ADVERTISEMENT
home / Care
benefits of murumuru butter

केराटिन ट्रीटमेंटसारखा इफेक्ट हवा असेल तर मुरुमुरु बटरचा करा वापर 

कोणला रेशमी आणि सरळ केस नको असतात? सरळ आणि मऊ केसांसाठी आपण आपल्या केसांची काळजी घेतो. आजकाल बहुतेक महिला सरळ व मऊ केसांसाठी हेअर केराटीन ट्रीटमेंट करून घेत आहेत. या केसांच्या ट्रीटमेंटमध्ये केसांमध्ये कृत्रिम केराटिनचा वापर केला जातो, ज्यामुळे केस रेशमी आणि चमकदार होतात. या ट्रीटमेंटचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या ट्रीटमेंटमध्ये खूप कमी रसायने वापरली जातात, ज्यामुळे केसांना इजा होत नाही.

काय आहे केराटिन ट्रीटमेंट 

केराटिन ट्रीटमेंटमध्ये केसांना प्रोटीन्स दिले जातात, त्यामुळे केस चमकदार होतात. केसांची काळजी घेणारी ही महागडी ट्रीटमेंट प्रत्येकाच्याच बजेटमध्ये नसते. केसांना केराटिन देण्यासाठी तुम्ही काही नैसर्गिक गोष्टीही वापरू शकता. निरोगी आहाराच्या मदतीने तुम्ही केसांना नैसर्गिक केराटिन देऊ शकता. मजबूत आणि जाड केसांसाठी, केसांची मुळे मजबूत असणे खूप महत्वाचे आहे. केराटिन हा प्रथिनांचा एक प्रकार आहे आहे जे केस, त्वचा आणि नखे यांचा वरचा थर बनवते. केसांच्या वाढीसाठी केराटिन हे आवश्यक पोषक तत्व आहे. केराटिनच्या कमतरतेमुळे केस कमकुवत होतात, त्यामुळे केस गळायला लागतात. केराटिन केसांच्या मुळांना मजबूत करते, ज्यामुळे केस दाट आणि चमकदार दिसतात. 

केसांची काळजी घेण्यासाठी नैसर्गिक घटक कधीही चांगले आहेत. नैसर्गिक उत्पादनांचा वापर केल्याने केस दीर्घकाळ निरोगी आणि दाट राहतात. केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही मुरुमुरू बटर वापरू शकता. मुरुमुरू बटर वापरल्याने केस चमकदार आणि रेशमी राहतात. या बटरचा हेअर केअर रुटीनमध्ये वापर केल्यास केराटिन ट्रीटमेंटचा इफेक्ट येऊ शकतो. जाणून घेऊया मुरुमुरू बटर वापरण्याची योग्य पद्धत आणि त्याचे फायदे.

Murumuru Butter For Hair
Murumuru Butter For Hair

मुरुमुरू बटर म्हणजे काय 

मुरुमुरू बटर हे नट फॅटपासून बनवले जाते. पाम ट्रीवर हे नट फॅट आढळते. मुरुमुरू हे नारळासारखे दिसते. मुरुमुरूमध्ये नारळासारखे घटक देखील आढळतात. पण मुरुमुरू बटर आणि नारळ यात फरक आहे.मुरुमुरूमध्ये फॅटी ऍसिड असते जे त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यास मदत करते. मुरुमुरू बटर केसांची निगा राखण्यासाठी एक वरदान आहे. विशेषत: कुरळ्या केसांसाठी तर हे खूप फायदेशीर आहे. 

ADVERTISEMENT

हेअर कंडिशनर म्हणून मुरुमुरू बटर वापरा 

तुम्ही हेअर कंडिशनर म्हणून मुरुमुरू बटर वापरू शकता. मुरुमुरू बटर हे एक नैसर्गिक कंडिशनर आहे जे केसांचा कोरडेपणा व राठपणा कमी करते आणि केसांना पोषण देते. यामुळे केस मऊ व चमकदार होण्यात मदत होते. 

मुरुमुरू बटर केसांना खोलवर  पोषण देते, ज्यामुळे खराब झालेले केस दुरुस्त होतात. मुरुमुरू बटर केसांना चमकदार बनवण्यास मदत करते. हे बटर तुम्ही केसांना तेलाच्या ऐवजी देखील वापरू शकता.

Murumuru Butter For Hair
Murumuru Butter For Hair

फेस मॉइश्चरायझर म्हणून वापरा

मुरुमुरू बटर केवळ केसांसाठीच नाही तर त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. मुरुमुरू बटरमधून त्वचेला आवश्यक पोषण मिळते. ते त्वचेला हायड्रेट करण्यास मदत करते. या बटरमध्ये दाह-विरोधी गुणधर्म असतात जे संवेदनशील त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. मुरुमुरू बटर त्वचा बरे करण्यास मदत करते. या बटरचा वापर केल्याने चेहऱ्यावर चमक येते तसेच त्वचा नितळ आणि चमकदार राहते.

त्वचेवर मुरुमुरू बटर लावण्याचे फायदे 

मुरुमुरू बटर त्वचेला आतून बरे करते. या बटरचा वापर करून चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डाग कमी होतात. मुरुमुरू बटरने चेहऱ्याला मसाज केल्याने त्वचा टाईट होते, त्यामुळे चेहऱ्यावरील बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी होतात. मुरुमुरू बटर चेहऱ्यावरील जखमा देखील बरे करते.

ADVERTISEMENT

पण काहीवेळा मुरुमुरू बटर कोणत्याही उत्पादनात मिसळून वापरल्यास त्वचेवर ऍलर्जी होऊ शकते, म्हणून ते वापरण्याआधी त्याची पॅच टेस्ट करा.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

17 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT