ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
copper

कॉपर ज्वेलरी ज्या दिसतात खूपच सुंदर, नक्की करा ट्राय

ना चाहू सोना चांदी… ना चाहू हिरा मोती…. म्हणूनच घालूया कॉपर ज्वेलरी. तुम्हालाही ज्वेलरी घालायला तुम्हाला आवडत असेल तर सध्या सुरु असलेला कॉपर ज्वेलरीचा ट्रेंड तुम्ही अगदी नक्कीच ट्राय करायला हवा. सध्या तुम्हाला सगळीकडे कॉपर ज्वेलरी पाहायला मिळतात. खूप जणांना इमिटेशन ज्वेलरीमधील गोल्ड किंवा सिल्व्हर ज्वेलरी आवडत नाही. अशावेळी तुम्हाला कॉपर ज्वेलरी या सुंदर दिसतात. याची चमक इतकी सटल असते की, त्यामुळे कोणत्याही साडीवर या ज्वेलरी चांगल्याच उठून दिसतात. कॉपर ज्वेलरीचे कोणकोणते प्रकार तुम्ही ट्राय करायला हवेत ते आता जाणून घेऊया.

कॉपर झुमकी

कॉपर ज्वेलरी

 झुमकी हा पर्याय एव्हरग्रीन असा पर्याय आहे. लग्नाचे कपडे असो किंवा कोणतेही फॅमिली फंक्शन असो झुमकी या कशावरही खूपच सुंदर दिसतात. त्यातच कॉपरमधील झुमकी या तुम्हाला मस्त असा रस्टी लुक देत असतात. त्यामुळे अशाप्रकारच्या रस्टी लुक देणाऱ्या कॉपर झुमकी तुम्ही अगदी नक्की ट्राय करायला हव्यात. हल्ली कॉपरमध्ये साड्या देखील मिळतात. या साड्यांवर किंवा तुमच्या कोणत्याही प्लेन साडीवर तुम्हाला मस्त अशा कॉपर ज्वेलरी घालता येतात.

कॉपर नेक पीस

तुम्ही साडी नेसणारे असाल तर तुम्हाला अगदी हमखास ट्रेंडी अशी  ज्वेलरी घालणारे असाल तर तुम्ही कॉपरमध्ये मिळणारे नेकपीस ट्राय करायला हवेत. हे नेकपीस तुम्हाला चोकर आणि लाँग वेअर अशा दोघांमध्ये मिळतात. त्यामुळे तुम्हाला ते कशावरही घालता येतील. इतकेच नाही तर अगदी शर्ट पँट असा जरी तुमचा अटायर असेल तरी देखील तुम्हाला हे नेकपीस घालता येतात.

लक्ष्मी हार

 या नेकपीसमध्येही तुम्हाला विविध असे प्रकार मिळतात. ते देखील तुम्हाला ट्राय करता येतात. कोणत्या ज्वेलरी कशावर ट्राय करायच्या त्यासाठी हे छोटसं मार्गदर्सन 

ADVERTISEMENT
  1. बोरमाळ: बोरमाळ ही सध्या चांगलीच ट्रेंडमध्ये आहे. खूप जणांना या बोरमाळ आवडतात. साड्यांवर अन्य कोणताही दागिना न घालता जर तुम्ही कॉपरचा रंग असलेली बोरमाळ घातली तर ती अधिक चांगली खुलून दिसते. बोरमाळमध्येही तुम्हाला हल्ली बरीच व्हरायची मिळते. यामध्ये वेगवेगळे लेअर्स असतात. आणि त्यावर नक्षीकाम केलेले असते. पण बोरमाळ जितकी प्लेन असेल तितकी ती अधिक चांगली दिसते. 
  2. चोकर: ज्या ब्लाऊजचे गळे मोठे असतील अशा मोठ्या गळ्यांच्या साड्यांवर किंवा ड्रेसवर तुम्हाला असे चोकर उठून दिसतात.यामुळे तुम्ही उंच दिसता. जर तुमच्या ब्लाऊजचा गळा खूप डिप असेल तर असे फॅन्सी टाईट चोकर तुम्ही नक्की निवडा. 
  3. लक्ष्मीहार: आपल्या रोजच्या लक्ष्मीहारमध्ये तुम्हाला असा काही वेगळेपणा हवा असेल तर तुम्हाला नक्कीच लक्ष्मीहार हा वापरता येईल. लक्ष्मीहार हा सध्याच्या साऊथ इंडियन ज्वेलरीचा ट्रेंड आहे. तो देखील तुम्हाला कॅरी करता येईल. लक्ष्मीहार प्रमाणे तुम्हाला हत्ती हार किंवा असा काही प्रकार सुद्धा मिळतो तो देखील तुम्ही ट्राय करु शकता. 

कॉपर ज्वेलरी हा ट्रेंड या लग्नाच्या सीझनमध्ये तुम्ही नक्की ट्राय करायला हवा. 

27 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT