ADVERTISEMENT
home / Care
Easy ways to add olive oil to beauty routine in Marathi

तुमच्या स्कीन केअर रूटिनमध्ये असा करा ऑलिव्ह ऑईलचा समावेश 

ऑलिव्ह ऑईल हे असं तेल आहे ज्याचा वापर स्वयंपाक, त्वचेची देखभाल, केसांची निगा राखण्यासाठी करता येतो. या तेलात असलेले व्हिटॅमिन ई, ओलेइक अॅसिड, लिनोलेइक अॅसिडस, स्क्वालेन आरोग्याप्रमाणेच केस आणि त्वचेसाठी उपयुक्त असतात. हिवाळ्यात तर तुम्हाला ऑलिव्ह आईलचा स्कीन केअरसाठी जास्त चांगला फायदा होतो. ऑलिव्ह  ऑईलचे सौंदर्य फायदे जाणाल तर तुमच्या स्कीन केअरमध्ये या तेलाचा अवश्य समावेश कराल. यासाठी जाणून घ्या याचा वापर सौंदर्य खुलवण्यासाठी कसा करावा. यासोबतच जाणून घ्या आणखी काही ऑलिव्ह तेलाचे फायदे (Olive Oil Benefits In Marathi)

मॉईस्चराईझर प्रमाणे

अनेक मॉईस्चराईझिंग क्रीममध्ये ऑलिव्ह ऑईलचा वापर केला जातो. त्यामुळे वातावरणातील बदलांमुळे जेव्हा त्वचा कोरडी आणि निस्तेज होते अशा वेळी तुम्ही या तेलाचा अगदी मॉईस्चराईझर प्रमाणे वापर करू शकता. यासाठी रात्री झोपताना चेहऱ्यावर काही थेंब ऑलिव्ह आईल लावा आणि बोटांनी मसाज करून ते त्वचेत मुरवा. मात्र तेलकट त्वचा असेल तर मात्र याचा वापर करू नका. कारण यामुळे तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची समस्या वाढेल.

हेअर कंडिशनिंगसाठी

केसांचे योग्य पोषण होण्यासाठी केसांना उत्तम कंडिशनरची गरज असते. तुम्ही केसांना योग्य पोषण मिळावं यासाठी ऑलिव्ह ऑईल वापरू शकता. यासाठी रात्री झोपताना ऑलिव्ह ऑईलचे काही थेंब स्काल्पवर लावा आणि मसाज करा. सकाळी तुम्ही केस धुवून टाकले तरी तुमचे केस चमकदार दिसतील.

नेल्स क्युटिकल्ससाठी

हाताच्या बोटांची आणि नखांची निगा राखण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह आईलचा वापर करू शकता. यासाठी हात आणि नखांना नियमित ऑलिव्ह आईलने मसाज करा. खोलवर पोषण मिळाल्यामुळे तुमच्या नखांचे क्युटिकल्स मऊ आणि नखं मजबूत होतील.

ADVERTISEMENT

बॉडी ऑईलप्रमाणे

अंघोळ करण्याआधी जर तुम्ही अंगाला ऑलिव्ह आईल लावलं तर तुमच्या त्वचेचं चांगलं पोषण होईल. त्वचा मऊ आणि इव्हन टोन दिसण्यासाठी ऑलिव्ह आईल फायदेशीर ठरेल.

मेकअप रिमूव्ह करण्यासाठी

त्वचा स्वच्छ करण्यासाठी अथवा मेकअप काढण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह आईलचा वापर करू शकता. कारण या तेलाने मेकअप काढल्यास मेकअप तर सहन निघेलच पण त्वचा कोरडी पडणार नाही. यासाठी कॉटन पॅडच्या मदतीने ऑलिव्ह ऑईल लावून तुमचा मेकअप स्वच्छ करा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

24 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT