ADVERTISEMENT
home / केस
Easy Tips to Combat Ingrown Hair in Marathi

इनग्रोन हेअर टाळण्यासाठी सोप्या वॅक्सिंग टिप्स

त्वचेची निगा राखण्यासाठी आपण सतत प्रयत्न करत असतो. मऊ आणि मुलायम त्वचेसाठी नियमित वॅक्सिंग अथवा शेविंग करतो. पण वॅक्सिंग केल्यावरही त्वचेवर कधी कधी पुरळ येतं. शेविंगनंतरही त्वचेवर न निघालेल्या केसांचा थर दिसू लागतो. शेविंग अथवा वॅक्सिंग केल्यावर त्वचा जवळून जाड आणि खडबडीत झालेली दिसून येते. इनग्रोन हेअरमुळे बऱ्याचदा त्वचेवर असं पुरळ उठू शकतं. अशी बंम्पी त्वचा पाहिली की वॅक्सिंग अथवा शेविंग केल्याचा आनंद क्षणात कमी होतो. यासाठी जाणून घ्या वॅक्सिंग अथवा शेविंगनंतर इनग्रोन हेअर येणं कसं टाळावं. तसंच वाचा चेहऱ्यावरील केस काढताय? मग माहीत करुन घ्या या महत्वाच्या गोष्टी, बिकिनी वॅक्ससंदर्भात A To Z माहिती जी प्रत्येक महिलेला माहीत हवी, अंडरआर्म्स स्वच्छ ठेवण्यासाठी कोणता प्रकार योग्य, जाणून घ्या (How To Clean Underarms In Marathi)

इनग्रोन हेअर म्हणजे काय ?

वॅक्सिंग करताना केस खेचून काढले जातात. शेविंगमध्येतर त्वचेच्या वरच्या भागातील केसच पूर्णपणे निघून जातात. मात्र असं करताना बऱ्याचदा काही हेअर फॉलिकल्स त्वचेत अडकून राहतात. ज्यामुळे त्वचेला खाज आणि जळजळ जाणवते. डेड स्किनमध्ये अडकल्यामुळे हे हेअर फॉलिकल्स बाहेर निघू शकत नाहीत आणि त्वचेच्या पोअर्समध्ये अडकून राहिल्यामुळे त्वचेवर त्याचा परिणाम दिसू लागतो. यालाच इनग्रोन हेअर असं म्हणतात. इनग्रोन हेअर फार त्रासदायक नसतात. त्यामुळे निर्माण झालेलं पुरळही काही तासांमध्ये कमी होतं. मात्र यामुळे पुन्हा अंगावर केस लवकर दिसू लागतात. यासाठी

इनग्रोन हेअरपासून कशी सुटका मिळवावी

इनग्रोन हेअर ही एक सामान्य आणि फार त्रासदायक समस्या नसली तरी काही उपाय करून तुम्ही त्यापासून सुटका मिळवू शकता. 

त्वचा एक्सफोलिएट करा 

जर इनग्रोनची समस्या डेड स्किनमुळे निर्माण होत असेल तर तुमच्या त्वचेला वेळच्या वेळी एक्सफोलिएट करणं गरजेचं आहे. जर वेळच्या वेळी तुम्ही त्वचा मुळापासून स्वच्छ केली तर इनग्रोन हेअरची समस्या हळू हळू कमी होते. यासाठी आठवड्यातून एकदा त्वचा एक्सफोलिएट करा. वॅक्सिंग करण्यापूर्वी दोन ते तीन दिवस आधी स्क्रबरने त्वचा स्वच्छ केल्यास चांगला परिणाम मिळेल.

ADVERTISEMENT

त्वचा मॉइस्चराइझ करा 

त्वचेला वेळच्या वेळी मॉइस्चराइझ करणं खूप गरजेचं आहे. ज्यामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहिल आणि कोरडी न झाल्यामुळे डेड स्किन त्वचेवर जमा होणार नाही. अंघोळीनंतर बॉडी लोशन आणि दररोज रात्री झोपताना त्वचेला बॉडी क्रीम वापरल्यास त्वचा मऊ आणि मुलायम राहण्यास मदत होईल. 

वॅक्सिंगनंतर असे कपडे वापरा

वॅक्सिंग अथवा शेविंग करून केस काढल्यानंतर तुम्ही कोणते कपडे अथवा अंडर गारमेंट वापरता हे खूप महत्त्वाचं आहे. सिथेंटिक कापडामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो. यासाठी वॅक्सिंग अथवा शेविंग केल्यावर नेहमी मऊ सूती कपडे वापरावे. कपडे आरामदायक आणि सैल असतील तर त्यामुळे तुमच्या त्वचेला पुरेसा ऑक्सिजन मिळू शकेल. ज्यामुळे इनग्रोन हेअरचा त्रास कमी होतो.

वॅक्सिंग अथवा शेविंग टेक्नीक 

त्वचेवरील अनावश्यक केस काढताना ते नेहमी योग्य टेक्नीकने काढावे. ग्रोथच्या उलट दिशेने केस काढल्यास इनग्रोन हेअर कमी येतात. वॅक्सिंग करताना स्वच्छतेची काळजी घ्यावी, डिस्पोजेबल वॅक्सिंग शीट वापराव्या. शेविंग करताना नवीन रेझर वापरणं फायद्याचं ठरेल. अंडर आर्म अथवा बिकिनी वॅक्स अथवा शेव करताना विशेष काळजी घ्यावी. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
29 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT