ADVERTISEMENT
home / Skin Care Products
बांबू-चारकोल फेशिअल त्वचेवर एकाच वापरात आणेल ग्लो

बांबू-चारकोल फेशिअल त्वचेवर एकाच वापरात आणेल ग्लो

बाजारात वेगवेगळे फेशिअल किट मिळतात. त्यापैकी कोणता फेशिअल किट निवडायचा असा अनेकांना प्रश्न असतो. फ्रुट फेशिअल, गोल्ड फेशिअल, स्किन लाईटनिंग फेशिअल किट असे वेगवेगळे प्रकार मिळतात. पण आता नव्याने अनेक कोरिअन ब्युटी ट्रिटमेंट आणि त्यांच्या काही खास सिक्रेट्सचा समावेश करत काही खास प्रॉडक्ट तयार करण्यात आले आहे. उदा. चारकोल, बांबू, लोट्स, रोझ अशा काही खास गोष्टींचे अर्क घालून काही खास स्किनकेअर तयार केले जातात. जर तुम्हाला त्वचेवर झटपट ग्लो हवा असेल तर तुम्ही नव्याने बाजारात आलेले बांबू- चारकोल फेशिअल किट नक्कीच ट्राय करायला हवे. त्याचे नेमके फायदे काय आणि त्याचा वापर नेमका कसा करावा हे जाणून घेऊया.

किशोरवयीन मुलींनी कधी सुरु करावं वॅक्सिंग अथवा थ्रेडिंग

चारकोल- बांबूचे त्वेचसाठी फायदे

चारकोल- बांबूचे त्वेचसाठी फायदे

Instagram

ADVERTISEMENT

चारकोल अर्थात कोळसा आणि ओल्या बांबूचा अर्क वापरुन काही फेशिअल किट तयार केले जातात.  चारकोल मास्कचे वेगवेगळे प्रकार तुम्ही आतापर्यंत पाहिले असतील. चारकोलच्या वापरामुळे त्वचेतून धूळ, घाण काढण्यास मदत मिळते. चारकोलमध्ये असलेले ऑक्सिडाईजिंग घटक त्वचा चांगली ठेवण्यास मदत करते.  तर बांबूमुळे त्वचा मॉश्चराईज होण्यास मदत मिळते. बांबूमुळे त्वचेला ग्लो मिळतो. त्वचा इन्स्टंट ग्लो होण्याऐवजी तिचा ग्लो जास्त काळासाठी टिकतो. त्वचा अधिक सुंदर आणि चांगली दिसू लागते. चारकोल- बांबूच्या कॉम्बिनेशनमुळे त्वचा स्वच्छ होते, पिंपल्स कमी होतात, त्वचेवरील पोअर्स कमी होतात, त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. 

सुंदर त्वचेसाठी असे आहे ऑलिव्ह ऑईल फायदेशीर

असे करा चारकोल- बांबू फेशिअल

चारकोल- बांबू फेशिअल

Instagram

ADVERTISEMENT

चारकोल-बांबू फेशिअलचे फायदे वाचून जर तुम्ही हे फेशिअल करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला बाजारात रेडिमेड फेशिअल किट मिळतील ज्यांचा वापर करणे फारच सोपे आहे. 

  1. योग्य कंपनीचे असे फेशिअल निवडल्यानंतर सगळ्यात आधी क्लिन्झरने चेहरा स्वच्छ करुन घ्या.  हे क्लिन्झर थोडे वेगळे असते. याचा रंग चारकोलमुळे काळा असतो.
  2.  क्लिन्झिंगनंतर चारकोल आणि बांबूचे बारीक कण असलेल्या जेली सदृश्य स्क्रबने चेहऱ्यावरील मृत त्वचा काढून टाका. साधारण 2- 3 मिनिटे चेहरा स्क्रब करा. 
  3. चेहऱ्यावरील स्क्रब काढून आता मसाज जेल किंवा मसाज क्रिम जे असेल त्याने चेहऱ्यावर छान मसाज करा. हा मसाज करणे तसे सोपे असते. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने चेहऱ्यावर मसाज करुन घ्या. मसाज करताना गाल, डोळ्यांच्या आजुबाजूला मसाज करायला मुळीच विसरु नका. 
  4. जर तुमच्या त्वचेला वाफ घेण्याची गरज असेल तर तुम्ही थोडी वाफ घ्या. चेहरा स्वच्छ करा. आणि मग चारकोल- बांबू मास्क लावा. हा मास्क काळा असतो. त्यामुळे तुम्हाला तो साधारण चारकोल मास्कसारखा वाटेल. पण हा मास्क चांगलाच खरखरीत लागतो. 
  5. फेसपॅक वाळल्यानंतर चेहऱ्याला थोडेसे पाणी लावून हा मास्क  काढून टाका. चेहरा हलक्या हाताने पुसून घ्या.  

हे फेशिअल करायला फारसा वेळ लागत नाही. साधारण 30 मिनिटांच्या आत हे क्विक फेशिअल करता येते. त्यामुळे तुम्ही हे फेशिअल महिन्यातून एकदा करायला काहीच हरकत नाही. काही खास कार्यक्रमांसाठी तुम्हाला हे फेशिअल करण्यास काहीच हरकत नाही. 

अळीवने करा केस गळणे कमी, असा करा उपाय

21 Feb 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT