ADVERTISEMENT
home / आरोग्य
buckwheat in marathi

आरोग्यदायी कुट्टूचे फायदे |Benefits Of Buckwheat In Marathi

एक प्राचीन धान्य म्हणून कुट्टू ओळखले जाते. इंग्रजीमध्ये याला Buckwheat असे म्हणतात.  कुट्टूच्या बिया या धान्य म्हणून वापरल्या जातात. त्यापासून पीठ तयार केले जाते. मग त्याचा आहारात समावेश केला जातो. भारत आणि इतर देशांमध्ये कुट्टूपासून वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. भारतात उपवासाच्या दिवशी खूप जण कुट्टूचे सेवन करतात. गेल्या 8 हजारहून अधिक वर्षांपासून कुट्टू ही वनस्पती उगवली जाते. हे धान्य तृणधान्य स्वरुपाचे आहे. याचे गवत स्वरुपातील पीक  असून त्याला गव्हाच्या लोंब्याप्रमाणे दाणे येतात. हे झाड सदाहरीत कुटुंबातील असून त्याची उंची ही जास्तीत जास्त 15 ते 20 मीटर इतकी लांब असते. चीन, युक्रेन, कझागिस्तान, जपान आणि युरोप अशा काही भागांमध्ये याची शेती मोठ्याप्रमाणात केली जाते. कुट्टूची माहिती Buckwheat In Marathi  जाणून घेताना त्यामध्ये काय असते हे देखील जाणून घ्यायला हवे. कुट्टूमध्ये मोठ्या प्रमाणात आर्जिनीन, प्रोटीन, लायझीन असते. या शिवाय यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर, लोह, फोलेट, व्हिटॅमिन E,B, पोटॅशिअम आणि सोडियम हे देखील असते. या शिवाय तुम्ही औषधी वनस्पतींची माहिती देखील घेऊ शकता.

कुट्टूचे पीठ (Kuttu Atta In Marathi)

कुट्टू या धान्याचा तशाच्या तसा वापर केला जात नाही. तर त्यापासून buckwheat flour in marathi कुट्टूचे पीठ बनवले जाते. त्याचा उपयोग करुन अनेक रेसिपीज तयार केल्या जातात. अनेक भागांमध्ये कुट्टूपासून वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. buckwheat flour in marathi मध्ये अनेक पोषक घटक असतात. ज्याचे थेट फायदे शरीराला मिळण्यास मदत मिळते. कुट्टूच्या पिठापासून चपात्या तयार केल्या जातात. त्या चपातीही चवीला फार छान लागतात.

कुट्टूचे आरोग्यदायी फायदे (Health Benefits Of BuckWheat In Marathi)

Health Benefits of BuckWheat in Marathi

 कुट्टू  Buckwheat In Marathi  म्हणजे काय ते जाणून घेतल्यानंतर त्याचे आरोग्यासंदर्भात कोणते फायदे होतात ते जाणून घेऊया.

वजन कमी करण्यास मदत करते (Weight Loss)

वजन कमी करणाऱ्यांसाठी कुट्टू हे फारच फायद्याचे धान्य आहे. कुट्टूमध्ये फायबरचे प्रमाण मोठ्याप्रमाणात असते. ज्यावेळी तुम्ही कुट्टूचे सेवन करता त्यावेळी पोट जास्त काळासाठी भरुन राहते.  शरीरासाठी लागणाऱ्या कॅलरीज या योग्य पद्धतीने वापरले जातात. वजन कमी करण्यासाठी हे फारच महत्वाचे असते. त्यामुळे तुम्ही वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी नक्कीच याचा उपयोग करु शकता. त्याच्या सेवनामुळे तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकेल.

ADVERTISEMENT

मधुमेह नियंत्रणात ठेवते (Control Diabetes)

मधुमेह नियंत्रणात ठेवायचे असेल तर तुमच्या शरीरात फायबर असणे फारच जास्त गरजेचे असते. कुट्टूमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फायबर असते. फायबर असेल तर त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तर तुम्ही कुट्टूचे सेवन करु शकता. त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा मिळतो. 

ॲसिडिटी कमी करते (Reduces Acidity)

पचनशक्ती मंदावलेली असेल तर खूप जणांना ॲसिडिटीचा त्रास होऊ लागतो. जर तुमच्या पोटात फायबर गेले तर त्यामुळे ते पचण्यास मदत करते. एखाद्या गोष्टीच्या खाण्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही नक्कीच याचे सेवन करायला हवे. तुमचा तो त्रास कमी होईल.

मानसिक आरोग्य चांगले ठेवते (Mental Health)

शरीराशी निगडीत वेगवेगळ्या समस्या कमी करण्यासाठी कुट्टू फारच फायदेशीर ठरते. जर तुमचे आरोग्य चांगले राहिले तर तुमचे मानसिक आरोग्य चांगली राहण्यास मदत मिळते. चांगल्या मानसिक आरोग्यासाठी तुम्ही आताच त्याचे सेवन करणे गरजेचे आहे.

हाडांना बळकटी देते (Bone Health)

हाडं मजबूत राहिली तर त्यामुळे सांधेदुखी किंवा इतर त्रास होत नाहीत.कुट्टूमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस आणि पोटॅशिअम असते. ज्यामुळे हाडांना बळकटी मिळण्यास मदत मिळते. तुमच्या हाडांना बळकटी मिळवायची असेल तर तुम्ही कुट्टूचे सेवन Buckwheat In Marathi करायला हवे.

ADVERTISEMENT

ह्रदय निरोगी ठेवते (Healthy Heart)

शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण योग्य असेल तर ह्रदय निरोगी राहण्यास मदत मिळते. यामध्ये नियासिन, फोलेट, व्हिटॅमिन B6 सारखे घटक असतात. ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी चांगली राहण्यास मदत मिळते.  याशिवाय यामध्ये असलेले अन्य घटक हे रक्तातील ऑक्सिजनची पातळी सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे ह्रदय निरोगी राहते.

स्तनांच्या कर्करोगासाठी फायदेशीर (Breast Cancer)

स्तनांचा कर्करोग हा अनेक महिलांसाठी गंभीर अशी समस्या आहे. कॅन्सरला बाधा आणणारे घटक कुट्टूमध्ये असतात. अनेक संशोधातून असे सिद्ध झाले आहे की,  फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्यामुळे ट्युमरचा धोका कमी होतो. त्यामुळे कर्करोगापासून दूर राहण्यासाठी कुट्टूचे सेवन करायला हवे.

त्वचेसाठी कुट्टुचे फायदे (Skin Benefits Of BuckWheat In Marathi)

Skin Benefits of BuckWheat in Marathi

त्वचेसाठीही कुट्टू फारच फायद्याचे असते. जर तुम्ही कुट्टूचे सेवन केले तर तुम्हाला त्वचेसाठी Buckwheat In Marathi काही खास फायदे मिळू शकतात. कुट्टूचे पीठ तयार केले जाते kuttu atta in marathi आणि मग त्याचा वापर केला जातो

निरोगी त्वचा (Healthy Skin)

कुट्टूमध्ये व्हिटॅमिन E असते. ज्यामुळे त्वचेतील तजेला टिकून राहतो. यामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट घटक असल्यामुळे त्वचा निरोगी राहण्यासाठी मदत करते. तुम्हाला निरोगी त्वचा हवी असेल तर तुम्ही कुट्टूचे पीठ, गुलाबपाण्यात घालून तो पॅक चेहऱ्याला लावा. त्यामुळे तुम्हाला सुंदर त्वचा मिळू शकेल.

ADVERTISEMENT

सन टॅनपासून सुटका (Keeps Suntan Away Sun Tan)

सूर्याच्या अतिनील किरणांपासून तुम्हाला वाचायचे असेल तर कुट्टूचा वापर करु शकता. कुट्टू मधील लिपिड पेरिक्सिडेशन अतिनील किरणांपासून तुम्हाला दूर ठेवते. कुट्टूचे पीठ घेऊन त्याचा एक पातळ लिक्विड तयार करावे. त्यामध्ये गुलाबपाणी टाकून तुम्ही ते शरीरावर स्प्रे करु शकता. गुलाब पाण्याचे फायदे बरेच आहेत. त्यामुळे त्वचा काळवंडणार नाही.

अँटी एजिंग (Anti Aging)

हार्मोन्स संतुलित करण्याची क्षमता ही कुट्टूमध्ये असते. कुट्टूच्या वापरामुळे त्वचेखाली अससेले कोलॅजन हे बुस्ट होण्यास मदत मिळते. त्यामुळे त्वचा ही चिरतरुण दिसण्यास मदत मिळते. कुट्टूच्या पिठात दोन चमचे दूध घालून तो पॅक चेहऱ्याला लावा तुम्हाला तुमच्यामध्ये नक्की फरक झालेला जाणवेल.

केसांसाठी कुट्टुचे फायदे (Hair Benefits Of Buckwheat In Marathi)

Hair Benefits Of Buckwheat In Marathi

केसांसाठी कुट्टुचे Buckwheat In Marathi  फायदे आहेत. जर तुम्हाला सुंदर केस हवे असतील तर तुम्हाला कुट्टूचे सेवन करायला हवे.

लांब आणि सुंदर केस (Long And Nourished Hair)

कुट्टूमध्ये अमिनो असते. ज्यामुळे केस लांब आणि सुंदर राहण्यास मदत मिळते. केसांवरील चमक अबाधित ठेवण्यासाठी कुट्टूचे सेवन केले तरी चालू शकते. याशिवाय कुट्टूचा वापर हेअर मास्क म्हणून केला तरी देखील तुम्हाला त्याचा फायदा मिळू शकतो.

ADVERTISEMENT

केसगळती थांबवते (Stops Hair Fall)

केसगळती थांबवण्यासाठीही कुट्टूमधील अमिमो-ॲसिड फायद्याचे ठरते. केसगळतीचा त्रास तुम्हाला होत असेल तर तुम्ही नक्कीच कुट्टूच्या पिठाचे सेवन करायला हवे. त्यामुळे केसगळती कमी होण्यास तुम्हाला मदत मिळेल

केसांच्या वाढीसाठी फायदेशीर (Good For Hair Growth)

केसांची वाढ होत नसेल तर केसांच्या वाढीला चालना देण्यासाठी तुम्हाला कुट्टूचे पीठ वापरण्यास काहीच हरकत नाही. योग्य प्रमाणात कुट्टूचे सेवन केले तर तुम्हाला तुमच्यामध्ये झालेले फरक नक्की जाणवतील.

कुट्टुचा वापर कसा करावा (How To Use Buckwheat In Marathi)

How To Use Buckwheat in Marathi

कुट्टूचा वापर  Buckwheat In Marathi  कसा करायचा ते जाणून घेतले तर त्याचा वापर कसा करायचा ते कळणेही सोपे जाईल. चला जाणून घेऊया कुट्टूचा वापर कसा करावा ते

  1. कुट्टू फ्लेक्स स्वरुपात तुमच्याकडे असेल तर तुम्हाला ओट्मीलप्रमाणे ते खाता येते. ही रेसिपी वेटलॉससाठी फारच फायद्याची ठरते. 
  2. कुट्टूचे पीठ किंवा जाडसर कुट्टू असेल तर तुम्ही सलाद किंवा कोशिंबीरमध्ये घालून खाऊ शकता. 
  3. कुट्टू रोस्ट करुन खाल्ले जाते. त्यामुळे तुम्हाला नक्कीच इतर काहीही खायची इच्छा होत नाही. हा एक प्रकारे स्नॅक्स आहे.
  4. कुट्टूच्या पीठापासून तुम्हाला जाड पॅन केक्स किंवा पोळा बनवू शकता. जो चवीलाही चांगला लागतो
  5. कुट्टूच्या पीठापासून केकही तयार केला जातो. जो तुम्हाला गोड खाण्याची इच्छा झाल्यावर खाता येईल. 

कुट्टु खाण्याचे दुष्परिणाम (Side Effects Of Buckwheat In Marathi)

Side Effects Of Buckwheat In Marathi

कुट्टू हे आरोग्यााठी लाभदायी असले तरी देखील Buckwheat In Marathi ते जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे त्याचे काही दुष्परिणामही होऊ शकतात. 

ADVERTISEMENT
  1. कुट्टूच्या अति सेवनामुळे थायरॉईडचा त्रास वाढण्याची शक्यता असते. महिलांनी याचे सेवन करताना थोडी अधिक काळजी घ्यायला हवी. 
  2. काही जणांना काही पीठाची एलर्जी असते. जर तुम्हाला अशा काही गोष्टींची एलर्जी असेल तर तुम्ही त्याचे सेवन केल्यामुळे काही त्रास होऊ शकतात.
  3. कुट्टूचा परिणाम झाला तर तुम्हाला त्यामुळे तोंड सुजणे किंव जीभ जड होणे असा त्रास होऊ शकतो. 

FAQ’s

1. ओट्सपेक्षा कुट्टू अधिक आरोग्यदायी असते का?

 कुट्टूचे पीठ हे अधिक आरोग्यदायी असल्याचे मानले जाते. पण ओट्समध्येही अनेक फायदे असतात. तुम्ही  कोणत्याही गोष्टीचे सेवन केले तरी चालू शकते. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. जर शक्य असेल तर या दोन्ही पिठांचा समावेश करायला हवा.

2. कुट्टूचे सेवन कसे करावे?

कुट्टूचे पीठ हे आपल्याकडे अगदी सहज मिळते.त्यामुळे तुम्ही थेट कुट्टू्च्या पीठापासून पोळी किंवा इतर काही रेसिपीज ट्राय करु शकता. खूप जणांना डाएटमध्ये कुट्टूचे सेवन कसे करायचे ते सांगितले जाते. त्यानुसारही तुम्ही कुट्टूचे सेवन करु शकता.

3. खाण्यापूर्वी कुट्टू भिजत ठेवणे गरजेचे असते का?

कुट्टू भिजवण्याची काहीही गरजे नसते. त्याचे पीठ करुन त्याचे सेवन करता येऊ शकते. पण जर तुम्ही त्यापासून काही बनवण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी तुम्हाला कुट्टू हे किमान 7 तास तरी भिजवणे गरजेचे आहे. असे केल्यामुळे कुट्टू चांगले फुलून येते आणि त्याचा वापर करता येऊ शकतो.

अधिक वाचा

ADVERTISEMENT

नाचणीचे फायदे आरोग्यासाठी (Nachni Benefits In Marathi)

खसखस खाण्याचे फायदे, कसा करायचा उपयोग घ्या जाणून (Benefits Of Poppy Seeds In Marathi)

वजन कमी करण्यासाठी चिआ सीड्स खाण्याचे फायदे (Chia Seeds Benefits In Marathi)

22 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT