ADVERTISEMENT
home / त्वचेची काळजी
basic rules to keep in mind while picking your skincare products in marathi

कोणतंही स्कीन केअर प्रॉडक्ट खरेदी करताना फॉलो करा हे बेसिक नियम

प्रत्येकीला तिची त्वचा सुंदर, नितळ आणि चमकदार असावी असं वाटत असतं. असं असलं तरी आजकाल त्वचेच्या समस्या वाढताना दिसतात. याचं महत्त्वाचं कारण तुम्ही त्वचेची निगा राखण्यासाठी वापरत असलेली स्कीन केअर प्रॉडक्ट असू शकतात. कारण प्रत्येकाची त्वचा निराळी असते, जर तुम्ही तुमच्या स्कीन टाईपला योग्य असे स्कीन केअर वापरले नाहीत तर त्याचा दुष्परिणाम तुमच्या त्वचेवर दिसू लागतो. काही जणी कोणताही विचार अथवा रिसर्च न करता, इतरांच्या सांगण्यावरून स्कीन केअर निवडतात. असं करणं तुमच्या त्वचेसाठी त्रासदायक ठरू शकतं. म्हणूनच स्कीन केअर निवडताना काही नियम फॉलो करायलाच हवेत. तसंच जाणून घ्या संवेदनशील त्वचेसाठी स्कीन केअर टिप्स  (Sensitive Skin Care Tips), तेलकट त्वचेसाठी स्कीन केअर टिप्स (Oily Skin Care Tips In Marathi), कोरड्या त्वचेसाठी घरगुती उपाय (Dry Skin Care Tips In Marathi)

इतरांच्या सांगण्यावरून प्रॉडक्ट खरेदी करू नका

जाहिरात पाहून अथवा एखाद्या मैत्रिणीच्या सांगण्यावरून स्कीन केअर प्रॉडक्ट खरेदी करणं मुळीच योग्य नाही. कारण त्यांच्या त्वचेचा प्रकार आणि तुमच्या त्वचेचा प्रकार एकसमान असेलच असं नाही. त्यामुळे एखाद्या प्रॉडक्टला ऑनलाईन खूप रेटिंग असलं तरी तुमच्या त्वचेसाठी त्या प्रॉडक्टमधील घटक सूट होणारे आहेत का हे पाहायलाच हवं. म्हणूनच तुमच्या त्वचेला सूट होणाऱ्या प्रॉडक्टविषयी खूप रिसर्च करा आणि मगच निर्णय घ्या.

थेट त्वचेवर स्क्रीन केअर प्रॉडक्ट लावू नका

स्कीन केअर प्रॉडक्ट खरेदी केल्यावर त्याची पॅच टेस्ट घेतल्याशिवाय ते त्वचेवर लावू नका. कोणतेही नवीन प्रॉडक्ट वापरण्याचा हा महत्त्वाचा नियम आहे. यासाठी मनगटाजवळ थोडं प्रॉडक्ट लावून बघा जर तुम्हाला कोणतीही अॅलर्जी अथवा जळजळ झाली नाही तरच तुम्ही ते तुमच्या चेहरा, मान अथवा इतर त्वचेवर लावू शकता.

स्वतःची त्वचा समजून घ्या

स्कीन केअर प्रॉडक्टची खरेदी करण्यापूर्वी तु्म्हाला तुमच्या त्वचेविषयी माहीत असायला हवं. कारण तुमची त्वचा तेलकट, कोरडी, कॉम्बिनेशन, संवेदनशील कशी आहे हे तुम्हाला माहीत असायलाच हवं. यासाठी आधी स्वतःची त्वचा समजून घ्या. मगच त्वचेसाठी योग्य अशा स्कीन केअरची निवड करा. 

ADVERTISEMENT

स्कीन केअर रूटिन पाळा

स्कीन केअर प्रॉडक्ट खरेदी करण्यापूर्वी त्वचेची काळजी घेण्याची पद्धत समजून घ्यायला हवी. स्कीन केअर रूटिन फॉलो करण्यासाठी क्लिंझिंग, स्क्रबिंग, टोनिंग, मॉइस्चराझिंग, सन प्रोटेक्शन अशा अनेक स्टेप्स फॉलो कराव्या लागतात. त्यामुळे त्या माहीत असतील तरच तुम्ही योग्य क्रमाने स्कीन केअर प्रॉडक्ट त्वचेवर वापरू शकता.

योग्य सल्ला घ्या

स्कीन केअर प्रॉडक्ट खरेदी करण्यापूर्वी त्वचा तज्ञ्जांचा सल्ला घेणे नेहमीच फायद्याचे ठरते. कारण जर तुम्हाला तुमची त्वचा निरोगी आणि सुंदर दिसावी असं वाटत असेल तर ते तुमची मदत करू शकतात. तुमची त्वचा कशी आहे अथवा तुमच्या त्वचेच्या काय समस्या आहेत याचे योग्य ज्ञान त्यांच्याकडे असते. त्यामुळे तुमच्या त्वचेसाठी कोणते स्कीन केअर योग्य तुम्हाला ते चांगलं सांगू शकतात. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

12 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT