ADVERTISEMENT
home / आरोग्य
Can running during periods help relieve painful cramps in Marathi

मासिक पाळी सुरू असताना का करावा धावण्याचा व्यायाम

मासिक पाळीच्या काळात महिलांना पोटात दुखणे, पाठदुखी, कंबरदुखी, पायात गोळे येणे, चक्कर आणि अशक्तपणा असे अनेक त्रास जाणवतात. ज्यामुळे मासिक पाळीच्या काळात महिलांनी जास्तीत जास्त आराम करावा असा सल्ला देण्यात येतो. मासिक पाळीचा त्रास कमी करण्यासाठी अनेक घरगुती उपाय केले जातात. पण तुम्हाला माहीत आहे का धावण्याचा व्यायाम केल्यामुळेही तुमच्या मासिक पाळीच्या समस्या कमी होऊ शकतात. 

ओळखा मासिक पाळी येण्याची लक्षणे (Masik Pali Yenyachi Lakshane)

मासिक पाळीच्या काळात धावणं का आहे गरजेचं 

धावण्याचा व्यायाम हा मासिक पाळीच्या काळातील समस्या दूर करण्यासाठी रामबाण उपाय ठरू शकतो. कारण धावण्याचे तुमच्या शरीरावर अनेक चांगले फायदे होतात. कदाचित हे ऐकून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल कारण जिथे मासिक पाळी सुरू असताना चालणं कठीण होतं तिथे धावण्याचा व्यायाम कसा करावा असंही तुम्हाला वाटू शकतं. मात्र एका संशोधनात असं आढळून आलं आहे की या काळात धावण्यामुळे तुमच्या शरीराला चांगला व्यायाम मिळतो ज्यामुळे तुमच्या मासिक पाळीच्या समस्या कमी होतात. या संशोधनानुसार मासिक पाळीच्या काळात महिलांनी आठवड्यातून तीनदा कमीत कमी पंचेचाळीस मिनीटे धावण्याचा व्यायाम करावा असं सांगण्यात आलेलं आहे.

मासिक पाळीच्या काळात धावण्याचे फायदे

Can running during periods help relieve painful cramps in Marathi

मासिक पाळीच्या काळात धावण्याचा व्यायाम केल्याने तुमच्या शरीर आणि मनावर चांगले परिणाम होतात.

ADVERTISEMENT

तुमचा मूड सुधारतो

धावणे हा एक साधा आणि सोपा व्यायाम आहे. पण याचा जसा तुमच्या शरीरावर चांगला परिणाम होतो तसाच यामुळे तुमच्या मनावरही चांगलाच परिणाम होतो. मासिक पाळीच्या काळात होणाऱ्या हॉर्मोनल बदलांमुळे तुमची मनःस्थिती बिघडते. ज्यामुळे सतत चिडचिड आणि कंटाळा तुम्हाला येतो. मात्र या काळात धावण्याचा व्यायाम केल्यामुळे धावण्यामुळे तुमची मनःस्थिती चांगली राहण्यास मदत होते.

पेल्विक मसल्सला व्यायाम मिळतो

मासिक पाळीच्या काळात मांड्या, पाय, पोटऱ्या दुखणे आणि क्रॅम्प येणे हे नैसर्गिक आहे. मात्र जर तुम्ही या काळात धावण्याचा व्यायाम केला तर तुमच्या पेल्विक मसल्सला चांगला व्यायाम मिळतो. ज्यामुळे मासिक पाळीतील क्रॅम्प कमी होतात. याचे महत्त्वाचे कारण जेव्हा तुम्ही धावता तेव्हा तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. ज्यामुळे अंगदुखीपासून चांगला आराम मिळतो. 

उत्साहित वाटते 

मासिक पाळीच्या काळात महिलांना खूपच अशक्तपणा आणि थकवा येतो. ज्यामुळे मासिक पाळी येण्याआधी आणि नंतर काही दिवस सतत कंटाळवाणं वाटू लागतं. मात्र जर तु्म्ही नियमित धावण्याचा व्यायाम करत असाल तर तुम्हाला मासिक पाळीच्या काळातही ताजेतवाने आणि उत्साही वाटू शकते. यासाठीच शरीराला धावणे, चालणे, सायकल चालवणे असे अरोबिक्स व्यायाम करण्याची गरज असते. 

मासिक पाळीतील वेदना दूर करण्यासाठी घरगुती उपाय (How To Reduce Menstrual Pain In Marathi)

ADVERTISEMENT

मासिक पाळीच्या काळात धावताना काय काळजी घ्याल

धावण्याचा व्यायाम शरीरासाठी उपयोगी असण्यामुळे नियमित करावा. मात्र जेव्हा तुम्ही मासिक पाळीच्या काळात धावाल तेव्हा काही गोष्टी नीट लक्षात ठेवा.

  • धावण्यामुळे घामावाटे शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे धावण्यासाठी जाण्यापूर्वी नारळपाणी अथवा इलेक्ट्रोलेट मिळतील असं ड्रिंक जरूर प्या.
  • धावण्याचा व्यायाम महिनाभर नियमित करा. फक्त मासिक पाळीच्या काळात धावण्यासाठी जाऊ नका.,
  • धावण्यापूर्वी थोडा स्ट्रेचिंग एक्सरसाईज करा ज्यामुळे शरीरावर जास्त ताण येणार नाही.
  • धावताना तुमचा वेग नियंत्रित ठेवा. मासिक पाळीच्या काळात जास्त वेगाने धावण्याचा सराव करू नका.
  • मासिक पाळीच्या स्वतःची योग्य स्वच्छता राखा. धावताना सॅनिटरी पॅडमुळे रॅशेस येऊ नये यासाठी तुम्ही टॅम्पॉन अथवा मेनस्ट्रुल कप वापरू शकता. 
  • योग्य आणि संतुलित आहार घ्या आणि भरपूर पाणी प्या. ‘एरोबिक’ चे हे व्यायाम प्रकार तुम्हाला स्वस्त ठेवतील (Best Aerobic Exercises In Marathi)
25 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT