गुलकंदाचे नाव घेतल्यावरच मनात एकदम सुगंधित गोडवा निर्माण होतो. गुलाबाच्या पाकळ्यांनी तयार करण्यात आलेला हा पदार्थ आपण नेहमी पानातून तर खातोच पण नुसता गुलगंद खाण्याचे फायदेदेखील आहेत. गुलकंद दिसायला जितका छान असतो तितकीच त्याची चवही अप्रतिम असते. गुलकंद मुरंब्याप्रमाणेच दिसतो. पण गुलकंद खाण्याने तुमच्या शरीराला फायदा मिळतो हे तुम्हाला माहीत आहे का? गुलकंद खाण्याचे शरीरातील विविध आजार छूमंतर होतात. या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला गुलकंद रेसिपी मराठीत देत असून गुलकंद खाण्याचे फायदे मराठीत (gulkand benefits in marathi) देत आहोत. पण त्याआधी गुलकंद म्हणजे काय हे जाणून घेऊया. गुलाबाच्या ताज्या पाकळ्या साखरेसोबत किंवा मधासोबत मिक्स करून एका निश्चित काळासाठी साठवल्या जातात. काही कालावधीनंतर मध किंवा साखरेत मिक्स केलेल्या गुलाबाच्या पाकळ्या रस सोडतात आणि पूर्णतः त्या गोड रसात एकजीव होतात. या तयार मिश्रणाला म्हणतात गुलकंद. यामध्ये अनेक पोषक तत्व असतात जे शरीरासाठी उपयुक्त ठरतात. जाणून घेऊया गुलकंद खाण्याचे फायदे (gulkand che fayde).
गुलकंदातील पोषक तत्वे (Nutritional Value Of Gulkand)
गुलकंदामधील पोषक तत्व तुमच्या शरीरातील उष्णता शोषून घेण्यास मदत करतात. तुमची प्रकृती जर उष्ण असेल तर तुम्ही नक्की याचा वापर करून घ्यावा. तसंच आयुर्वेदात गुलकंदाला औषध म्हणून मान्यता देण्यात आली आहे. काही औषधांमध्ये विशिष्ट आजारांवरील प्रभाव वाढवण्याकरिता त्यासोबत गुलकंद खाण्याचा सल्ला दिला जातो. बरेचदा काही उष्ण किंवा तिखट खाल्ल्यावर आपल्या पोटात जळजळ किंवा एसिडीटी होते. त्यावेळी एक ते दोन चमचे गुलकंद खावा. यामुळे तुम्हाला त्वरित आराम मिळेल. त्यामुळे घरात तुम्ही नियमित गुलकंद ठेवावा आणि याचे प्रमाणात सेवन करावे.
गुलकंद खाण्याचे फायदे (Gulkand Benefits In Marathi)
गुलकंद खाण्याचे फायदे अनेक आहेत. आपण नेहमी पानामधून गुलकंद खात असतो. पण तुम्ही याचे नियमित सेवन केले तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा मिळतो. शरीराला याचे काय महत्त्वाचे फायदे होतात हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत. विशिष्ट आजारांवर गुलकंदाचा चांगला प्रभाव दिसून येतो. त्यामुळे तुम्ही याचा समावेश तुमच्या दैनंदिन आयुष्यात नक्कीच करून घ्यायला हवा.
वजन कमी करण्यासाठी (To Lose Weight)
गुलकंदातील औषधीय गुणांमुळे वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. तुम्ही याचे सेवन करून वजन नियंत्रणात ठेऊ शकता. गुलकंद तयार करण्यासाठी ज्या गुलाबांच्या पाकळ्यांचा उपयोग केला जातो, त्यामध्ये अजिबात फॅट नसते. त्यामुळे लो – फॅट खाद्यापदार्थांच्या सेवनामध्ये वजन कमी करण्यासाठी गुलकंदाचा उपयोग केला जातो. यावर अजूनही शोध चालू आहे. मात्र अतिप्रमाणात याचे सेवन करू नये. तुम्ही रोज तुमच्या नाश्त्यामध्ये एक चमचा गुलकंदाचा समावेश करून घ्यावा.
तोंडाला आत पुळ्या आल्यास (Mouth Ulcer)
जर तुम्हाला तोंड आलं असेल आणि त्यामुळे काहीही खाणं जमत नसेल तर अशावेळी गुलकंद आवर्जून खा. गुलकंद खाल्ल्याने पोटाला थंडावा मिळतो आणि तोंडात आलेली उष्णताही कमी होते. तोंड आल्यानंतर तुम्हाला काहीही खाणे शक्य होतन नाही आणि तोंडाची जळजळही होते. गुलकंदामध्ये विटामिन बी चे प्रमाण अधिक असते. एका शोधानुसार, विटामिन बी कॉम्प्लेक्सची कमतरता असल्यास, तोंड येण्याची समस्या सुरू होते. त्यामुळे यावर उत्तम उपाय म्हणजे गुलकंद खाणे. विटामिन बी कॉम्प्लेक्सच्या कमतरतेशिवाय यातील थंडाव्यामुळेही शरीरातील उष्णता कमी होऊन उपाय लागू पडतो.
डोळ्याच्या थंडाव्याकरिता (For Eyes)
सतत काम करून डोळ्यांची जळजळ होणे, डोळ्यांवर उष्णता निर्माण होणे असे अनेक त्रास आपल्याला होत असतात. यावर डोळे न चोळता तुम्ही गार पाण्याने धुणे आणि गुलकंद खाणे हे उत्तम उपाय आहेत. डोळ्यांखाली येत असणारी सूज आणि डोळे लाल होण्याची समस्या असेल तर ही तुमच्या शरीरातील अति उष्णतेमुळे निर्माण होणारी समस्या आहे. त्यामुळे यावर तुम्ही गुलकंदाचा उपाय नक्कीच करून पाहू शकता. रोज तुम्ही एक लहान चमचा गुलकंदाचे सेवन केल्यास, शरीरामध्ये थंडावा निर्माण होऊन डोळ्यांच्या उष्णतेची ही समस्या दूर होण्यास मदत मिळते.
पोटात गॅस निर्माण झाल्यास (Gas Problem In Stomach)
तुम्हाला सतत अॅसिडीटी आणि गॅससारख्या समस्या असतील तर गुलकंद खाण्याचे फायदे मिळतात. गुलकंद हे गुलाबाच्या पाकळ्यापासून बनवले जाते हे सर्वांनाच माहीत आहे, ज्या अत्यंत गुणकारी असतात. असे म्हटले जाते की, गुलाबाचा वापर हा पचनतंत्रासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो. पचनतंत्र सुधारण्यासाठी आणि बद्धकोष्ठतेची समस्या नीट करण्यासाठीही याचा उपयोग होतो. बद्धकोष्ठतेमुळेच गॅसची समस्या निर्माण होते. अन्नाचे अपचन हे गॅस होण्याचे मुख्य कारण आहे. पण गुलकंद खाण्याने या समस्येतून तात्पुरती सुटका नक्कीच मिळते.
तणावावर उत्तम उपाय (Stress)
गुलकंदाचे सेवन केल्याने थकवा, शरीरातील कमतरता, शारीरिक पीडा, तणावसारख्या समस्या दूर होण्यास मदत मिळते. वास्तविक गुलकंद हे एक प्रभावी अँटीऑक्सिडंट असून शरीराला ऊर्जा देण्याचे काम करते. त्यामुळेच आलेला थकवा घालविण्यासाठी आणि तुम्हाला ताजेतवाने वाटण्यासाठी गुलकंदाचा उपयोग करून घेता येतो. याशिवाय गुलकंदाचा थंडावा थकवा दूर करण्यासाठी अधिक प्रभावी ठरतो. शिवाय गुलकंद खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढण्यास मदत मिळते असेही सांगण्यात येते.
हृदयावर प्रभावी (For Heart)
उत्तम आरोग्यासाठी हृदय निरोगी असणे अत्यंत गरजेचे आहे. हृदय निरोगी राखण्यासाठी तुम्ही गुलकंदाचा फायदा करून घेऊ शकता. गुलाबाच्या पाकळ्यांनी तयार करण्यात आलेल्या गुलकंदामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण चांगले असते. मॅग्नेशियम रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. तसंच हृदयाचे योग्य स्वरूपात कार्य पार पाडण्यासाठीही याचा उपयोग होतो. त्यामुळे तुम्ही नियमित गुलकंद एक चमचा खाल्ल्यास, तुम्हाला त्याचा फायदा मिळतो.
बद्धकोष्ठता (Piles)
जर कोणाला बद्धकोष्ठाची समस्या असेल तर जेवल्यानंतर एक ते दोन चमचे गुलकंदाचं सेवन करावं. यामुळे पचन चांगल होतं आणि बद्धकोष्ठाची समस्याही दूर होते. कारण गुलकंद आपल्या आतड्यांतील उपयुक्त ठरणारा गट बॅक्टेरिया वाढवण्यात मदत करते. ज्यामुळे आपल्याला जेवण पचवणं सहज जातं. गुलाबाच्या पाकळ्यांनी तयार करण्यात आलेल्या गुलकंदामधील मॅग्नेशियम बद्धकोष्ठतेपासून मुक्ती देण्यास मदत करते. एका शोधानुसार, मॅग्नेशियमचे सेवन करण्याने ही समस्या दूर होते कारण यामध्ये लॅक्सेटिव्ह प्रभाव असतो. त्यामुळे तुम्ही नियमित एक लहान चमचा गुलकंदाचा आपल्या दैनंदिन आयुष्यात समावेश करून घ्यावा.
चांगल्या स्मरणशक्तीसाठी (For Good Memory)
आपल्या मुलांची स्मरणशक्ती चांगली राहावी असे प्रत्येक पालकाला वाटत असते. त्यासाठी आपण वेगवेगळे प्रयोगही करत असतो. पण तुम्ही गुलकंदाचे सेवन आपल्या पाल्याला नियमित दिल्यास, तुम्हाला त्याचा फायदा मिळू शकतो. स्मरणशक्ती वाढविण्यासाठी गुलकंदाचा फायदा होतो. वास्तविक गुलकंदामध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट गुण हे स्मरणशक्तीची क्षमता वाढविण्यास अधिक सकारात्मक ठरतात. त्यामुळे नियमित मुलांना गुलकंद खायला दिल्यास, त्यांची स्मरणशक्ती चांगली राहाते.
त्वचाही होते अधिक तजेलदार (Gulkand Benefits For Skin)
फक्त गुलाबपाण्यानेच नाहीतर गुलकंद खाल्ल्यानेही पिंपल्सची अर्थात मुरूमांची समस्या दूर होण्यास मदत मिळते. खरंतर गुलाब आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असतो. हा त्वरित आपल्या त्वचेतील विषारी घटक दूर करून परिणाम दाखवते. यासाठी कोणतेही ठोस प्रमाण नाही. मात्र याचा वापर करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. कारण त्वचेच्या बाबतीत सगळ्यांची त्वचा सारखी नसल्याने सर्वांना एखादी गोष्ट योग्य ठरते असे नाही.
शरारीतील उष्णता कमी करण्यासाठी (Body Heat)
गुलाब मानसिक शांती आणि सेक्स हार्मोन वाढवणारं फूल मानलं जातं. कदाचित याच कारणामुळे वर्षानुवर्षे गुलाबाच फूल प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. गुलकंद खाल्ल्याने महिला आणि पुरूष दोघांचीही सेक्स लाईफ चांगली होते. तसंच शरीरातील उष्णता गुलकंदाच्या थंडाव्याने कमी होते आणि तुम्हाला उष्णतेचा त्रास होत नाही. तुमचे शरीर अधिक उष्ण असेल तर तुम्ही गुलकंदाचे नियमित सेवन करणे गरजेचे आहे. यामुळे तुमच्या शरीरातील उष्णता नियंत्रणात राहते आणि शरीरावर पुळ्या येणे, डोळे सुजणे अशा समस्यांना सामोरे जावे लागत नाही.
गुलकंद रेसिपी मराठी (How To Make And Store Gulkand)
गुलकंद म्हटला की, आपण नेहमी बाजारातूनच घरी आणतो. पण तुम्ही घरच्या घरीही गुलकंद तयार करू शकता. गुलकंदाची सोपी रेसिपी जाणून घ्या.
साहित्य
- 250 ग्रॅम गुलाबाच्या पाकळ्या
- 250 ग्रॅम पिठी साखर
- एक लहान चमचा वाटलेली वेलची (वेलची पावडर)
- अर्धा चमचा वाटलेली बडिशेप पावडर
बनविण्याची पद्धत
- सर्वात पहिले गुलाबाच्या पाकळ्या एका कपड्यावर ठेवा आणि नीट धुवा
- पाणी सुकवून घ्या आणि मग एका मोठ्या भांड्यात या पाकळ्या घ्या
- वरून पिठी साखर घाला आणि हाताने व्यवस्थित चुरडून मिक्स करा
- वरून वेलची पावडर आणि बडिशेप पावडर मिक्स करून हे मिश्रण काचेच्या बाटलीत भरून ठेवा
- आठ ते दहा दिवस ही बरणी तुम्ही उन्हात ठेवा आणि चमच्याने मधूनमधून वर खाली करून घ्या
- याला साखरेमुळे रस सुटायला लागेल आणि त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या मिक्स होतील
- 8-10 दिवसात तुमचा गुलकंद तयार. तुम्ही खाण्यासाठी याचा वापर करू शकता
गुलकंदाने होणारे नुकसान (Side Effects Of Gulkand)
गुलकंद खाण्याचे फायदे आहेत तसंच त्याचे नुकसानही आहे. गुलकंद बनविण्यासाठी कोणत्याही प्रकारचे रसायन वापरण्यात येत नाही. त्यामुळे याचे नुकसान जास्त नाही. मात्र यामध्ये साखरेचा वापर करण्यात येतो. त्यामुळे मधुमेही व्यक्तींना याचा वापर डॉक्टरांना विचारल्याशिवाय करू नये. तसंच गुलकंद अतिप्रमाणात खाऊ नये.
काय आहेत प्रश्न (FAQ’s)
1. गुलकंद कसा खावा?
गुलकंद नुसता खाता येतो. त्याशिवाय पानामध्ये गुलकंद घालतात. तसंच ब्रेडला लावूनही गुलकंद खाता येतो. याशिवाय गरम दुधात मिक्स करूनही गुलकंदाची अप्रतिम चव लागते. लाडू तयार करतानाही तुम्ही गुलकंदाचा वापर करू शकता.
2. अनिद्रेच्या समस्येवर गुलकंद फायदेशीर ठरतो का?
गुलकंद खाल्ल्याने झोप न येण्याची समस्याही दूर होते. रोज रात्री झोपण्याच्या अर्धा तास आधी दूधासोबत गुलकंद घ्यावा. यामुळे मन शांत राहील आणि चांगली झोपही येईल. खरंतर दूध आणि गुलकंदाच्या मदतीने मेंदूमध्ये मेलाटोनिन हार्मोन्सना चालना मिळते. या हार्मोन्समुळे आपली स्लीप क्लॉक मॅनेज करण्याचं काम होतं.
3. गुलकंद कधी आणि किती प्रमाणात खावा?
सकाळ आणि संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही गुलकंद खाऊ शकता. तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी याचे सेवन करा. दिवसातून एक ते दोन वेळाच तुम्ही 1-2 चमचे गुलकंद खा. यापेक्षा जास्त गुलकंद खाऊ नका.