निरोगी राहण्यासाठी व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे. योग्य व्यायाम आणि ते करण्याचा योग्य मार्ग आपल्याला माहित असेल तर आपला जास्तीत जास्त फायदा होतो. तुम्ही स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी अनेक प्रकारचे व्यायाम करू शकता, परंतु जर तुम्हाला तुमच्या लोअर बॉडीवर काम करायचे असेल तर तुम्ही डक वॉक हा व्यायाम करू शकता. डक वॉक हा व्यायाम रिव्हर्स लंज, स्क्वॅट्स, क्रॅब वॉक, फॉरवर्ड लंज सारखाच एक व्यायाम आहे कारण तो तुमच्या नितंबांवर आणि मांड्यांवर अधिक जोर देतो. हा व्यायाम करणे चांगले मानले जाते कारण ग्लूट्स आणि मांडीचे स्नायू हे मोठे स्नायू आहेत ज्यांचा व्यायाम करणे सहसा कठीण असते. डक वॉक हा व्यायाम करून या स्नायूंवर लक्ष केंद्रित करणे आणि त्यांना मजबूत करणे सोपे जाते. जाणून घ्या डक वॉक व्यायामाचे फायदे आणि ते करण्याची योग्य पद्धत-
डक वॉक कसे करायचे
डक वॉक व्यायाम करण्यासाठी पाय रुंद करून उभे रहा.हा व्यायाम करताना पोटाचे स्नायू घट्ट करावेत जेणेकरून व्यायाम करताना पाठीच्या आणि पोटाच्या स्नायूंना दुखापत होणार नाही. पाय रुंद ठेवून उभे राहिल्यावर तोल सांभाळत, गुडघे वाकवून खाली बसा. पण तुम्हाला दोन पायांवर पूर्णपणे खाली बसण्याची गरज नाही. खुर्चीवर बसल्यासारखे आपले शरीर नितंबांपासून खाली वाकवा. शरीराचे संपूर्ण वजन घोट्यावर द्या. ही स्क्वॅट सारखीच स्थिती असेल. डक वॉक करताना, हात छातीसमोर सरळ ठेवा. हे तुम्हाला संतुलन सांभाळण्यास मदत करेल. या स्थितीत आल्यावर पाय हलके उचलून काही पावले पुढे जा आणि नंतर तुम्ही जिथे सुरुवात केली होती तिथे परत या. आता हळू हळू उभे रहा व नॉर्मल स्थितीत उभे राहा.
तज्ज्ञ असे सांगतात की हा व्यायाम करताना आपले संपूर्ण वजन टाचांवर राहावे यासाठी आणि शरीराचा तोल राखण्यासाठी थोडे पुढे झुकावे. डक वॉक करताना सुरुवातीला पाय दुखू शकतात. पण जर तुम्ही नियमितपणे सराव केला तर या व्यायामामुळे पायाचे स्नायू मजबूत होतात व त्याचबरोबर स्टॅमिनाही वाढतो. सुरुवातीला तुमच्या क्षमतेनुसार जेवढे झेपेल तेवढेच डक वॉक करा, हळूहळू सेटची संख्या वाढवा आणि प्रत्येक सेटदरम्यान काही क्षण विश्रांती देखील घ्या.
डक वॉकचे फायदे
डक वॉक व्यायाम करून तुम्ही अनेक फायदे मिळवू शकता. जसे की हा व्यायाम नितंब आणि मांड्यांसाठी खूप चांगला मानला जातो. याचा नियमित सराव केल्याने मांड्यांवरील अतिरिक्त चरबी कमी होते आणि पाय अधिक टोन्ड दिसतात. डक वॉक हा व्यायाम पायांसह पोटाच्या भागाच्या स्नायूंवर देखील कार्य करतो. त्यामुळे पोटावरची अतिरिक्त चरबी कमी होण्यास देखील मदत होते. यामुळे शरीराचा स्टॅमिना वाढतो व पायांमध्ये ताकद येते.
हा व्यायाम शरीर संतुलनासाठी देखील खूप चांगला मानला जातो. या व्यायामाची आणखी खास गोष्ट म्हणजे हा कार्डिओ व्यायाम आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग दोन्हीमध्ये मोडतो. योग्य प्रकारे डक वॉक केल्यास तुमचे रोजचे व्यायामाचे लक्ष्य पूर्ण होते. गरोदर महिलांनी डक वॉक करणे खूप चांगले मानले जाते कारण यामुळे त्यांच्या मांड्या मजबूत होतात. त्यामुळे गर्भावस्थेच्या शेवटच्या काही महिन्यांत बाळाचे डोके सहज खाली येऊ शकते.
डक वॉक करताना ही काळजी घ्या
तुम्ही डक वॉक व्यायाम करत असाल तर काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. जसे की व्यायाम करताना कधीही घाई करू नका. तुम्ही व्यायाम करण्यास नुकतीच सुरुवात केली असेल तर एकाच दिवशी खूप व्यायाम करू नका. हळूहळू सेट्सची संख्या वाढवा. त्याऐवजी शरीराचा समतोल साधण्याचा प्रयत्न करा आणि योग्य पोश्चर सांभाळण्याचा प्रयत्न करा. गर्भवती महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हा व्यायाम करावा. पायाला किंवा गुडघ्याला दुखापत झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय चुकूनही हा व्यायाम करू नका.
अशा प्रकारे तुम्ही तुमची लोअर बॉडी मजबूत व टोन करू शकता.
Photo Credit – istockphoto
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक