डेटवर जाताना नेमकं काय काय कॅरी करायचं हे अनेककदा कळत नाही आणि मुलींचा गोंधळ होतो. हा असा क्षण असतो जेव्हा तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवायचा असतो.पण तुमचा अर्धावेळ तुम्ही कशीही भरलेली जड बॅग पकडण्यात जात असेल तर त्याचा उपयोग तो काय? म्हणूनच आज आम्ही तुम्हाला डेटवर जाताना नेमंक तुमच्या बॅगमध्ये काय-काय घ्यायला हवं यासाठीच थोड्या टीप्स देणार आहोत.
डेटवर या चुका अजिबात करु नका, वाचा काय घ्यावी काळजी
बॅगची निवड
सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे बॅगची निवड… जी बॅग तुम्ही ऑफिससाठी वापरता ती तुम्ही डेटवर घेऊन जाण्याची अजिबात तसदी घेऊ नका कारण तुम्ही ऑफिसच्या बॅगमध्ये अशा गोष्टी असतात. त्या अगदीच नकोशा असतात. त्यामुळे ती बॅग साफ करत बसण्यापेक्षा दुसरी एखादी छान मध्यम आकाराची स्लिंग निवडा म्हणजे ती नीट घेताही येईल. आणि त्यात सामानही राहील. शिवाय तुमच्या रोमॅन्समध्ये बॅग हा अडथळा नसेल.
रिलेशनशीपमध्ये तुमच्यासोबतही होत असेल असे तर आताच करा ब्रेकअप
फेस वाईप्स/टीश्यू पेपर/ सॅनिटायझर
अनेकदा काही जणांचे डेट प्लॅन हे पूर्ण दिवसांचे असते. अशावेळी खाणे हे आलेच. आता प्रत्येकवेळी तुम्हाला हात धुवायला मिळेल असे नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे सॅनिटायझर आणि टीश्यू ठेवाच. त्यामुळे तुम्ही अगदी काहीही खाल्ले तरी तुमच्या हाताला मसाल्याचा वास येणार नाही.
तुमचा बेस्ट फ्रेंडच असू शकतो तो तुमचा बॉयफ्रेड, कसे ओळखाल?
अशाच पद्धतीने तुमच्याकडे फेस वाईप्सदेखील हवे. कारण जर तुम्ही डेटच्या निमित्ताने बाहेर गेला असाल तर तुमच्या चेहऱ्यावर धूळ-माती बसण्याची शक्यता असते. असे झाले तर मग तुमचा चेहरा काळवंडतो. त्यामुळे तुमच्याकडे चांगले फेसवाईप्सही हवेत. ज्यामुळे तुम्हाला स्वत:लाही फ्रेश वाटते.
माऊथ फ्रेशनर
डेटमध्ये पार्टनरला किस करण्याची कधीही संधी तुम्हाला मिळू शकते किंवा तुमचा पार्टनर तुम्हाला किस करु शकतो अशावेळी तुमच्या तोंडाला जर घाणेरडा वास आला तर तुमचा रोमान्स सुरु होण्याआधीच संपेल. त्यामुळे तुमच्यासोबत माऊथ फ्रेशनर ठेवा. लिक्विड माऊथ फ्रेशनर गार्गल केल्यानंतर तुम्हाला स्वत:ला तर फ्रेश वाटेल शिवाय किस करतानाचा अनुभवही खास होईल. त्यामुळे लक्षात ठेवा तुम्हाला माऊथ फ्रेशनर बॅगमध्ये घ्यायला विसरु नका
परफ्युम
तुम्हाला कायम फ्रेश आणि मस्त वाटायला हवे म्हणून तुम्ही तुमच्यासोबत परफ्युमही ठेवला पाहिजे. कारण तुमच्या घामाचा वास तुम्ही तुमच्या पार्टनरला देण्यापेक्षा नेहमीच चांगला परफ्युम कॅरी करणे चांगले. कारण प्रवासात परफ्युम कधी लावायची वेळ येईल सांगता येणार नाही. त्यामुळे तुम्ही चांगले परफ्युम कॅरी करा. मोठ्या परफ्युम बॉटल कॅरी करण्यापेक्षा मिनीएचर परफ्युमची बॉटलसोबत ठेवा
उदा. समजा तुम्ही मुव्ही डेटला जाणारा असाल तर मुव्हीला जाण्याआधी एकदा परफ्युम लावा. निघताना शक्य असेल तर लावा म्हणजे तुम्ही ऑल टाईम सुगंधी राहाल.
हेअरकोंब, क्लीप आणि रबरबँड
तुमचे केस हा अनेकदा खूप घोळ घालतात.जर तुमचे केस लांब असताल तर ते तुमच्या रोमँटीक मुमेंटला खराब करु शकतात. त्यामुळे तुमचे केस हे तुम्ही एकतर चांगले बांधा. जर मोकळे असतील तर ते तुमच्या आणि त्याच्यामध्ये येणार नाही याची काळजी घ्या.अशी चांगली हेअरस्टाईल करा जी तुम्हाला चांगली दिसेल आणि तुमच्या लुकला ही ती बाधा आणणार नाही. त्यामुळे केस विंचरण्यासाठी कंगवा, केस बांधण्यासाठी क्लचर किंवा पीन आणि रबरबँड ठेवा.
*या वस्तू तर तुम्ही हमखास तुमच्या बॅगमध्ये घ्यायलाच हव्यात तुमची डेट अधिक स्पेशल होईल हे नक्की!
(सौजन्य- shutterstock)