बऱ्याचदा नेलपॉलिश घेतल्यानंतर जास्त वापरले जात नाही आणि जुने झाल्यानंतर नेलपॉलिश सुकते. मग अशावेळी मनाला चुटपूट लागून राहते की, चांगले नेलपॉलिश वापरले गेले नाही आणि सुकले. पण आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे सुकलेल्या नेलपॉलिशचा तुम्हाला पुनर्वापर करता येईल. काही महिलांना नेलपॉलिशच्या बाटल्या फ्रिजमध्ये ठेवायचीही सवय आहे. पण नेलपॉलिश ठेवण्याची ही अत्यंत चुकीची पद्धत आहे. फ्रिजमध्ये नेलपॉलिश ठेवल्याने ते अधिक खराब होते. तुम्ही काही टिप्स वापरा ज्या सुकलेल्या नेलपॉलिशचा असा वापर करा.
गरम पाण्याचा उपयोग
एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करून घ्या आणि त्यात सुकलेली नेलपॉलिशची बाटली ठेवा. तुम्ही कमीत कमी 20 मिनिट्स ही नेलपॉलिशची बाटली तशीच ठेवा. त्यानंतर ती काढून व्यवस्थित वरखाली हलवा (shake the bottle). लक्षा ठेवा की, हे पाणी अति गरम नसावे आणि अति थंडही नसावे. कोमट पाण्यापेक्षा थोडं जास्त गरम पाणी घ्या. ही पद्धत तुम्ही नेलपॉलिश सुकायला लागल्यावर त्वरीत वापरा. अगदी जुने नेलपॉलिश सुकले असेल तरी या पद्धतीने त्वरीत ओले होते आणि पुन्हा वापरण्याच्या लायकीचे होते.
अधिक वाचा – नखांची काळजी घेण्यासाठी वापरा ‘या’ टीप्स
नेलपॉलिश थिनरचा वापर
नेलपॉलिश सुकल्यावर पुन्हा एकदा त्याचा वापर करण्यासाठी थिनरचा वापर करू शकता. नेलपॉलिशमध्ये थिनरचे 2-3 थेंब घाला आणि आपल्या दोन्ही हाताच्या मध्ये ठेवा आणि घासा. कमीत कमी 2 मिनिट्स तुम्ही असेच घासत राहा आणि नखांवर लावा. काही महिला नेलपेंट रिमूव्हरचा वापर करतात. पण यामुळे नेलपॉलिशमध्ये गुठळ्या जमा होतात. त्यामुळे तुम्ही बाजारामध्ये जाऊन थिनर विकत घ्या आणि त्याचा वापर करा.
उन्हामध्ये ठेवा नेलपॉलिश
बऱ्याचदा नेलपॉलिशमध्ये गुठळ्या निर्माण होतात. वास्तविक हे नेलपॉलिश सुकायला लागण्याचे पहिले लक्षण आहे. अशा स्थितीत तुम्ही नेलपॉलिश बाहेर उन्हामध्ये 15 मिनिट्स ठेवा आणि चांगले उन्हात शेकू द्या. उन्हात ठेवल्यामुळे नेलपॉलिशमधील लिक्विड विरघळू लागते आणि पूर्ववत ते पेंट स्वरूपात दिसू लागते. यानंतर तुम्ही रूम टेम्परेचरवर नेलपॉलिश ठेवा आणि वापरा.
अधिक वाचा – जेलपॉलिश आणि नेलपॉलिशमध्ये आहे हा फरक
नेल पॉलिश सुकण्यापासून वाचण्याच्या पद्धती
- जेव्हा तुम्ही नेलपॉलिश नखांवर लावता तेव्हा पंखा चालू ठेऊ नका. वास्तविक त्यावेळी नेलपॉलिशच्या बाटलीचे झाकण उघडे राहते आणि त्यामुळे नेलपेंट लवकर सुकते. त्यामुळे नेलपेंट लावताना बाटलीचे झाकण जास्त वेळ उघडे ठेऊ नका.
- नेलपॉलिश हे नेहमी रूम टेम्परेचरवरच ठेवा. काही जण फ्रिजमध्ये ठेवतात जी अगदी अयोग्य पद्धत आहे. एखाद्या बॉक्समध्ये तुम्ही नेलपेंट्स ठेवा
- नेलपेंट लावल्यावर झाकण बंद करताना ते नीट लागले आहे की नाही ते ठेवण्याआधी एकदा पाहून घ्या. बऱ्याचदा नेलपेंटची बाटली नीट पबंद न झाल्यामुळेही सुकते
- सुकलेल्या नेलपेंटमध्ये तुम्ही ट्रान्सपरंट नेलपेंटचा वापरही करू शकता. वास्तविक थिनरशिवाय तुम्ही नवे नेलपेंटही वापरू शकता. दोन्ही मिक्स करून वेगळा रंग तुम्हाला मिळेल आणि सुकलेले नेलपेंटदेखील ठीक होईल
- नेलपॉलिशचा वापर करताना त्याच्या आजूबाजूला नेलपेंट लागते. त्यामुळे बाटलीचे झाकण लावताना ते व्यवस्थित रिमूव्हरचा वापर करून स्वच्छ करून घ्या
या सर्व टिप्सचा वापर करून तुम्ही सुकलेले नेलपॉलिश व्यवस्थित करू शकता. याशिवाय तुम्ही सुकलेल्या नेलपॉलिशचा पुनर्वापर सोप्या पद्धतीने करू शकता आणि फेकूनही द्यावे लागत नाही.
अधिक वाचा – परफेक्ट मेनिक्युअरसाठी घरीच बनवा स्क्रब, मिळवा आकर्षक नखं
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक