ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
easy-home-remedies-for-under-eye-dark-circles-in-marathi

2 दिवसात घालवा डोळ्याखालील काळी वर्तुळं, सोपा उपाय

जेव्हा चेहऱ्याची काळजी घेण्याची बाब असते, तेव्हा चेहऱ्यावरील केवळ डाग नसणे इतकंच नसतं. तर डोळे आणि ओठदेखील तितकेच महत्त्वाचे असतात. वास्तविक प्रत्येक मनुष्यानुसार ओठ आणि डोळ्यांचा आकार हा वेगळा असतो. हा आकार आपण बदलू शकत नाही मात्र त्याची योग्य काळजी घेऊन सौंदर्य अधिक चांगले करण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकतो. डोळ्यांची समस्या सर्वाधिक जास्त असते ती म्हणजे डोळ्यांखाली येणारी काळी वर्तुळं. डोळ्यांखाली काळी वर्तुळं असतील तर तुमच्या सौंदर्याला नक्कीच डाग लागतो. काळी वर्तुळं येण्याची कारणं अनेक असतात. पण हे घालविण्यासाठी अनेक घरगुती उपाय आहेत. तर काही जण बाजारातील काही उत्पादनांचाही वापर करतात. पण आम्ही तुम्हाला असे उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या डोळ्यांखालील वर्तुळं नक्कीच पटकन कमी होण्यास मदत होईल. याबाबात अधिक माहिती. 

गुलाबपाणी आणि कोरफड जेल (Rosewater And Aloe Vera)

साहित्य 

  • अर्धा लहान चमचा गुलाबपाणी 
  • अर्धा चमचा कोरफड जेल 
  • दोन लहान कापसाचे बोळे 

बनविण्याची पद्धत 

  • एका बाऊलमध्ये गुलाबपाणी आणि कोरफड जेल मिक्स करून घ्या 
  • आता हे मिश्रण कापसाच्या बोळ्याच्या सहाय्याने डोळ्यांच्या खाली लावा 
  • ही गोष्ट लक्षात ठेवा की हे मिश्रण तुमच्या डोळ्यांच्या आत जाऊ नये 
  • 15 मिनिट्स तसंच ठेवा आणि मग तुम्ही स्वच्छ पाण्याने डोळे पुसून घ्या 

बदाम तेल (Almond Oil)

साहित्य 

ADVERTISEMENT
  • अर्धा लहान चमचा नारळाचा तेल
  • 5 थेंब बदाम तेल

बनविण्याची पद्धत 

  • रात्री झोपण्यापूर्वी पहिल्यांदा एका बाऊलमध्ये नारळाचे तेल आणि बदामाचे तेल मिक्स करा आणि हे मिश्रण डोळ्यांखाली लावा
  • साधारण 5 मिनिट्स तुम्ही डोळ्यांना हलक्या हाताने मसाज करा. डोळ्यात तेल जाऊ न देण्याची काळजी घ्या 
  • हे रात्रभर तसंच राहू द्या. सकाळी उठल्यावर डोळे स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या 

ग्रीन टी आईस क्युब्स (Green Tea Ice Cubes)

साहित्य 

  • एक कप ग्रीन टी 
  • आईस ट्रे 

बनविण्याची पद्धत 

  • सर्वात पहिले एका पातेल्यात पाणी घेऊन उकळा
  • त्यानंतर यामध्ये ग्रीन टी घालून उकळा आणि मग गाळून थंड करा 
  • आता हा आईस ट्रे मध्ये भरून घ्या आणि बर्फ जमवा 
  • जेव्हा क्युब्स तयार होतील तेव्हा कॉटनच्या कपड्यांमध्ये बांधून डोळ्यांना शेका 
  • कोल्ड कंप्रेसर डोळ्यांखाली लावल्याने काळी वर्तुळं कमी होतील

अॅप्पल साईडर व्हिनेगर आणि लिंबाचा रस (Apple Cider Vinegar and Lime Juice)

साहित्य 

ADVERTISEMENT
  • 1 लहान चमचा अॅप्पल साईड व्हिनेगर 
  • 5 थेंब लिंबाचा रस 
  • कापूस 

बनविण्याची पद्धत 

  • एका बाऊलमध्ये अॅप्पल साईड व्हिनेगर आणि लिंबाचा रस मिक्स करून घ्या 
  • आता हे मिश्रण डोळ्यांच्या आजूबाजूला लावा 
  • 10 मिनिट्नंतर डोळे पाण्याने स्वच्छ करा

ऑलिव्ह ऑईल आणि मध (Olive Oil and Honey)

honey

साहित्य 

  • अर्धा चमचा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल
  • 5 थेंब मध
  • एक चिमूटभर हळद 

बनविण्याची पद्धत 

  • एका बाऊलमध्ये व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल, मध आणि हळद मिक्स करून घ्या 
  • आता हे मिश्रण डोळ्यांच्या आजूबाजूला लावा 
  • 15 मिनिट्नंतर डोळे पाण्याने स्वच्छ करा
  • हे देशी उपाय तुम्ही नियमित वापरल्यास, लवकर फरक पडेल

दूध आणि हळद (Milk and Turmeric)

साहित्य 

ADVERTISEMENT
  • 1 चमचा थंड दूध 
  • 1 चिमूटभर हळद 
  • कापूस 

बनविण्याची पद्धत 

  • दूध आणि हळद मिक्स करून घ्या आणि हे मिश्रण लाऊन डोळ्यांचा मसाज करा 
  • 5 मिनिट्स मसाज केल्यानंतर हे मिश्रण साधारण अर्धा तास तसंच ठेवा 
  • त्यानंतर पाण्याने तुम्ही तुमचा चेहरा धुवा 
  • हे घरगुती उपाय तुम्ही नियमित करा आणि तुम्हाला याचे चांगले परिणाम दिसून येतील

बटाट्याचा रस आणि मलई 

साहित्य 

  • 1 चमचा बटाट्याचा रस 
  • 1 लहान चमचा मलई
  • कापूस 

बनविण्याची पद्धत 

  • बटाटा तुम्ही किसून घ्या आणि त्याचा रस काढून घ्या 
  • आता या रसात मलई मिक्स करून घ्या 
  • हे मिश्रण आता डोळ्यांच्या आजूबाजूला लावा 
  • 15-20 मिनिट्स तसंच ठेवा आणि मग चेहरा धुवा 

नोट – या घरगुती उपायांचा उपयोग केल्यानंतर तुम्हाला त्वरीत परिणाम मिळणार नाही. यासाठी नियमित उपयोग करून घ्या. यापैकी कोणत्याही गोष्टींची अलर्जी असेल तर तुम्ही त्याचा वापर करू नका. 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

27 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT