ADVERTISEMENT
home / आरोग्य
Best Food In Dengue Fever

डेंग्यू किंवा मलेरिया झाल्यास लवकर बरे वाटण्यासाठी हे करा 

मान्सूनचे आगमन होताच उन्हाने त्रासलेल्या सर्वांच्याच मनाला दिलासा मिळतो, पण त्यासोबतच हा ऋतू अनेक आजारही घेऊन येतो. ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने डासांच्या उत्पत्तीसाठी अनुकूल वातावरण मिळते. या हंगामात डेंग्यू आणि मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येतात. त्यामुळे जर तुम्हाला या धोकादायक आजारांपासून दूर राहायचे असेल तर मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत आवश्यक आहे. प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यात आहाराचा खूप मोठा वाटा आहे.आज आपण अशाच काही खाद्यपदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात. यासोबतच या खाद्यपदार्थांमुळे डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण लवकर बरे होण्यासही मदत होते.डेंग्यूच्या आजारात लोकांना ताप, डोकेदुखी, डोळे दुखणे, सांधेदुखी, स्नायू दुखणे, थकवा येणे, उलट्या होणे असा त्रास होतो. काही वेळा डेंग्यूमुळे लोकांना जीवही गमवावा लागतो. डेंग्यूच्या आजारात तुम्ही तेलकट मसालेदार पदार्थ खाल्ले नाहीत तर तुम्ही लवकर बरे होऊ शकता. डेंग्यू बरा होण्यासाठी वैद्यकीय उपचारांबरोबरच डेंग्यूमध्ये काय खावे हेही जाणून घेणे गरजेचे आहे. कारण चांगला आहार घेतल्यास मलेरिया व डेंग्यू आजारातून लवकर बरे होण्यास मदत होते. 

डेंग्यू व मलेरिया झाल्यास पुढील पदार्थांचा आहारात करा समावेश 

हळद

Best Food In Dengue Fever
Best Food In Dengue Fever

स्वयंपाकघरातील आवश्यक मसाल्यांपैकी एक असलेली हळद अनेक रोग बरे करण्यासाठी वापरली जाते. हळदीत अँटी बॅक्टरीयल गुणधर्म असतात. त्यामुळे हळदीचे सेवन केल्याने सर्दी आणि संसर्ग तर दूर होतोच, पण डेंग्यू, मलेरियापासून बचाव करण्यासाठीही ती गुणकारी आहे. त्यामुळे हे आजार टाळण्यासाठी आणि लवकर बरे होण्यासाठी दिवसातून एकदा हळदीचे दूध प्यावे. 

डाळिंब

डाळिंब हे डेंग्यूपासून बचाव आणि बरे होण्यासाठीही खूप फायदेशीर आहे. यामुळे रक्तातील प्लेटलेट्सची संख्या वाढते आणि त्वरित ऊर्जाही मिळते. डाळिंब आपल्या पचनसंस्थेचे आरोग्य सुधारण्यास देखील मदत करते. 

नारळ पाणी

डेंग्यू, मलेरियापासून बचाव करण्यासाठी व शरीरात ताकद परत येण्यासाठी शरीराला हायड्रेटेड ठेवणे खूप आवश्यक आहे.त्यामुळे डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांनी पुरेसे पाणी पिण्याबरोबरच, नारळाचे पाणीही प्यायले तर प्रकृती लवकर सुधारते. कारण नारळाच्या पाण्यात इलेक्ट्रोलाइट्ससह इतर अनेक आवश्यक पोषक घटक असतात.

ADVERTISEMENT

पपई

Best Food In Dengue Fever
Best Food In Dengue Fever

डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांनी लवकर बरे होण्यासाठी पपईच्या पानांचा रस प्यावा असा सल्ला कायमच दिला होतो. पपईचे फळ खाणे आणि त्याच्या पानांचा रस हे दोन्हीही फायदेशीर आहेत. यामुळे पचनसंस्थेशी संबंधित समस्या दूर होतात आणि प्लेटलेट काउंटही वाढते.पपईच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. डेंग्यू तापामध्ये त्याचा रस रोज सेवन केल्यास प्लेटलेट्सची संख्या संतुलित राहते.पपईच्या पानांच्या ज्यूसव्यतिरिक्त गिलॉय ज्यूसही पिणे फायदेशीर आहे.

दही 

दही हे प्रोबायोटिक आहे. याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास देखील मदत करते. डेंग्यूच्या तापामध्ये ताज्या दह्याचे सेवन केल्यास तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होऊ शकते. 

भाज्या व फळे 

Best Food In Dengue Fever
Best Food In Dengue Fever

ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात आढळते. हे रक्तातील प्लेटलेट्स तयार करण्यास मदत करते. डेंग्यूचे विषाणू आणि बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी आलू बुखारा, टरबूज आणि चेरीसारखी फळे खा. डेंग्यूच्या वेळी शरीर कमकुवत होते. यासोबतच रोगप्रतिकारक शक्तीही कमकुवत होते. विशेषतः लहान मुलांना डेंग्यूचा संसर्ग झाला असेल तर त्यांना भाज्यांचे घरी बनवलेले सूप द्या. गाजर व बीटरूट देखील डेंग्यूशी लढण्यास मदत करू शकतात.  

वरील पदार्थांचा आहारात समावेश केल्यास औषधोपचारांचा फायदा होतो व रुग्णाची प्रकृती लवकर बरी होण्यास मदत होते. 

ADVERTISEMENT

Feature Image – istock

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

04 Aug 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT