. अशावेळी त्यांच्यामध्ये हरवलेला संवाद त्यांना पुन्हा गवसतो का? हे विचारणारी ही सीरिज आहे. त्यामुळे ही पाहताना नक्कीच खूप जणांना त्यांच्या घरातील परिस्थिती आठवण्यास प्रवृत्त करणार आहे. तुम्हालाही यामध्ये तुमचे नाते सुधारण्याची एक संधी नक्कीच मिळणार आहे.

“रणवीर सिंह झाला बाबा” या मेसेजमुळे सोशल मीडियावर धमाल

ADVERTISEMENT

हे चेहरे येणार भेटीस

एरव्ही मालिका आणि चित्रपटात पाहिलेले हे चेहरे आपल्याला यामध्ये पाहायला मिळणार आहे. शरद पोंक्षे, शिल्पा तुळसकर, तेजस बर्वे, पर्ण पेठे, उदय नेने यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सीरिजचे दिग्दर्शन अमित कान्हेरे यांनी केले आहे. येत्या 31 ऑगस्टपासून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे . याचा आनंद तुम्हाला प्लॅनेट मराठीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे.

ट्रेलर पाहिलात का?

‘बापबीपबाप’ या वेबसीरिजचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला असून यामध्ये नात्यातील तणाव अगदी स्पष्टपणे दिसून येत आहे.  अमित कान्हेरे यांनी हा विषय हाताळला असून या वेबसीरिजचे लेखन प्रतिक उमेश व्यास आणि अमित कान्हेरे यांचे आहे. या वेबसीरिजचे संवाद योगेश जोशी यांचे असून अत्यंत हलकेफुलकेपणाने ही मालिका भरलेली आहे जी प्रत्येकाला आवडेल असा विश्वास मालिकाकर्त्यांना आहे. 

अंधश्रद्धेवरील सस्पेन्स सीरिज ‘परिस’ येतेय भेटीला

26 Aug 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT