संपूर्ण जगभरात मार्व्हल युनिव्हर्सचे जबरा फॅन्स पसरले आहेत. भारतातही मार्व्हलचे वेड दिवसेंदिवस वाढत चालले आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या डॉक्टर स्ट्रेंज इन मल्टिव्हर्स ऑफ मॅडनेसला भारतात प्रचंड प्रतिसाद मिळाला. आणि लोक आता थॉर लव्ह अँड थंडरची आतुरतेने वाट बघत आहेत. मार्व्हल फॅन्सना मार्व्हल युनिव्हर्समधील गार्डीयन्स ऑफ द गॅलॅक्सीची पात्रे देखील खूप आवडतात. रॉकेट,गमोरा, ड्रॅक्स, ग्रूट, मॅंटिस, नेब्युला आणि स्टार लॉर्डला लोकांचे भरभरून प्रेम मिळाले. त्यातील ख्रिस प्रॅट हा ज्युरासिक वर्ल्डमधील ओवेन म्हणून आधीच प्रसिद्ध होता. गार्डीयन्स ऑफ द गॅलॅक्सीमध्ये केलेल्या स्टार लॉर्डच्या भूमिकेने तो घराघरांत पोचला. अलीकडेच ख्रिस प्रॅटची द टर्मिनल लिस्ट नावाची ऍक्शन थ्रिलर टीव्ही सिरीज रिलीज झाली आहे.
लोकप्रिय हॉलिवूड अभिनेता ख्रिस प्रॅट आणि बॉलिवूडचा हार्टथ्रोब सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यात बरेच साम्य आहे. दोघांनाही भारतीय जेवण आवडते, दोघेही पूर्ण फिटनेस फ्रिक आहेत आणि त्यांनी पडद्यावर सशस्त्र दलाच्या अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे! बहुप्रतीक्षित Amazon Original Series The Terminal List च्या लॉन्च वीकेंडला या दोन लोकप्रिय स्टार्समध्ये चर्चा झाली. Amazon च्या शेरशाहमध्ये सिद्धार्थने कारगिल युद्ध-नायक कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका केली होती तर ख्रिस प्रॅटने टर्मिनल लिस्टमध्ये यूएस नेव्ही सील जेम्स रीसची भूमिका केली आहे.
ख्रिसला गंभीर भूमिका करताना पाहून सिद्धार्थला वाटले आश्चर्य
‘द टर्मिनल लिस्ट’ निमित्त आयोजित केलेल्या हा खास चर्चेत ख्रिसला गंभीर भूमिकेत पाहून सिद्धार्थने आश्चर्य व्यक्त केले. सिद्धार्थ ख्रिसला म्हणाला “तुला अशा प्रकारच्या भूमिकेत पाहून आश्चर्य वाटले. ट्रेलर पाहताना मला वाटले की आता आम्हाला मस्त एखादा विनोद ऐकायला मिळेल”. ख्रिसने सिद्धार्थच्या विधानाशी सहमती दर्शवली आणि म्हणाला, “हे खरे आहे की जेव्हाही लोक मला चित्रपटात पाहतात तेव्हा माझ्याकडून विनोद किंवा प्रॅन्कची अपेक्षा करतात. पण टर्मिनल लिस्ट ही मालिका नक्कीच तशी नाही आणि मालिकेच्या पायलट एपिसोडपासूनच तुम्हाला ते कळेल.”
ऍमेझॉन प्राईमवर रिलीज झाला व्हिडीओ
ऍमेझॉन प्राइम व्हिडिओवर शनिवारी एक नवीन व्हिडिओ शेअर करण्यात आला, ज्यामध्ये ख्रिस प्रॅट आणि सिद्धार्थ मल्होत्रा एकमेकांशी गप्पा मारताना दिसत आहेत. सिद्धार्थने ख्रिसला ‘शेरशाह’ हा चित्रपट शक्य तितका अस्सल बनवण्यासाठी केलेल्या सर्व गोष्टींबद्दल सांगितले. सिद्धार्थने कारगिलमधील ‘शेरशाह’च्या शूटिंगचा अनुभव आणि भारतीय लष्कराचा गणवेश परिधान केल्यानंतर त्याला देशाप्रती जाणवलेली जबाबदारीही शेअर केली. यासोबतच सिद्धार्थने ख्रिस प्रॅटला ‘द टर्मिनल लिस्ट’साठी कशी तयारी केली हे शेअर करण्यास सांगितले.
ख्रिस प्रॅटने ‘द टर्मिनल लिस्ट’चे लेखक जॅक कार हे नेव्ही सील असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांना लढायांचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांनी ही कथा अतिशय सुंदरपणे रचली आहे. त्याने सांगितले की, “सीरियाच्या बोगद्यांमधील युद्ध दाखवणाऱ्या पहिल्या एपिसोडमध्ये आम्ही नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांना कास्ट केले होते. त्यांना या सगळ्याच्या प्रत्यक्ष अनुभव असल्याने त्यांना अभिनयकौशल्याशिवाय इतर काही सांगण्याची गरजच पडली नाही.”
ख्रिसने व्यक्त केली सिद्धार्थबरोबर काम करण्याची इच्छा
त्यांच्या संभाषणादरम्यान सिद्धार्थने ख्रिसला सांगितले की, त्याला ऍक्शन आवडते. याकडे ख्रिसने सिद्धार्थच्या बायसेप्सकडे लक्ष वेधले आणि तो म्हणाला, “तू नक्कीच ऍक्शन हिरो आहेस आणि आपण एकत्र काम केले पाहिजे.” या व्हिडीओमध्ये दोघेही अनेक मजेदार खेळ खेळताना दिसले. ख्रिस प्रॅटला भारतीय जेवण खूप आवडते, त्यामुळे त्याने सिद्धार्थला वचन दिले की तो जर भारतात ऍक्शन चित्रपटाच्या शूटिंगसाठी आला तर तो सिद्धार्थसोबत नक्कीच भेजा फ्रायची मजा घेईल.
‘द टर्मिनल लिस्ट’ ही मालिका 1 जुलैपासून Amazon प्राइम व्हिडिओवर रिलीज झाली आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक