ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
Ek Villain Returns

Ek Villian Returns चा फर्स्ट लूक झाला रिलीज , लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

दिग्दर्शक मोहित सूरीने आठ वर्षांपूर्वी सिद्धार्थ मल्होत्रा, रितेश देशमुख आणि श्रद्धा कपूरला घेऊन ‘एक व्हिलन’ हा चित्रपट बनवला होता. हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता. यातील गाणी देखील खूप हिट झाली होती. आता मोहित सूरी ‘एक व्हिलन ‘ चित्रपटाचा भाग 2 घेऊन येण्यास सज्ज झाला आहे. यावेळी त्यात जॉन अब्राहम आणि आदित्य रॉय कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. नुकतेच ‘एक व्हिलन रिटर्न्स’ चित्रपटातील स्टार्सचे फर्स्ट लूक रिलीज करण्यात आले आहेत. एक व्हिलन’ चित्रपटाच्या आठव्या वर्धापनदिनानिमित्त आगामी ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या खलनायकाचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करण्यात आला आहे. ‘एक व्हिलन’ हा चित्रपट 27 जून 2014 रोजी रिलीज झाला होता. आता आठ वर्षांनी त्याचा दुसरा भाग येत आहे. जॉन अब्राहम, अर्जुन कपूर, दिशा पटानी आणि तारा सुतारिया यांच्या या चित्रपटाचा टीझर पोस्टर नुकताच रिलीज झाला आहे. या  ऍक्शनपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

टिझर पोस्टरमध्ये दिसतेय व्हिलनची दमदार स्टाईल 

‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटातून आठ वर्षांनी व्हिलन पडद्यावर पुनरागमन करत आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम, अर्जुन कपूर, दिशा पटानी आणि तारा सुतारिया दमदार स्टाईलमध्ये दिसणार आहेत. या चार स्टार्सच्या टीझर पोस्टरने प्रेक्षकांच्या या आकर्षक फ्रँचायझी चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवली आहे. या डार्क आणि इंटेन्स दिसणाऱ्या टीझर पोस्टरमुळे प्रेक्षकांच्या मनात एक व्हिलन रिटर्न्सविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. 

पोस्टरवर लिहिलेय स्लोगन 

टीझर पोस्टरमध्ये, चित्रपटाच्या स्टार कास्टने ‘एक व्हिलन रिटर्न्स’ मधील स्मायली मास्क घातला आहे असे दिसून येतेय. या पोस्टरवर ‘ हीरोज डोन्ट एग्जिस्ट’ असे स्लोगन लिहिलेले आहे. पोस्टर्सवरील स्टार कास्टचा लूक खूपच भयानक दिसत आहे. हा चित्रपट मोहित सूरीच्या दिग्दर्शनाखाली तयार होतोय. टी-सीरीज आणि बालाजी टेलिफिल्म्स संयुक्तपणे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. 

कथेत आणलाय एक नवा ट्विस्ट 

रोमांचक व थरारक ऍक्शन सीक्वेन्ससोबतच प्रेक्षकांना  ‘एक व्हिलन रिटर्न्स’च्या कथानकातही एक नवा ट्विस्ट बघायला मिळेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा चित्रपट आधीच्या चित्रपटाचा सिक्वेल नसून ही पूर्णपणे नवीन कथा असेल आणि अर्जुन व जॉन एकमेकांच्या विरुद्ध दिसणार आहेत. ही एक उत्कट प्रेमकथा असेल. काही काळापूर्वी जॉन आणि अर्जुनने मोहितची कल्पना ऐकली, त्यानंतर या दोघांनी उत्साहाने चित्रपट साइन केला.काही दिवसांपूर्वी मोहित सुरीने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर या चित्रपटाच्या प्रदर्शनाविषयी घोषणा केली होती. जॉन अब्राहमने देखील त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर याबद्दल ट्विट केले आहे. ‘एक व्हिलन रिटर्न्स’च्या निर्मात्यांनी चित्रपटाचे नवीन डिजिटल पोस्टर जाहीर करून प्रेक्षकांना खूप उत्सुक केले आहे. दमदार अ‍ॅक्शनसह हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहे.

ADVERTISEMENT

एक व्हिलन रिटर्न्स हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे, ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात दिशा पटानी, तारा सुतारिया, जॉन अब्राहम आणि अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हे सर्व कलाकार पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. त्यांना एकत्र पाहण्यासाठी चाहतेही खूप उत्सुक आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘एक व्हिलन रिटर्न्स’मध्ये जॉन अब्राहम आणि अर्जुन कपूर हिरोच्या भूमिकेत नसून खलनायक म्हणून दाखवले जाणार आहेत. या चित्रपटासाठी अभिनेता जॉन अब्राहमने मोठी रक्कम मानधन म्हणून घेतली आहे, अशा गोष्टी सोशल मीडियावर सुरू आहेत.

हा ऍक्शन थ्रिलर चित्रपट 29 जुलै 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

27 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT