ADVERTISEMENT
home / पालकत्व
बाळासोबत पहिल्यांदा घराबाहेर जाताना या वस्तू ठेवा जवळ 

बाळासोबत पहिल्यांदा घराबाहेर जाताना या वस्तू ठेवा जवळ 

घराबाहेर जाताना आतापर्यंत तुम्ही तुमच्या हॅंडबॅगेत नेहमी तुम्हाला हव्या त्या वस्तू घेतल्या असतील. मेकअपचं साहित्य, सॅनेटरी पॅड, पी सेफ अशा वस्तू तुमच्या बॅगेत नेहमी असाव्या असं प्रत्येकीला वाटतं. पण एकदा तुम्ही आई झालात की तुम्हाला तुमच्यापेक्षा जास्त काळजी बाळाची घ्यावी लागते. मग स्वतःसाठी फक्त पैशाचं पाकीटही सोबत असणं पुरेसं असतं. पण बाळासाठी मात्र एक भली मोठी हॅंडबॅग जवळ बाळगावी लागते. अशा वेळी तुमच्यासोबत नेमक्या कोणत्या वस्तू असाव्यात यासाठी ही चेकलिस्ट… तसंच वाचा बाळाची काळजी कशी घ्यायची (Navjat Balachi Kalji In Marathi), बाळंतिणीची काळजी कशी घ्यावी | After Pregnancy Tips In Marathi आणि बाळाची शी ची जागा लाल होणे उपाय | Babies Diaper Rash Home Remedies In Marathi,

बाळासोबत फिरताना वापरा ही चेकलिस्ट (Baby Day Out Checklist)

जर तुम्ही तुमच्या तान्हुल्यासह घराबाहेर जाणार असाल तर बॅग पॅक करताना ही चेकलिस्ट अवश्य तपासा.

डायपर

बाळासोबत कुठेही बाहेर जाताना तुमच्याजवळ त्याचे डायपर असायला हवेत. तुम्ही बाळासोबत कितीवेळ घराबाहेर असणार यावर तुमच्याजवळ किती डायपर असायला हवेत हे ठरतं. एक्स्ट्राचे डायपर असायला काहीच हरकत नाही. कारण कधी तुम्हाला जास्तीचे डायपर लागतील हे सांगता येणार नाही. 

डिस्पोजेबल मॅट 

बाळासोबत तुम्ही एखाद्या पार्टी अथवा कार्यक्रमासाठी जाणार असाल तर सोबत डिस्पोजेबस मॅट कॅरी करा. कारण तुम्ही इनडोअर असा अथवा आऊडडोअर बाळाचं डायपर चेंज करण्यासाठी चांगली जागा नसेल तरी तुम्ही डिस्पोजेबल मॅटवर बाळाला ठेवू शकता. बाळाच्या सुरक्षेसाठी एवढी काळजी घ्यायला हवी.

ADVERTISEMENT

बेबी वाइप्स

बाळासोबत फिरताना बेबी वाइप्स सोबत असणं तितकंच गरजेचं आहे. कारण तुमच्या बाळाची त्वचा खूप नाजूक असते. घराबाहेर असताना बाळाला स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला बेबी वाइप्सचा फायदा होऊ शकतो. बेबी वाइप्सने तुम्ही बाळाचा चेहरा आणि अंगही पुसून घेऊ शकता. 

डायपर रॅश क्रीम

डायपर दिवसभर वापरल्यामुळे बाळाला बऱ्याचदा रॅशेस येतात. घरच्यापेक्षा बाहेर गेल्यावर डायपर रॅशेसचा त्रास जास्त होतो. अशा वेळी तुमच्याजवळ डायपर रॅशेस क्रीम असायला हवी. कारण त्यामुळे बाळ जास्त चीडचीड करत नाही. 

बेबी फूड

बाळ जर मोठं असेल तर त्याला दिवसभर ब्रेस्ट फिडिंग व्यतिरिक्त आणखी काही खाद्यपदार्थांची गरज लागू शकते. अशा वेळी तुमच्यासोबत बाळाची भरडी, मऊ वरणभात, नाचणीचे सत्त्व, मॅश केलेलं केळं, रेडी टू इट फूड सल्पीमेंट सोबत असतील तर बाळाला तुम्ही कधीही भरवू शकता. 

बाळाची पाणी आणि दुधाची बाटली

बाळासोबत घराबाहेर जाताना तुमच्यासोबत नेहमी बाळाची पाण्याची आणि दुधाची बाटली असायला हवी. बाळाचं पाणी बदलू नये यासाठी त्याचं गरम केलेलं पाणी नेहमी सोबत असावं शिवाय ज्या ठिकाणी ब्रेस्ट फिडिंग करणं शक्य नसेल तिथे दूध पाजण्यासाठी दुधाची बाटलीही जवळ असावी. 

ADVERTISEMENT

बाळाचे कपडे

बाळ लहान असल्यामुळे सतत शी अथवा शू करत असतं. म्हणूनच बाळाचे एक्स्ट्रा कपडे जर तुमच्याजवळ असतील तर तुमची फार पंचाइत होत नाही. बाळाला भरवताना, त्याने उलटी केल्यामुळेही कपडे खराब होऊ शकतात.

बाळाची खेळणी

बाळाचं एखादं छोटं खेळणंही तुम्ही तुमच्या हॅंडबॅगेत कॅरी करू शकता. कारण जेव्हा बाळ रडू लागेल अथवा त्याला कंटाळा येईल तेव्हा तुम्ही ते त्याला खेळवण्यासाठी ते वापरू शकता. एखादं फेव्हरेट खेळणं हातात असेल तर बाळ रडणं विसरून त्यात गुंतून राहू शकतं. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

22 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT