ADVERTISEMENT
home / खाणंपिण आणि नाइटलाईफ
corn_recipe_fb

पावसाळ्यात घरीच बनवा मस्त गरम गरम चटपटा कॉर्न

 बाहेर मस्त पाऊस पडत असेल तर अशावेळी घरात गरम गरम काहीतरी खाण्याची इच्छा नक्कीच होते.  गरमा गरम कांदा भजी, बटाटा भजी आणि काजू भाजून खाण्याची मजा ही काहीतरी वेगळीच असते. पण या दिवसात सगळ्यात जास्त भाव खाऊन जातो तो म्हणजे मका… मका मस्त भाजून त्याला मीठ- लिंबू लावून खायला जो आनंद मिळतो. तो आनंद कशातही नाही. याशिवाय मका हा उकडूनही खाता येतो. हल्ली पांढरा मका हा गायब झाला आहे. पण बाजारात अमेरिकन कॉर्न म्हणजेच पिवळे मके मिळतात. या मक्याचा वापर करुन मस्त चटपटा कॉर्न बनवता येतो. वेगवेगळ्या पद्धतीने हे कॉर्न बनवले तर ते मस्तच लागतात.

शेजवान कॉर्न

शेजवान कॉर्न

शेजवान हा सध्याचा सगळ्यांचा आवडता असा फ्लेवर आहे. त्यामुळे खूप जण शेजवान सॉस किंवा पावडर अनेक ठिकाणी घालतात. कॉर्नमध्येही तुम्हाला हा फ्लेवर खूपच जास्त चांगला लागतो. 

साहित्य: वाफवलेले पिवळे कॉर्न, मीठ, सोया सॉस, बटर, शेजवान पावडर
 कृती : एका कढईत बटर गरम करुन  त्यामध्ये तुम्ही सोया सॉस आणि शेजवान पावडर घालून छान परतून घ्या. हा एक सॉस सारखा व्हायला हवा. त्यामध्ये कॉर्न घालून तुम्ही आवश्यकतेनुसार मीठ घाला. मस्त गरम गरम कॉर्न सर्व्ह करा.

टीप:  जर तुम्हाला काहीतरी चटपटीत हवे असेल तर याला कॉर्नफ्लॉवरमध्ये कोट करुन तळा आणि मग कॉर्न सॉसमध्ये टाका.

ADVERTISEMENT

चिली- गार्लिक कॉर्न्स

चिली- गार्लिक कॉर्न्स

चिली- गार्लिक ब्रेड हा आपण सगळेच खातो. याचा फ्लेवर हा आपल्याला आवडेल असा आहे. चिली-गार्लिक फ्लेवरमध्ये कॉर्नसुद्धा चांगले लागतात.चला ट्राय करुया असे मस्त चिली-गार्लिक कॉर्न्स 

साहित्य: उकडलेले कॉर्न्स, चिली पावडर, बटर आणि गार्लिक पावडर 

कृती: एका मोठ्या भांड्यात कॉर्न घेऊन त्यामध्ये मोठा चमचा बटर, चिली पावडर, गार्लिक पावडर घालून एकजीव करुन घ्यावे. त्यावर पातीचा कांदा किंवा कोथिंबीर घालून ते मस्त सर्व्ह करावे.

मसाला कॉर्न

मसाला कॉर्न

सगळ्यात बेसिक आणि पटकन करता येईल असा कॉर्नचा हा प्रकार आहे. भेळला पर्याय हवा असेल तर तुम्हाला अगदी कधीही हा पर्याय ट्राय करता येऊ शकतो. 

ADVERTISEMENT

साहित्य: कॉर्न्स, लाल तिखट, गरम मसाला, चिली पावडर, लिंबाचा रस, बटर आणि चाट मसाला 

कृती: मसाला कॉर्न हे कायम चटपटीत असतात.त्यामुळे मसाले थोडे जास्त घातले तर ते अधिक चांगले लागतात.सगळे साहित्य एकत्र करुन मग ते सर्व्ह करा. 

आता घरीच बाजारात मिळणारे असे कॉर्न नक्कीच बनवा.

19 Jun 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT