ADVERTISEMENT
home / Acne
facial clean up mistakes can increase pimples

फेशिअल करताना कराल ‘या’ चुका तर चेहऱ्यावर येतील पिंपल्स

तुम्ही नियमित स्कीन केअर रूटिन फॉलो करता. महिन्यातून एकदा चांगलं फेशिअल करता पण असं असूनही काही दिवसातच तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स वाढू लागतात का? जर तुम्हाला सतत पिंपल्सचा त्रास जाणवत असेल तर काही बाबतीत सावध राहणं खूप गरजेचं आहे. कारण फेशिअल करताना जर तुमच्याकडून नकळत काही चुका घडत असतील तर त्याचा परिणाम त्वचेवर होऊन तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स निर्माण होत आहेत.  यासाठी या चुका फेशिअल करताना मुळीच करू नका.

फेशिअल करताना करू नका या चुका

फेशिअलमध्ये क्लिनिंग, टोनिंग, स्क्रबिंग, मसाज, फेसपॅक या स्टेप्स फॉलो केल्या जातात. आजकाल अनेक जणी फेशिअल किट घरी आणून त्वचेची निगा राखण्याचा प्रयत्न करतात. मात्र जर तुम्हाला पिंपल्स येत असतील तर या चुका मुळीच करू नका.

चेहरा स्वच्छ न करणे

कोणतंही प्रॉडक्ट चेहऱ्यावर लावण्यापू्र्वी चेहरा धुणे खूप गरजेचं आहे. मात्र तुम्ही असं न करता एकादं क्लिंझर अथवा स्क्रबर त्वचेवर लावालं तर त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील धुळ, माती त्वचेच्या छिद्रांमध्ये जाते आणि तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात. यासाठी सर्वात आधी चेहरा स्वच्छ धुवा. यासोबतच पिंपल्सना करा bye bye या सोप्या उपायांनी (Tips To Avoid Pimples In Marathi)

चेहऱ्यावर क्लिंझर न वापरणे 

चेहरा फेसवॉशने धुतल्यावक चेहऱ्यावर सौम्य क्लिंझर लावणं गरजेचं आहे. कारण त्वचेवर इतर प्रॉडक्ट लावण्यापूर्वी त्वचा खोलवर स्वच्छ करायला हवी. जर तुम्ही असं न करता थेट स्क्रबर त्वचेवर लावलं तर त्वचेवर रॅशेस येतात. नैसर्गिक पद्धतीने त्वचा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही कच्चं दूध त्वचेवर लावू शकता. ज्यामुळे त्वचेवर रॅशेस येणार नाहीत.

ADVERTISEMENT

चुकीचे स्क्रब वापरणे

तुम्ही त्वचेवर कोणतं स्क्रब वापरता यावर तुमच्या त्वचेचं आरोग्य ठरू शकतं. कारण तुम्ही घरगुती स्क्रब वापरा अथवा बाजारात मिळणारं एखादं प्रॉडक्ट पण त्या स्क्रबमध्ये जर जाडसर कण असतील तर त्यामुळे तुमच्या त्वचेचं नुकसान होऊ शकत. ज्यामुळे पुढे तुम्हाला पिंपल्स येण्याची शक्यता वाढते.

त्वचा हायड्रेट न राखणं 

फेशिअल अथवा फेसमास्क लावल्यानंतर त्वचा कोरडी होते. अशा वेळी त्वचेला हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे. त्वचेवर एखादं जेल अथवा सीरम लावून तुम्ही त्वचा ओलसर ठेवू शकता. कारण पिंपल्सचा येण्याचा धोका फक्त तेलकट त्वचेलाच नाही तर अति कोरड्या त्वचेलाही असतो. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

28 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT