ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
side effects of turmeric

चेहऱ्यावर हळद लावताना या चुका करू नका, होईल त्वचेला त्रास

हळदीचा वापर सौंदर्य वाढवण्यासाठी सौंदर्य उत्पादनांमध्ये फार पूर्वीपासून केला जात आहे. हळद अँटिसेप्टिक असल्याने ती आरोग्यासाठी चांगली आहे आणि त्वचेसाठीही फायदेशीर असते. म्हणूनच लग्नाच्या वेळी वधू-वरांना हळद लावली जाते. हळदीमध्ये अनेक अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी घटक असतात, ज्यामुळे ती त्वचेसाठी खूप चांगली मानली जाते. हळदीचे सौंदर्य आणि आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. पण चेहऱ्यावर हळदीचा पॅक लावताना काही खास गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे नाहीतर तुमची सगळी मेहनत वाया जाईल.

हळदीचा फेसपॅक बनवताना 

चमकदार आणि निरोगी त्वचा असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी आपण अनेक महागड्या सौंदर्य उत्पादनांची मदत घेतो. पण बऱ्याच उत्पादनांमध्ये जास्त प्रमाणात केमिकल्सचा वापर केला जातो, ज्यामुळे तुम्हाला तात्पुरते सौंदर्य तर मिळते पण काही काळानंतर तुमच्या चेहऱ्याची नैसर्गिक चमक नाहीशी होते. त्याऐवजी घरगुती उपायांचा अवलंब केला तर त्याचे परिणाम मिळण्यास वेळ लागतो, परंतु यामुळे तुम्हाला कायमस्वरूपी नैसर्गिक चमक मिळते. यापैकी एक हळद आहे, जी केवळ जेवणाची चवच वाढवण्यास मदत करत नाही तर त्वचेशी संबंधित समस्या दूर करून तुम्हाला निर्दोष त्वचा देखील देते. यासाठी बेसन, तांदळाचे पीठ इत्यादीमध्ये हळद मिसळून तो फेसपॅक चेहेऱ्याला लावला जातो. हे मिश्रण एक उत्तम क्लिन्झर म्हणून काम करते. तसेच त्यात मुरुम, सनबर्न यांसारख्या समस्या दूर करण्याची क्षमता असते. हळदीचा वापर एक्सफोलिएटर म्हणूनही केला जातो. त्वचेच्या सर्व समस्यांपासून दूर राहण्यासाठी तुम्हीही हळदीचा वापर करत असाल, तर ती लावताना या चुका करू नका अन्यथा तुमच्या चेहेऱ्याच्या नाजूक त्वचेला त्रास होऊ शकेल. 

Turmeric Face Pack
Turmeric Face Pack

चुकीच्या गोष्टींमध्ये हळद मिसळू नका 

हळद हा एक परिपूर्ण घटक आहे, परंतु जर तुम्ही त्यात चुकीच्या गोष्टी मिसळल्या तर त्याचे दुष्परिणाम तुमच्या त्वचेवर होऊ शकतात.हळद वापरताना त्यात कोणतीही अनावश्यक गोष्ट घालण्याची चूक करू नका.कारण हळदीमध्ये कर्क्यूमिन असते, जे अनावश्यक गोष्टींमध्ये मिसळल्यावर त्वचेवर प्रतिक्रिया देऊ शकते. साधारणपणे गुलाबजल, दूध, दही, पाण्यासोबत हळदीचा वापर केला जातो. म्हणूनच आपण त्यात आणखी काय मिसळावे आणि काय नाही हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. तुम्ही त्यात काही नवीन प्रयोग करण्याचा विचार करत असाल तर ते करू नका. कारण असे केल्याने तुमच्या त्वचेवर वाईट परिणाम होऊ शकतो. 

गरम पाण्याने चेहरा धुवू नका

हळदीचा पॅक चेहऱ्यावर 20 मिनिटांपेक्षा जास्त काळ लावू नये कारण हळदीचा रंग चेहऱ्याला लागू शकतो. जर तुम्ही हळदीचा फेसपॅक चेहऱ्यावर जास्त काळ ठेवला तर तुमच्या त्वचेवर त्याचा पिवळेपणा दिसू लागेल. तसेच हे ध्यानात ठेवा की हळद लावल्यानंतर चेहरा खूप गरम पाण्याने धुणे त्वचेसाठी हानिकारक असू शकते. आपल्या चेहऱ्यावरील हळद काढून टाकल्यानंतर चेहेरा थंड किंवा साध्या पाण्याने धुवावा व त्यानंतर चेहऱ्यावर लाईट मॉइश्चरायझिंग क्रीम लावावे. यामुळे तुमची त्वचा कोरडी पडणार नाही.

ADVERTISEMENT
Turmeric Face Pack
Turmeric Face Pack

चेहेऱ्याला साबण लावू नका 

जर तुम्ही हळदीचा पॅक चेहऱ्याला लावला असेल तर तो धुण्यासाठी साबणाचा वापर करू नका. या पॅकचा त्वचेवर परिणाम 24 ते 48 तासांनंतर दिसून येतो. या काळात चेहऱ्यावर साबण किंवा फेसवॉशचा वापर टाळा. तरच त्याची चमक तुमच्या त्वचेवर चांगली दिसेल. मुली अनेकदा त्वचेवर हळदीचा फेस पॅक लावल्यानंतर साबणाने चेहरा धुतात. पण ही चूक करू नका. कारण असे केल्याने चेहरा काळवंडू शकतो आणि तुमच्या त्वचेची नैसर्गिक चमक हरवते.हळदीचा पॅक धुतल्यानंतर, सूर्यप्रकाशाशी थेट संपर्क टाळा. अनेक वेळा हळदीचा वापर केल्यानंतर सूर्यप्रकाशामुळे त्वचा काळी पडू शकते. 

या काही गोष्टी आहेत ज्यांची काळजी घेऊन तुम्ही हळदीचे दुष्परिणाम टाळू शकाल.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

26 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT