ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
Sarees For Monsoon

पावसाळ्यात या रंगाच्या साड्या नेसलात तर मिळेल फ्रेश लूक

पावसाळा आला की आपल्याला फॅशन आणि वॉर्डरोबमध्ये बदल करावे लागतात. जे कपडे उन्हाळ्यात चालतात ते पावसाळ्यात आपण घालू शकत नाही. अन्यथा संसर्ग, आजार आणि दुर्गंधीचा त्रास सतावू शकतो. त्यामुळे जर तुम्हालाही ऑफिस, कॉलेज किंवा इतर ठिकाणी साडी नेसायला आवडत असेल, तर पावसाळ्यात त्या नेसताना काही गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे.उन्हाळ्यात कॉटन,  हिवाळ्यात सिल्क आणि पावसाळ्यात शिफॉन, जॉर्जेट हे उत्तम पर्याय आहेत. उन्हाळ्यात आपण आरामदायी लूकसाठी हलक्या आणि पेस्टल शेड्सना प्राध्यान्य देतो. पण पावसाळ्यात अशा शेड्स घालणे पूर्णपणे टाळा कारण पावसाळ्यात बाहेर पडल्यावर चिखल आणि घाण असतेच व ते कपड्यांवर उडाल्यावर डाग पडणार हे तर ओघाने आलेच. पेस्टल शेड्सवर हे डाग उठून दिसतात आणि काही डाग पूर्ण निघत नाहीत. म्हणूनच या ऋतूत गडद शेड्स निवडल्या पाहिजेत. आता लवकरच श्रावण महिनाही सुरू होत असल्याने सणवारांची रेलचेल असते. सणावारी तर छान ब्राईट रंगाच्या साड्या नेसल्या तर सणांची रंगत वाढते. म्हणूनच या ऋतुमध्ये हिरवा, निळा, मरून, लाल, नारिंगी या शेड्सच्या साड्या छान दिसतात. 

पावसाळ्यात निवडा हलके फॅब्रिक 

पावसाळ्यासाठी हलके फॅब्रिक असलेल्याच साड्यांची निवड करा. कारण जर जड फॅब्रिकच्या साड्या नेसताना गोंधळ उडतो. पण हलक्या फॅब्रिकच्या साड्या जर पावसात भिजल्या तर त्या लवकर सुकतात. शिफॉन, जॉर्जेट, नेटच्या साड्या या सीझनसाठी उत्तम पर्याय आहेत. आणि त्या इतर साड्यांपेक्षा तुलनेने स्वस्त देखील असतात. तसेच पावसाळा आहे म्हणजे मेकअप करायचा नाही असे नाही. मेकअपशिवाय साडीचा लुक पूर्ण वाटत नाही.. पावसाळ्यात मेकअप करताना लक्षात ठेवा की सामान्य काजळ, मस्करा आणि लायनर तुमचा लूक खराब करू शकतात, त्यामुळे अशा हवामानात केवळ वॉटरप्रूफ मेकअप उत्पादने वापरा. साडीबरोबरच योग्य पादत्राणांची निवडही इतर गोष्टींइतकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे पावसाळ्यात साडी बरोबर हाय हिल्स घालण्याऐवजी फ्लॅट आणि बॅलेरिना घालणे चांगले. पावसाळ्यात रस्ते ओले असतात. हिल्स घातल्या तर आपण घसरून पडण्याची भीती असते. म्हणूनच फ्लॅट सँडल्स किंवा बॅलेरिना घाला ज्या साडीच्या लूकवर छान सूट होतात. ऋतू बदलानुसार साडीचे रंगही बदलतात. तर पावसाळ्यात कोणते रंग परिधान करून तुम्ही अधिक स्टायलिश आणि सुंदर दिसू शकता जाणून घ्या.  

हिरवा

Sarees For Monsoon
Sarees For Monsoon

पावसाळा सुरू झाला की निसर्ग पृथ्वीवर हिरवेगार पांघरूण घालतो. हा रंग डोळ्यांना आराम तर देतोच, पण त्यामध्ये तुमचे सौंदर्यही द्विगुणित होते. हिरवा रंग प्रत्येक स्किन टोनला खुलून दिसतो आणि तो अनेक शेड्समध्ये मिळतो. या शेड्समधून तुम्ही तुमच्या आवडीनुसार साडी निवडू शकता. त्यामुळे या ऋतूत हा रंग नक्कीच ट्राय करा.

नारिंगी  

Sarees For Monsoon
Sarees For Monsoon

ऑरेंज किंवा नारिंगी हा देखील असा रंग आहे जो जवळजवळ प्रत्येकीलाच उठून दिसतो. हा अतिशय सुखदायक रंग आहे आणि शास्त्रानुसार हा रंग खूप शुभ मानला जातो. त्यामुळे तुम्ही हा रंग लाईटपासून ब्राइट शेड्सपर्यंत प्रत्येक शेडमध्ये ट्राय करू शकता.

ADVERTISEMENT

पिवळा 

Sarees For Monsoon
Sarees For Monsoon

पावसाळ्यासाठी पिवळा देखील योग्य रंग आहे, परंतु आपल्याला त्याच्या छटा निवडताना काळजी घ्यावी लागते. चमकदार पिवळा रंग हा फक्त उजळ त्वचेच्या टोनला सूट देतो, तर मस्टर्ड शेड ही जवळजवळ प्रत्येक टोनसाठी अनुकूल आहे. 

जांभळा 

Sarees For Monsoon
Sarees For Monsoon

जांभळा हा ट्रेंडी आणि अतिशय सुंदर रंग आहे. याच्याही अनेक छटा आहेत, आणि याची प्रत्येक शेड खूप सुंदर दिसते. त्यामुळे तुमच्या वॉर्डरोबमध्ये या रंगाच्या साडीचाही समावेश करा.

आता पावसाळ्यात सणवार, व्रतवैकल्ये असतात. या निमित्ताने या रंगांच्या सुंदर साड्या नेसून छान तयार व्हा आणि पावसाळा एन्जॉय करा. 

 Photo Credit – pinterest 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

13 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT