ADVERTISEMENT
home / Festive
difference between sharara and gharara in Marathi

शरारा आणि घरारामध्ये नेमका काय असतो फरक

लग्नासाठी शॉपिंग करायची आहे, दिवाळीसाठी परफेक्ट दिसायचं आहे, एखाद्या पारंपरिक पार्टीसाठी खास लुक करायचा आहे असं असतं तेव्हा सर्वात आधी तरूणींच्या डोळ्यांसमोर नाव येतं शरारा अथवा घरारा… कारण हा लुक करणं सोपं असतं आणि कॅरी करण्यास मुळीच त्रास होत नाही. मात्र एवढे लोकप्रिय आऊटफिट असूनही अनेकांना आजही शरारा आणि घरारा मधील नेमका फरक माहीत नसतो. यासाठीच आम्ही तुम्हाला या खास आऊटफिटविषयी थोडी माहिती देणार आहोत. वास्तविक शरारा असो वा घरारा तुम्ही एखाद्या शॉर्ट अथवा लॉंग कुर्तीसोबत मिक्स मॅच करू शकता. कारण हे दोन्ही बॉटमविअर तुम्ही हवे तसे हवे तेव्हा परिधान करून स्टायलिश दिसू शकता. पण असलं तरी एकसमान दिसणाऱ्या या दोन्ही आऊटफिटमध्ये थोडा फरक नक्की असतो. स्टाईल करण्याआधी तो जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

शरारा 

शरारा हा एक पारंपरिक वेडिंग आऊटफिट म्हणून लोकप्रिय आहे. वास्तविक पूर्वी शरारा मुघल काळातील महिला परिधान करत असत. त्यामुळे या आऊटफिटवर लखनऊ शहराची छाप दिसून येते. कारण लखनऊमध्ये आजही मुघल कालीन पेहरावाचा प्रभाव दिसून येतो. एखाद्या पॅंटप्रमाणे तुम्हाला शरारा परिधान करता येतो. कंबरेकडे घट्ट आणि पायाच्या दिशेने घेरदार असा हा पेहराव असतो. तुम्ही एखाद्या क्रॉप टॉप अथवा ब्लाऊजसोबत शरारा परिधान करू शकता. थोडा एलिगंट लुक हवा तर यासोबत एखादा शॉर्ट कुर्ता तुम्ही पेअर करू शकता. अनेक चित्रपटांमध्ये शराराचा लुक अभिनेत्रींनी केलेला दिसून येतो.ज्यामुळे आजही फॅशन इंडस्ट्रीमध्ये शराराचा ट्रेंड इन आहे.

घरारा 

शराराप्रमाणेच घरारा देखील वेडिंग आऊटफिट अथवा एथनिक लुक म्हणून लोकप्रिय आहे.घरारा हा नवाब लोकांमधील खानदानी पोषाख समजला जायचा. घरारा गुडघ्यापर्यंत घट्ट आणि त्यानंतर घेरदार असतो.घरारा आकर्षक दिसण्यासाठी गुडघ्यावर गोटापट्टी अथवा डिझाइनचा वापर केला जातो. घरारा बनवण्यासाठी अकरा ते बारा मीटर कापड वापरले जाते.पूर्वीच्या काळी रेशमी कापडाचे घरारे शिवले जात असत. आता पुन्हा एकदा घराराची फॅशन ट्रेंडमध्ये आहे. घरारादेखील शॉर्ट कुर्ती  पेअर करता येतो. आजकाल तरूण मुलींमध्ये घरारा घालण्याची आवड जास्त प्रमाणात दिसून येते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार रंग, कापड, डिझाइन घरारा शिवण्यासाठी निवडू शकता.

आम्ही शेअर केलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा.

ADVERTISEMENT
07 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT