ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
tops for plus size women

हेवी ब्रेस्ट्स असणाऱ्या मुलींनी असे टॉप्स घातले तर दिसतील स्टायलिश

जवळजवळ प्रत्येक मुलीला स्टायलिश लुकसाठी जीन्स-टॉप घालायला आवडते. पण जर टॉपचे फिटिंग व्यवस्थित नसेल तर संपूर्ण लूक खराब होऊ शकतो. हेवी ब्रेस्ट्स किंवा ब्रेस्ट साईज मोठा असलेल्या महिलांना अनेकदा कपडे निवडताना त्रास होतो. अनेकदा अशा स्त्रिया त्यांच्या लुकबद्दल कॉन्शस होतात. त्यांना असे कपडे हवे असतात जे त्यांच्या स्तनांना हायलाईट करणार नाहीत. पंजाबी सूट किंवा साडी नेसल्यावर फारसा प्रश्न येत नाही कारण त्यावर पदर व ओढणी असते. पण जेव्हा जीन्स घालायची असते तेव्हा कोणता टॉप घ्यावा आणि कसा घेऊ नये हे समजत नाही. अशा परिस्थितीत मुलींनी त्यांच्या स्तनाच्या आकारानुसार टॉप घ्यावा. विशेषत: जर तुमचे हेवी ब्रेस्ट्स असतील तर तुम्ही असे टॉप निवडावे ज्यात तुम्हाला कॉन्शस वाटणार नाही. अनेक वेळा स्त्रिया ट्रेंडी टॉप घालतात पण त्यात त्यांना कम्फर्टेबल वाटत नाही. त्यामुळे त्यांना कधीकधी लाज वाटते. अशा परिस्थितीत महिला सैल कपडे घालतात. पण फार सैल फिटिंगचे कपडे सुद्धा गबाळे दिसतात. परफेक्ट फिटिंग आणि ट्रेंडी डिझाईन्सचे टॉप परिधान करणे हे कॉन्फिडन्ट लूकसाठी खूप महत्वाचे आहे. तुमचेही हेवी ब्रेस्ट्स असतील तर पुढील टॉप डिझाईन्स तुमच्यासाठी योग्य आहेत.

हाय नेक टॉप्स टाळा

तुमचा कप साईज मोठा असेल तर हाय नेक टॉप्स तुमचा लुक खराब करू शकतात. या प्रकारचे टॉप अनेकदा टाईट फिटिंगचे असतात, म्हणून या प्रकारच्या टॉपमध्ये स्तन मोठे दिसतात. म्हणूनच हाय नेक टॉप न घालणे चांगले. याउलट तुम्ही स्कूप नेकलाइन असलेले टॉप ट्राय करून बघू शकता. 

स्कूप नेक लाईन टॉप

स्कूप नेक लाइन टॉप मध्ये ब्रेस्ट्स हायलाईट होतात. या टॉपची नेकलाईन जरा डीप असते. ज्यांना डीप नेकलाईन आवडत असेल त्यांनी या टॉपची निवड करावी.  या टॉपमध्ये तुम्ही स्टायलिश दिसाल. 

व्ही नेक टॉप

काही स्त्रियांची अप्पर बॉडी हेवी असते त्यांच्यासाठी व्ही नेक टॉप हा एक चांगला पर्याय आहे.आजकाल व्ही नेकलाइन ट्रेंडिंग आहे. व्ही नेकलाइन टॉप  तुम्ही ट्राऊझर्स किंवा जीन्ससोबत वापरून पहा. हे तुमच्यावर खूप छान दिसेल आणि त्याच वेळी तुमची फिगर देखील छान दिसेल. 

ADVERTISEMENT

नॉटेड टॉप्स

हेवी ब्रेस्ट साईज असलेल्यांसाठी नॉटेड टॉप हा एक चांगला पर्याय आहे. या टॉपमध्ये तुम्हाला सुंदर आणि हलकेही वाटेल. हा टॉप तुम्ही जीन्स किंवा ट्राऊझर्स बरोबर स्टाइल करू शकता. 

रॅप टॉप

रॅप टॉप तुम्हाला चांगला दिसू शकतो. या टॉपमध्ये तुम्ही सुंदर तर दिसालच तसेच तुमच्या स्तनांचा आकारही योग्य दिसेल. हा टॉप तुम्ही जीन्ससोबत ट्राय करू शकता. स्टनिंग लुकसाठी तुम्ही याबरोबर हील्स देखील घालू शकता. या टॉपसोबत तुम्ही ज्वेलरीही घालू शकता.

सॅटिन टॉप

कधीकधी ड्रेसच्या डिझाइनमुळे स्तनाचा आकार लहान किंवा मोठा दिसू शकतो. जर तुम्ही हेवी ब्रेस्ट साइजसाठी चांगला टॉप शोधत असाल तर सिल्की टॉप तुम्हाला छान दिसेल. यामध्ये स्तनांचा आकार थोडा कमी दिसू शकतो. तसेच मऊसूत सॅटिन फॅब्रिकच्या टॉपमध्ये तुम्ही स्टायलिश दिसाल.

योग्य अंतर्वस्त्रे घाला 

आजकाल अनेक प्रकारचे सुंदर आणि स्टायलिश अंडरगारमेंट्स बाजारात येत आहेत. असेही काही अंडरगारमेंट्स आहेत ज्यामुळे स्तनांचा आकार कमी दिसतो. तुम्ही तुमच्या साईजनुसार असे अंडरगारमेंट्स निवडू शकता.एक लक्षात ठेवा की ब्रा नेहमी चांगल्या ब्रँडची आणि योग्य फिटिंगची असावी.

ADVERTISEMENT

तर पुढच्यावेळी शॉपिंग करताना या टॉप्सची नक्की निवड करा. 

Photo Credit – pinterest , istockphoto

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

06 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT