ADVERTISEMENT
home / आरोग्य
वाढत्या वजनाचा सेक्स लाईफवर होतो परिणाम

स्त्री-पुरुष दोघांमध्ये वाढलेले फॅट आणू शकते सेक्स लाईफमध्ये अडथळा

हेल्दी लाईफस्टाईल हल्ली प्रत्येकालाच हवी असते. त्यासाठी वजन कमी करणे, जीम करणे या सगळ्या गोष्टी सगळेच करायला लागले आहेत.वाढलेल्या वजनाचा परिणाम हा केवळ तुमच्या दिसण्यावर होतो असे नाही. तर त्याचा परिणाम हा कपल्सच्या सेक्स लाईफ (Sex Life) वर देखील होऊ लागला आहे. फक्त स्त्रियांचे वजन वाढले की, त्याचा परिणाम सेक्सवर होतो असे नाही तर पुरुषांचे वाढलेले वजन हे देखील सेक्ससाठी कारणीभूत ठरु शकते. वाढत्या वजनामुळे तुमचे सेक्स लाईफ पूर्वीसारखे राहिलेले नाही असे तुम्हाला वाटत असेल तर त्यामागे तुमचे वाढलेले वजन कारणीभूत असू शकते. वाढलेल्या वजनाचा नेमका कसा परिणाम होतो ते घेऊया जाणून

योनी मार्गास अडथळा

बहुतांश वेळा महिलांच्या ओटीपोटाचा भाग हा वाढलेला असतो. वाढलेले पोट योनीच्या दिशेने झुकते. त्यामुळे सेक्स करताना महिलांचे ओटीपोट हे अनेकदा अडथळा ठरते. महिलांना सेक्सचा आनंद घ्यायचा असेल तर त्यांनी त्यांचा बांधा सुडौल ठेवणे अधिक गरजेचे असते. (अनेकदा स्थुल महिला यांना असा त्रास होत नाही हे खरे आहे. कारण त्यांची शरीरयष्टी ही जन्मत:च तशी असेल तर त्यांना अडथळा येत नाही) पण ज्या महिलांचे वजन लग्नानंतर किंवा सेक्सनंतर वाढते. अशावेळी कालांतराने महिलांना सेक्स करताना योनी मार्गाजवळ फॅट वाढल्याने अडथळा येऊ शकतो.

पुरुषांच्या लिंगाचा आकार लहान वाटणे

महिलांप्रमाणेच पुरुषांचेही वजन अचानक वाढू लागले. खाण्यावर नियंत्रण सुटला किंवा व्यायाम केला नाही की त्यांच्यामधील सेक्स कमी होऊ लागतो. यास कारणीभूत त्यांच्या लिंगाच्या आजुबाजूला साचलेली चरबी आहे. खूप पुरुषांना त्यांच्या लिंगाच्या आजुबाजूला साचलेली चरबी किंवा वाढलेले वजन जाणवत नाही. पण ज्यावेळी त्यांना सेक्स करताना प्लेझर मिळत नाही. त्यामागे त्यांची वाढलेली चरबी कारणीभूत असते. अशी परिस्थिती पुरुषांवर ओढावली असेल तर अशावेळी पुरुषांना देखील त्यांचे वजन कमी करणे फारच जास्त गरजेचे असते.

कंटाळा येणे

सेक्समध्ये आनंद घेणे हे दोघांनाही गरजेचे असते. दोघांपैकी एकाला सेक्सचा आनंद घ्यायचा असेल आणि दुसऱ्याचे वजन वाढलेले असेल तर ज्या सेक्स पोझीशन जोडीदाराला करायची इच्छा असेल ती दुसऱ्याला करता येत नाही. त्यामुळे समोरच्याचा हिरमोड होतो. सेक्स पोझीशन ट्राय करायचा विचार करत असाल आणि जोडीदारची साथ त्याच्या केवळ वजनामुळे नसेल तर नक्कीच अशावेळी तुमच्यामधील जोडीदाराचा रसही कमी होऊ लागतो. याचा परिणाम नुसता सेक्सवर नाही तर तुमच्या वैवाहिक आयुष्यावरही होतो. त्यामुळे कंटाळा येणे या स्टेजवर आला असाल तर तुमचे वजन तपासा. 

ADVERTISEMENT

अशा प्रकारे तुमचे वाढलेले वजन तुमच्या सेक्स लाईफवर परिणाम करत असते. पुढे जाऊन त्याचा परिणाम मुलं न होणे, वंध्यत्व, गर्भधारणेस अडथळा अशा काही गोष्टींवर देखील होऊ शकते. त्यामुळे शरीरात फॅटचे प्रमाण वाढले असेल तर सगळ्यात आधी तुम्ही आहारात आणि लाईफस्टाईलमध्ये बदल करुन सेक्स लाईफचा आनंद घ्या. 

19 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT