ADVERTISEMENT
home / Fitness
shoulder pain

फ्रोजन शोल्डरचा त्रास असेल तर हे व्यायामप्रकार करून बघा

आजकाल सर्व कामे खुर्चीवर बसून करण्याची सवय आपल्याला लागली आहे. आपण खुर्चीवर बसून जेवतो, खुर्चीवरच बसून टीव्ही आणि मोबाईल पाहतो. विशेषत: लॉकडाऊननंतर बहुतेक लोकांनी घरूनच काम करायला सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांना बराच वेळ एकाच जागी बसून काम करावे लागते. अशा परिस्थितीत शरीर आणि मन दोन्हीवर ताण येतो. शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच आपले खांदे देखील हा ताण सहन करतात. त्यांच्यामध्ये वेदना सुरू होतात आणि एक वेळ येते जेव्हा ते कडक होतात, ठप्प होतात. यासाठी काही व्यायाम आहेत, जे फ्रोजन शोल्डरचा त्रास कमी करण्यास मदत करू शकतात.

फ्रोजन शोल्डर म्हणजे काय 

फ्रोझन शोल्डरमध्ये, खांद्याची हाडे हलवणे कठीण होते. वैद्यकीय भाषेत या दुखण्याला ऍडहेसिव्ह कॅप्सुलिटिस असे म्हणतात. त्यामुळे खांद्यामध्ये दीर्घकाळ ताठरपणा येतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. असे काही व्यायाम आहेत जे या वेदना कमी करण्यास तसेच फ्रोजन शोल्डरचा त्रास कमी करण्यास मदत करू शकतात. 

Exercises For Frozen Shoulder
Exercises For Frozen Shoulder

शोल्डर रोटेशन 

हा व्यायाम खांद्याच्या हालचालीसाठी उत्तम आहे. यामुळे खांद्यांमधला ताण तर दूर होतोच, पण खांद्यांना आराम देखील  मिळतो.हा व्यायाम करण्यासाठी सर्वप्रथम पाठीचा कणा ताठ सरळ करून बसा.आता दोन्ही खांदे गोलाकार हलवण्याचा प्रयत्न करा. खांदे आधी क्लॉकवाईज आणि मग अँटी क्लॉकवाईज गोल फिरवण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला, ही क्रिया दोन्ही प्रकारे 10-10 वेळा करा. त्यानंतर तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार ते वाढवू शकता.

Exercises For Frozen Shoulder
Exercises For Frozen Shoulder

नेक ट्विस्ट

काही वेळा मान बराच वेळ एकाच स्थितीत ठेवल्याने दुखते, त्याचा परिणाम खांद्यावरही होतो. वेदना कमी करण्यासाठी नेक ट्विस्ट हा व्यायाम खूप चांगला आहे. या व्यायामात मान फिरवावी लागते. हा व्यायाम करण्यासाठी, आदी ताठ सरळ बसा. आता तुमची मान आधी डावीकडे वळवा. थोडा वेळ स्थिर ठेवा आणि मग हळूहळू उजवीकडे वळवा. काही सेकंद स्थिर ठेवा  आणि नंतर रिलॅक्स करा. ही क्रिया करताना लक्षात ठेवा की मान जास्त वेगाने फिरवू नका. असे केल्याने मानेवर ताण येऊ शकतो व काहींना चक्कर देखील येऊ शकते. ही क्रिया दोन्ही बाजूंनी 10-10 वेळा केल्यास मानेचा ताठरपणा कमी होईल. 

ADVERTISEMENT
Exercises For Frozen Shoulder
Exercises For Frozen Shoulder

एल्बो ग्रॅब स्ट्रेच 

एल्बो ग्रॅब स्ट्रेच हा सर्वात सामान्य स्ट्रेचिंग व्यायामांपैकी एक आहे. या व्यायामामुळे खांद्याच्या आणि हाताच्या स्नायूंमध्ये लवचिकता वाढण्यास मदत होते. एल्बो ग्रॅब किंवा क्रॉस-बॉडी स्ट्रेच करण्यासाठी सर्वप्रथम सरळ उभे रहा. आता, तुमचा उजवा हात उचला आणि डावीकडे 90 अंश कोनात हलवा. आपला उजवा हात कोपरावर धरून, ताण वाढवण्यासाठी आपला डावा हात वापरा. काही सेकंद या स्थितीत राहा. ही क्रिया डाव्या हातासाठीही करा. डावा हात उजवीकडे 90 अंश कोनात हलवा व उजव्या हाताने डाव्या कोपरावर ताण द्या.  शरीराची लवचिकता वाढवण्यासाठी आणि शरीरातील कडकपणा कमी करण्यासाठी, या स्ट्रेचिंगचे किमान 4-5 सेट करा.

Exercises For Frozen Shoulder
Exercises For Frozen Shoulder

टॉवेल स्ट्रेच 

नावाप्रमाणेच, आपल्याला या स्ट्रेचिंगसाठी टॉवेलची आवश्यकता आहे. डावा हात पाठीमागे कमरेवर घ्या व टॉवेलचे एक टोक धरा व त्याच वेळी उजवा हात मानेच्या मागे न्या व टॉवेलचे दुसरे टोक धरा. काही वेळ या स्थितीत स्थिर राहा. आता स्थिती बदला आणि उजवा हात खाली घ्या व डावा हात वर घ्या. हे स्ट्रेचिंग 10 वेळा पुन्हा करा.

हे स्ट्रेचिंग केल्याने सांधे आणि स्नायूंना अधिक आराम मिळेल. नियमित व्यायाम केल्याने तुमच्या सांध्यातील लवचिकता वाढण्यास मदत होते. परंतु तीव्र वेदना झाल्यास, कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Photo Credit – istockphoto

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

27 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT