ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
pink salt and rosewater scrub

पिंक सॉल्ट व रोझ वॉटर स्क्रबचे त्वचेसाठी आहेत अनेक फायदे

तुम्ही अनेकदा ऐकले असेल की एक्सफोलिएशन हा स्किन केअरचा एक महत्त्वाचा भाग आहे. स्क्रबिंगमुळे त्वचा अधिक तेजस्वी होते. पण यासाठी योग्य घटक निवडून स्क्रब तयार करणे आवश्यक आहे. स्क्रबिंगमुळे त्वचा निरोगी राहण्यासोबतच तेल, मुरुम आणि चट्टे यापासून मुक्त होण्यास मदत होईल. म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी एक प्रभावी स्क्रब घेऊन आलो आहोत. हे स्क्रब बनवण्यासाठी फक्त पिंक सॉल्ट आणि गुलाबपाणी या दोन घटकांची आवश्यकता आहे. पिंक सॉल्ट हे मीठाचे सर्वात शुद्ध स्वरूप आहे. हे खाण्यासही खूप चवदार आणि फायदेशीर आहे. म्हणूनच पिंक सॉल्ट आणि गुलाबपाणी एकत्रितपणे त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

पिंक सॉल्टमध्ये असतात अनेक फायदेशीर घटक 

Pink Salt And Rosewater Scrub
Pink Salt And Rosewater Scrub

पिंक सॉल्ट हे कॅल्शियम, क्लोराईड, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम यांसारख्या खनिजांचा एक समृद्ध स्रोत आहे. ही सर्व खनिजे त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. तर गुलाब पाण्यात असलेले अँटीमाइक्रोबियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म त्वचेला बरे करण्याचे काम करतात. या दोन्ही घटकांचे मिश्रण करून बनवलेला स्क्रब त्वचेला निरोगी ठेवतो आणि त्वचेची चमक दीर्घकाळ टिकवून ठेवतो.

स्क्रबिंग का महत्त्वाचे आहे 

स्क्रबिंगमुळे त्वचेच्या मृत पेशी काढून टाकल्या जातात, ज्यामुळे पोअर्स स्वच्छ होतात आणि मुरुमांचा उद्रेक होण्याचा धोका कमी होतो. तसेच फेस स्क्रबमुळे त्वचेचे स्वरूप सुधारण्यास मदत होते. स्क्रबिंगमुळे त्वचेची काळजी घेणारी उत्पादने त्वचेमध्ये प्रवेश करू शकतात आणि त्वचेचा पृष्ठभाग मऊ करू शकतात. स्क्रबिंगमुळे त्वचेच्या मृत पेशी निघून जातात, ज्यामुळे त्वचेला योग्य पोषण मिळते. जर तुम्ही हायपरपिग्मेंटेशन, त्वचेवरील काळे डाग, कोरडी खरखरीत त्वचा आणि मुरुमांमुळे त्रस्त असाल तर  तुम्ही तुमच्या स्किनकेअर रुटीनमध्ये स्क्रबिंगचा समावेश नक्कीच करायला हवा. एक्सफोलिएशनमुळे त्वचेवर झटपट ग्लो येतो आणि त्वचा टवटवीत होते. हे कोलेजन प्रॉडक्शनला देखील चालना देते.

असे बनवा पिंक सॉल्ट आणि गुलाबपाण्याचे स्क्रब  

Pink Salt And Rosewater Scrub
Pink Salt And Rosewater Scrub

स्क्रब बनवण्यासाठी 1 टीस्पून पिंक सॉल्ट, 7 ते 8 थेंब गुलाबजल आणि 1 चमचा मध घ्या.  एका लहान भांड्यात प्रथम पिंक सॉल्ट आणि मध घाला. नंतर त्यात गुलाब पाण्याचे काही थेंब टाका.आता हे सर्व साहित्य चांगले मिसळा आणि स्क्रब तयार करा. हे स्क्रब तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि 5 ते 10 मिनिटे बोटांच्या मदतीने तुमच्या चेहऱ्याला हळूवारपणे मसाज करा.त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यानंतर फेस वॉश देखील करू शकता.

ADVERTISEMENT

या स्क्रबचा त्वचेला होणारा फायदा 

हिमालयीन मीठ किंवा गुलाबी मीठ हे सर्वोत्तम डिटॉक्सिफायर आहे. हे त्वचेतील विषारी पदार्थ काढून टाकते आणि त्वचेचे आरोग्य राखते. पिंक सॉल्टचा आणखी एक फायदा म्हणजे ते दुर्गंधींचा प्रतिकार करते. त्यामुळे शरीराची दुर्गंधी कमी करण्यात मदत होते.गुलाबपाणी आणि गुलाबी मीठ त्वचेची पीएच पातळी संतुलित करण्यास मदत करतात. यासोबतच त्वचेवर साचलेली घाण साफ होते व त्वचेची रंध्रे घट्ट होतात. योग्य प्रकारे वापरल्यास, गुलाबी मीठ त्वचेच्या पेशी दुरुस्त करण्यासाठी, तुमची त्वचा तेजस्वी आणि तरुण ठेवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. पिंक सॉल्ट सेबमचे उत्पादन कमी करते. यासोबतच त्वचेच्या रक्तसंचयावर नियंत्रण ठेवते. गुलाबी मीठ आणि गुलाबपाणी त्वचेला मुलायम बनवते. हे स्क्रब तुमची त्वचा दीर्घकाळ हायड्रेटेड ठेवू शकते, तसेच त्वचेला नैसर्गिक चमक देखील देते.

परंतु लक्षात ठेवा की जास्त स्क्रबिंग त्वचेसाठी खूप हानिकारक असू शकते. दररोज फेशियल किंवा बॉडी स्क्रबिंग करू नका. जरी स्क्रब नैसर्गिकरित्या तयार केला गेला असेल तरीही त्याचा अतिवापर त्वचेसाठी नुकसानकारक आहे. तुम्ही आठवड्यातून दोनदा हे स्क्रब वापरू शकता.

Photo Credit – istockphoto

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
21 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT