ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
Atal Bihari Vajpayee Biopic

आता चित्रपटातून होणार अटलजींचा गौरव, लवकरच येणार बायोपिक – ‘अटल’ 

देशाचे माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे यशस्वी नेते व असामान्य वक्तृत्व लाभलेले अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याची सुरुवात पुढील वर्षी डिसेंबरमध्ये त्यांच्यावर येणाऱ्या एका हिंदी चित्रपटाने होणार आहे. वाजपेयींच्या जन्मशताब्दी सोहळ्याची सुरुवात त्यांच्यावरील बायोपिकने होणार असून, नुकतीच विनोद भानुशाली आणि संदीप सिंग यांच्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. 25 डिसेंबर 1924 रोजी ग्वाल्हेरमध्ये जन्मलेल्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या आयुष्यावर आधारित असणाऱ्या या चित्रपटाचे नाव ‘अटल’ असून विनोद भानुशाली आणि संदीप सिंग हे दोन दिग्गज चित्रपट निर्माते हा चित्रपट बनवत आहेत. यापूर्वी संदीप सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बायोपिक ‘पीएम नरेंद्र मोदी’ देखील बनवला आहे. 

कोण साकारणार अटलजींची भूमिका 

‘अटल’ चित्रपटाचे दिग्दर्शक आणि चित्रपटात अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराची लवकरच घोषणा होणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या थिंक टँकने अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षाची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आणि देशाच्या सेवेसाठी आजीवन अविवाहित असलेले अटलबिहारी वाजपेयी यांनी सत्तेवर येण्यापूर्वी विरोधी पक्षनेते म्हणूनही खूप आदर मिळवला होता आणि संयुक्त राष्ट्रांमध्ये त्यांच्या हिंदीतील भाषणांचाही अनेकदा राजकीय चर्चांमध्ये अजूनही उल्लेख होतो.

Atal Bihari Vajpayee Biopic
Atal Bihari Vajpayee Biopic

अटलजींचे जीवन 

मूळचे आग्राजवळील बटेश्वरचे रहिवासी असलेले वाजपेयी कुटुंबातील श्याम लाल वाजपेयी यांनी ग्वाल्हेरजवळील मोरेना ही आपली कर्मभूमी बनवली होती. त्यांचे पुत्र कृष्ण बिहारी वाजपेयी यांनी तिथे शिकवायला सुरुवात केली. कृष्ण बिहारी आणि कृष्णा देवी यांचे सुपुत्र अटलबिहारी वाजपेयी यांचेही प्रारंभिक शिक्षण ग्वाल्हेरमधूनच झाले. नंतर त्यांनी डीएव्ही कॉलेज, कानपूर येथून उच्च शिक्षण घेतले. अटलबिहारी वाजपेयींनी संघासाठी आयुष्य वाहून घेतले होते.  RSS च्या ज्या काही सदस्यांना 1942 च्या ‘भारत छोडो’ आंदोलनात भाग घेतल्याबद्दल अटक करण्यात आले होते त्या कार्यकर्त्यांमध्ये अटलजी देखील होते.

Atal Bihari Vajpayee Biopic
Atal Bihari Vajpayee Biopic

अटलजी – एक आदर्श नेता 

अटलबिहारी वाजपेयी यांची प्रतिमा देशातील एक आदर्श नेता, प्रसिद्ध कवी आणि लेखक अशी आहे. ते दीर्घकाळ सक्रिय पत्रकारितेतही कार्यरत होते. त्यांच्यावर बनणार असलेला हा चित्रपट एका पुस्तकावर आधारित असून, त्याचे हक्क विनोद भानुशाली आणि संदीप सिंग यांनी विकत घेतले आहेत. चित्रपटाचे पूर्ण नाव, ‘मैं रहूं या ना रहूं , ये देश रहना चाहिये-अटल’ असे आहे. हा चित्रपट पेंग्विन रँडम हाऊस इंडियाच्या ‘द अनटोल्ड वाजपेयी: पॉलिटिशियन अँड पॅराडॉक्स’ या बेस्टसेलर पुस्तकाचे नाट्यरूपांतर असेल. हे पुस्तक एन पी उल्लेख यांनी लिहिले आहे.

ADVERTISEMENT

निर्मात्यांनी व्यक्त केल्या भावना 

चित्रपटाच्या घोषणेबद्दल निर्माते विनोद भानुशाली म्हणतात, “मी पूर्वीपासूनच अटलजींचा मोठा चाहता आहे. अटलजी हे जन्मजात नेते, उत्कृष्ट राजकारणी आणि दूरदर्शी होते. आपल्या राष्ट्राच्या उभारणीत त्यांचे अतुलनीय योगदान आहे आणि भानुशाली स्टुडिओ लिमिटेड त्यांचा वारसा रुपेरी पडद्यावर आणत आहे ही आमच्यासाठी गौरवाची बाब आहे.” चित्रपटाचे दुसरे निर्माते संदीप सिंग यांच्या मते अटल बिहारी वाजपेयी हे भारतीय इतिहासातील एक महान नेते होते ज्यांनी आपल्या शब्दांनी शत्रूंची देखील मने जिंकली. त्यांनी देशाचे सकारात्मक नेतृत्व केले आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर प्रगतीशील भारताची छाप तयार केली. ते पुढे म्हणाले की, “एक चित्रपट निर्माता म्हणून मला असे वाटते की अशा अनकथित कथा मांडण्यासाठी सिनेमा हे सर्वोत्तम माध्यम आहे जे केवळ त्यांच्या राजकीय विचारसरणीवरच नव्हे तर त्यांच्या मानवी आणि काव्यात्मक पैलूंवर देखील प्रकाश टाकेल.”

अटलजींच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट बघण्याची सर्वांना नक्कीच उत्सुकता असेल.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

28 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT