सलॉनमध्ये जाऊन कितीही वेळा खर्चिक मॅनिक्युअर केले तरीही घरगुती मॅनिक्युअर सेशन्सची मजाच काही वेगळी आहे. तिथे आपली क्रिएटिव्हिटी नक्कीच पणाला लागते, खरं आहे ना? माझ्यासाठी वेगवेगळे मॅनिक्युअर बदलण्यापासून ते माझ्या मूडप्रमाणे वेगळे नेलकलर्स लावण्यापर्यंत आणि माझ्या नखांची काळजी घेताना माझ्या मनाप्रमाणे काळजी घेणे हे सगळंच त्यामध्ये येतं. पण हेदेखील खरं आहे की, जेव्हा माझ्या मूडप्रमाणे एखादा रंग मला मिळत नसेल तर मग मात्र संपूर्ण दिवस खराब जातो.
मागच्याच आठवड्यात माझ्या मैत्रिणीच्या घरी मला पार्टीला जाण्यासाठी तयार व्हायचं होतं आणि मी घातलेल्या ड्रेसला मॅच होणारे नेलपेंट अतिशय कंटाळवाणे दिसत होते. इतकंच नाही तर मला पटकन नेल अपॉईंटमेंटदेखील मिळत नव्हती (कारण त्यासाठी वेळ लागला असता) तर मला योग्य बोल्ड शेड पण मिळत नव्हती. पण या सगळ्यापासून मला वाचवलं ते माझ्या नव्या मिनी नेल पेंट किटने, पॉपएक्सओ मेकअप कलेक्शनच्या या किटने कमाल केली.
काय आहे हे?
POPxo मेकअप कलेक्शनने प्रत्येक 5 शेड्सच्या सेटचे नेल पेंट किट्स बाजारात आणले आहे. आहे ना कमाल? Hustlin’ हे त्यापैकीच एक आहे. यामध्ये 5 बोल्ड आणि निऑन शेड्स असून हे लावणे म्हणजे मजाच आहे. निऑन ग्रीन, ब्राईट यलो, पॉपी पिंक, स्टनिंग ऑरेंज आणि बेरी पर्पल अशा या शेड्स आहेत.
आम्हाला हे का आवडले?
तुम्हालादेखील पॅकेजिंग बघायला आवडत असेल माझ्यासारखे तरत तुम्हाला तुमच्या वॅनिटीमध्ये याचा समावेश करून घ्यायलाच हवा. हे सर्व 3 पेंट किट्स अतिशय सुंदर अशा गुलाबी पॅकेजिंग आणि पारदर्शक कव्हरमध्ये येतात. तुम्ही जेव्हा पॅक उघडता तेव्हा यामध्ये तुम्हाला आवडतील अशा पाच मिनी नेलपेंट्सच्या शेड्स मिळतात. मी जेव्हा पहिल्यांदा बॉक्स उघडला तेव्हा माझ्या मनात पहिले विचार आला तो म्हणजे हे प्रवासातही तुम्ही घेऊन जाऊ शकता.
प्रत्येक पॅकमध्ये मिनी नेलपेंट असून याची किंमत फक्त रू. 249 इतकी आहे. तुमचे बोल्ड मेनिक्युअरचे प्रॉब्लेम पटकन सुटले असं तुम्हालाही वाटतंय ना? 5 नेलपेंट शेड्स या अतिशय खिशाला परवतील अशा किमतीत तुम्हाला मिळतात. पैशांचे मूल्य राखल्याची जाणीव होते. तसंच ही छोटी छोटी नेलपेंट्स तुम्हाला नक्कीच हवीशी वाटतील. हे नॉनटॉक्झिक, चिप रेझिस्टंट फॉर्म्युलेशन असून जास्त दिवस टिकते. तसंच याचा ब्रशही उत्तम आहे. यापेक्षा अधिक चांगलं काय हवंय?
रेटिंग
कलर पे ऑफ – 10/10
पॅकेजिंग – 9/10
फॉर्म्युला – 10/10
कसे वापरावे
तुमची नखं कापून, फाईलिंग करून घ्या. क्युटिकल्स बाहेर आले असतील तर ते आतमध्ये ढकलून व्यवस्थित आकार द्या. जुने नेलपॉलिश असेल तर काढून टाका. मध्यभागापासून तुमच्या नखांना लावायला सुरूवात करा. त्यानंतर बाजूच्या भागाला फॅशननुसार लावा. तुम्हाला आवश्यक वाटल्यास, सेकंड कोट लावा. जास्त नेलपेंट लागले असेल तर नेलपेंट रिमूव्हिंग सॉल्युशनने स्वच्छ करून घ्या.
हे उत्पादन कसे दिसते?
कसली वाट पाहताय? स्टॉकमधून संपण्यापूर्वी तुम्ही Huslin’ मिनी नेल पॉलिश किट तुमच्या कार्टमध्ये नक्की अॅड करा! त्वरा करा!
फिचर इमेज – Rimsha Shaikh
तुमच्यासह सौंदर्याचे भविष्य निर्माण करण्यासाठी POPxo आणि MyGlamm दोघेही एकत्र आले आहेत! तुम्हीही The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि MyGlamm कडून मोफत लिपस्टिकसह मिळवा रू. 1000 चे ब्युटी बेनिफिट्स!