लग्नात नवरीने नखशिखांत नटणे फारच गरजेचे असते. कारण तिच्यासाठी लग्नाचा दिवस हा एकदम खास असतो. अशा या लग्नात नवरीच्या प्रत्येक गोष्टी अगदी परफेक्ट व्हायला हव्यात. तिच्या हेअर कलरपासून ते तिच्या अगदी पायांच्या नेलपेंटपर्यंत सगळं अगदी टिपटाप असायलाच लागतं. हल्ली ब्राईडल ब्लाऊजची प्रचंड क्रेझ आहे. लग्नात ब्राईडने घालण्यासाठी भरतकाम केलेले खास ब्लाऊज मिळतात. हे ब्लाऊज दिसायला एकदम हटके आणि सुंदर दिसतात. ब्लाऊजसाठी तुम्हालाही असे काही हटके पॅटर्न निवडायचे असतील तर काही हटके डिझाईन्स आम्ही निवडल्या आहेत. त्या तुम्ही नक्की ट्राय करु शकता.
पैसे वाचवायचे असतील तर ब्राईडने या गोष्टी टाळाव्यात
सौभाग्यवती!
हल्ली अगदी सर्रास दिसणारी फॅशन म्हणजे ब्लाऊजचा हा प्रकार. तुमच्या कोणत्याही हेव्ही साडीवर अशा प्रकारे पाठ भरुन शिवलेला ब्लाऊज आणि त्यावर केलेले हे भरतकाम छान शोभून दिसते.तुमच्या ब्लाऊजचा काठ जसा असतो अगदी त्यानुसार त्याच्यावर सौभाग्यवती असे कोरुन घेऊ शकता. गोल्डन आणि सिल्व्हर जरी किंवा दोऱ्यामध्ये तुम्हाला हे काम करुन मिळते. भरतकाम करणाऱ्यांकडे तुम्हाला अशा प्रकारे भरतकाम करुन दिले जाते. ब्लाऊजवरच नाही. तर नवरी जी शाल घेते त्यावरही तुम्हाला अशा पद्धतीने भरतकाम करता येईल. असे भरतकाम खूप सुंदर दिसते.
सिल्व्हर प्लेटेट दागिने आहे सध्याचा ब्रायडल ट्रेंड
बाहुंवरील भरतकाम
शालूंवरील ब्लाऊज हे नेहमीच थोडे वेगळे आणि साड्यांच्या तुलनेत अधिक हेव्ही असतात. अशा ब्लाऊजवर थोडे आणखी काम करुन त्याला हेव्ही केले जाते. ब्लाऊजच्या हातांवर काज काम, टिकल्या आणि बारीक जरीचे काम केले जाते. त्यामुळे हा ब्लाऊज अधिक चांगला आणि महागडा दिसू लागतो. तुमच्या साडीचा ब्लाऊज शिवून घेतल्यानंतर त्याला भरण्यासाठी खास अशा ठिकाणी द्या जिथे हाताने ब्लाऊजला खडे,जरी, टिकल्या लावण्याचे काम केले जाते. त्यामुळे तुमच्या एखाद्या साध्या ब्लाऊजला देखील एक वेगळा लुक मिळू शकेल.
टॉप 10 ट्रेंडी स्टायलिश ब्लाउज गळा डिझाईन (Blouse Back Designs In Marathi)
नेटेड आणि कटवर्क
हल्ली ब्लाऊजचा गळा डीप करण्यापेक्षा त्याला थोडा वेगळा पॅच वर्क आणि नेटेड असे काम करुन ब्लाऊज तयार केले जातात. जे दिसायला खूपच सुंदर दिसतात. तुम्ही कोणत्याही प्रकारची साडी नेसली असेल तरी देखील त्यावर असे ब्लाऊज चांगले उठून दिसतात. ब्लाऊजच्या गळ्याला टेंपल, डोली डिझाईन, वराती, वधू-वर असतात. त्यांना कटवर्क करुन त्यावर छान फॅन्सी नेट लावल्या जातात. साडीचा रंग यावर या नेट अवलंबून असतात. त्यामुळे जर तुम्हाला डीप नेक असं काही नको असेल तर तुम्हाला असा पद्धतीने साडीचा ब्लाऊज करता येईल.
सध्या तुम्हाला अशा पद्धतीचे अनेक ब्लाऊजचे पॅटर्न आणि डिझाईन्स यामध्ये पाहायला मिळतील. पैठणी, कांजिवरम किंवा कोणत्याही प्रकारच्या साड्यांवर तुम्हाला अशा पद्धतीचे ब्लाऊज शिवता येतील. जर तुम्हाला साडीचा ब्लाऊज पीस आवडला नसेल तर तुम्ही मिसमॅच ब्लाऊजपीस वापरुन त्यावर देखील अशापद्धतीने काही काम करु शकता. लग्नात तुम्ही अशाच पद्धतीने ब्लाऊज शिवला तर तो अधिक चांगला दिसू शकतो. त्यामुळे तुम्ही अगदी हमखास अशा काही डिझाईन्सची निवड करा आणि लग्नात स्पेशल दिसा.