ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
साखरपुड्यासाठी अंगठी डिझाईन्स

साखरपुड्यासाठी निवडा अंगठीच्या या सुंदर डिझाईन्स

 साखरपुडा हा असा दिवस असतो ज्या दिवशी आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब होतो. आयुष्यात येणारा हा क्षण लक्षात राहावा यासाठी आपण बरेच काही करतो. हा दिवस लक्षात राहण्याची आणखी एक खूण म्हणजे नवरा- नवरीच्या हातात घातली जाणारी अंगठी. ही अंगठी खूप खास आणि जवळची असते. साखरपुड्यासाठी तुम्हाला खास अंगठी डिझाईन हवी असेल तर आम्ही काही छान, सुंदर अशा साखरपुड्याच्या रिंग्ज डिझाईन तुमच्यासाठी शोधून काढल्या आहेत.
साखरपुड्याच्या अंगठ्या या सोन्यात आणि हल्ली प्लॅटिनममध्ये घडवल्या जातात. त्यामध्ये हल्ली हिरेदेखील बसवले जातात. त्यामुळे अंगठीची शोभा अधिक जास्त वाढते. 

कपल बँड

कपल बँड

हल्ली सगळ्यांना कपल बँड्स घालायला आवडतात. नवरा आणि नवरीच्या रिंग्ज या सारख्या दिसतील अशा असतात. कपल बँडस निवडण्यामागे कारण इतके की,त्या सहज घालता येतात. कपल बँड्सच्या डिझाईन्स या सोप्या आणि साध्या असतात. तुम्हाला नुसता बँड नको असेल तर तुम्ही त्यामध्ये खडे देखील घालू शकता. मुलांपेक्षा मुलींच्या म्हणजेच होणाऱ्या ब्राईडची रिंग ही जास्त पाहिली जाते. त्यामुळे तुमची अंगठी ही स्पेशल असायला हवी. त्यामुळे तुम्ही हा कपल बँड निवडताना तुम्ही त्याची योग्य ननिवड करायला हवी. 

क्राऊन रिंग

क्राऊन रिंग

तुम्हाला थोडी ड्रिमी आणि क्युट अशी अंगठी हवी असेल तर तुम्ही छान क्राऊन रिंग देखील निवडू शकता. क्राऊन रिंग ही दिसायला खूपच सुंदर असते. तुमच्या बोटाला शोभेल असा छान क्राऊनचा आकार असतो. आता ही रिंग सोन्यात अजिबात चांगली दिसत नाही. जर तुम्हाला अशी रिंग हवी असेल तर ती तुम्ही अमेरिकम डायमंड किंवा खऱ्या डायमंडमध्ये घडवून घ्या. तर ती अधिक सुंदर दिसते. क्राऊन रिंगचा एक सेट येतो ज्यामध्ये तुम्हाला त्यासोबत एक दुसरी रिंगही दिली जाते. ही एक पेअर रिंग असते. ज्यामुळे त्याची शोभा वाढण्यास मदत मिळते.

सिंगल स्टोन रिंग

सिंगल स्टोन रिंग

हल्ली खूप मुलींना सोनं दिसेल अशा रिंग्ज अजिबात आवडत नाहीत. खूप मोठ्या रिंग्ज घालायलाही खूप जणांना आवडत नाही. अशावेळी तुम्हाला अंगठीची अशी डिझाईन्स नक्कीच करता येईल. सिंगल स्टोन अंगठी ही तुम्हाला मोठ्या किंवा तुम्हाला आवडेल अशा आकाराच्या स्टोनमध्ये नक्कीच करता येते. हिऱ्याची किंमत त्याच्या कॅरेटवर अवलंबून असते. हिरा जितका मोठा तेवढी त्याची किंमत जास्त असते. त्यामुळे तुमच्या बजेटनुसार तुम्ही त्याची निवड करु शकता.

ADVERTISEMENT

गोल्ड स्टोन रिंग

गोल्ड स्टोन रिंग

तुम्हाला प्लॅटिनम रिंग नको असेल तुम्ही वरील सगळ्या डिझाईन्स सोन्यामध्ये देखील करु शकता. सोन्यामध्ये तुम्हाला अंगठी करायची असेल तर तुम्ही त्यामध्ये स्टोन देखील बसवू शकता. अशा अंगठी देखील दिसायला खूप सुंदर दिसतात.  तुम्हाला पातळ, जाड अशा कोणत्याही स्वरुपात अंगठी करता येऊ शकते. 

आता साखरपुड्यासाठी अंगठी बनवायची असेल तर या अंगठी डिझाईन्स तुम्ही नक्की ट्राय करायला हव्यात

08 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT