ADVERTISEMENT
home / अॅस्ट्रो वर्ल्ड
पैशांच्या पाकिटाचा रंग

वॉलेटचा रंगही आहे महत्वाचा, जाणून घ्या कोणता रंग ठरतो फायद्याचा

 पैसा हा सगळ्यांनाच आयुष्यात खूपच महत्वाचा आहे. पैसा असेल तर आयुष्यात स्थिरता अधिक टिकते असे वाटते. पैसा टिकून राहावा यासाठी अनेक जण प्रयत्न करतात. काही जणांकडे पैशांचा ओघ हा कायम असतो. त्यांना सतत यश मिळते. तर काही जणांना यश मिळवताना किंवा पैसा कमावताना अनेक अडचणी येतात. पर्यायी घरात कितीही आनंद असला तरी देखील काही आनंद हा पैशांशिवाय खरेदी करता येत नाही असे होऊन जाते. आजचा विषय हा पैशाला घेऊनच आहे. या आधी आपण पैसा टिकवण्यासाठी काही सोपे उपाय जाणून घेतले. आज आपण काही अशा गोष्टी जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये तुमच्या वॉलेटचा किंवा पाकिटाचा रंग हा महत्वाचा असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार काही रंग हे आपल्या सगळ्यांसाठी शुभ असतात. कोणत्या रंगाचे पाकिट घेतले असता त्याचा फायदा होतो चला घेऊया जाणून

हिरवा रंग

कोणत्या रंगाचे वॉलेट ठरते शुभ

 पाकिटाचा रंग हिरवा असेल तर हा हिरवा रंग अत्यंत शुभ मानला जातो. पैसा आकर्षित करण्यासाठी हा रंग अत्यंत शुभ मानला जातो. जर तुम्ही हिरव्या रंगाचे वॉलेट घेतले तर तुमचा पैसा अधिक काळासाठी टिकतो. इतकेच नाही तर पैसा खर्च करण्यासोबतच तुमच्याकडे पैसा परत येण्याची शक्यताही जास्त असते. जर तुम्हाला काही आर्थिक अडचणी असतील तर अशावेळी तुम्ही हिरव्या रंगाचे वॉलेट नक्कीच वापरायला हवे. 

अधिक वाचा : जाणून घ्या काय लक्ष्मी-नारायण योग, काय होतो फायदा

लाल रंग

लाल रंग या बाबत मतमतांतर आढळतात. याचे कारण असे की, फेंगशुईमध्ये लाल रंग हा वॉलेटसाठी शुभ मानला जात नाही. तर अनेक जण लाल रंग हा शुभ मानतात. लाल रंग हा अधिक पैसा आपल्याकडे आकर्षित करतो. जितका खर्च तुम्ही करता तितका पैसा तुमच्याकडे परत येण्यास मदत मिळत असते. तर दुसरीकडे लाल रंग हा अग्नीचा रंग असल्यामुळे हा लाल पाकिटात असलेला पैसा जळतो असे मानले जाते. त्यामुळे लाल रंगाच्या पाकिटाबद्दल अनेकांचे दुमत आहे. 

ADVERTISEMENT

गुलाबी रंग

गुलाबी रंग हा कितीही हवाहवासा वाटला तरी देखील हा रंग वॉलेटचा असून नये असे मानले जाते. कारण गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग असला तरी हा रंग अल्लडपणा दर्शवतो. अशामुळे पैसा हा कमी राहतो. असे मानतात. त्यामुळे शक्यतो तुम्ही गुलाबी रंगाचे पाकिट किंवा वॉलेट वापरु नका असे सांगितले जाते. 

पिवळा रंग

पिवळ्या रंगाचे पाकिट कधीही वापरु नये असे सांगितले जाते  याचे कारण असे की, पिवळा रंग हा ताण वाढवत असतो. या रंगाच्या वॉलेटमुळे पैसा परत येत नाही किंवा त्या पैशाला मार्ग सापडत नाही. जर तुम्हाला पिवळा रंग आवडत असे तर तुम्ही पिवळ्यामधील थोडा गडद रंग निवडला तर तो अधिक चांगला असतो.

चॉकलेटी रंग

चॉकलेटी रंग हा देखील पैशाची बचत होण्यासाठी उत्तम असा पर्याय आहे. मातीचा रंग हा चॉकलेटी असतो. मातीत ज्यावेळी आपण बी पुरतो. त्यावेळी त्यातून झाड उगवतात. म्हणजेच काहीतरी नव्या गोष्टींची निर्मिती होते. त्यामुळे चॉकलेटी रंगाचे पाकिट हे तुमच्यासाठी एक उत्तम निवड आहे. 

काळा रंग 

काळा रंग हा जरी कितीही खराब वाटला तरी देखील काळा रंग हा चांगल्या संधी आणि विकास घेऊन येणारा असतो. त्यामुळे अगदी हमखास तुम्ही काळ्या रंगाचे पाकिट घेण्यास काहीही हरकत नाही. 

ADVERTISEMENT

तुमच्याकडे हे रंग वगळता अन्य कोणत्या रंगाचे वॉलेट असेल आणि तुम्हाला ते बदलायचे असेल तर तुम्ही या पैकी काही रंग निवडू शकता.

18 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT