ADVERTISEMENT
home / Jewellery
गेरु फिनिश दागिने

सोन्याच्या दागिन्यांना द्या गेरु फिनिंशिंग

 कितना सोना है सोने जैसा तेरा मन’ कितीही आणि काहीही म्हणा सोनं हे सोनं असतं. त्याची किंमत कितीही नाही करायची म्हटली तरी आपल्या देशात या धातूला फारच किंमत आहे. लग्नसमारंभ, अडीअडणीसाठी घरी सगळेच सोन्याची खरेदी करतात. दागिन्यांच्या बाबतीत महिलांना सोन्याच्या दागिन्याचं फारच वेड असतं.  सोन्याचे दागिने घेताना वेगवेगळे दागिने घेण्याची इच्छा असते. अशावेळी तुम्हाला काहीतरी वेगळे घ्यायचे असतील तर तुम्ही गेरु फिनिशिंगचे दागिने घेऊ शकता. गेरु फिनिशिंगचे दागिने म्हणजे काय? असा प्रश्न पडला असेल तर या दागिन्यांविषयी आणि त्याच्या काळजीविषयी जाणून घेऊया 

चकाकतं ते सोनं असतं पण…

सौजन्य : Instagram

आता सोनं म्हटलं की, त्याला एक मस्त सोनेरी चकाकी असते ही वस्तू सोन्याची असेल असं आपण त्याचा रंग पाहूनच ओळखतो. गेरु म्हणजे गैरिका( Red ochre) अर्थात हा अॅल्युमिनिआ आणि ऑक्साईड ऑफ आर्यन आहे. याला आयुर्वेदात गेरु म्हटले जाते. एखाद्या धातूला एकदम स्लिक लुक देण्यासाठी त्याचा वापर केला जातो. पूर्वीच्या काळी याचा अधिक वापर केला जात होता. पण आता हा वापर कमी झालेला आहे. पण जुनी फॅशन परतून येते म्हणतात अगदी त्याचप्रमाणे गेरु फिनिशिंगचे दागिने आता पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आहेत.

गेरु फिनिश दागिने घेताना

हल्ली बऱ्याच सोनारांकडे असे दागिने असतात. ते खास ऑर्डरवर बनवून दिले जातात. एखादा दागिना घडवल्यानंतर जर तुम्हाला तो गेरु फिनिशमध्ये हवा असेल तरी देखील तुम्ही करु शकता. गेरु फिनिश दागिने हे करण्यासाठी खास मशीन असावी लागते असे केले तरच तुमच्या दागिन्यांना तुम्हाला हा लुक देता येतो. गेरु फिनिशचे दागिने केल्यानंतर ते वापरेपर्यंत तुमचे दागिने थोडे लाल दिसतात. वापरानंतर दागिन्यांच्या रंग छान मॅट फिनिश केलला दिसू लागतो. या दागिन्यांमध्ये डिझाईन चांगली उठून दिसते.

गेरु फिनिश दागिन्यांचे हे प्रकार निवडा

गेरु फिनिश दागिने निवडताना त्यामध्ये ठुशी, कोल्हापुरी साज, टेंपल ज्वेलरीचे काही प्रकार खूपच सुंदर दिसतात. जर तुम्हाला अशा प्रकारातील दागिने बनवायचे असतील तर तुम्ही नक्की अशा काही डिझाईन्स बनवून घ्या. कोणत्याही लग्न समारंभात असे दागिने चांगलाच भाव खाऊन जातात. असे दागिने हे ट्रेंडमध्ये असल्यामुळे तुम्ही नक्कीच ते ट्राय करायला हवे. खोट्या दागिन्यांच्या प्रकारामध्य देखील असे दागिने मिळतात. ज्यांना सोन्याची चकचक आवडत नाही त्यांच्यासाठी दागिन्याचा हा प्रकार एकदम मस्त आहे. तुम्ही अगदी हमखास असे दागिने वापरुन बघायला हवेत. त्यानंतर तुम्ही त्यापासून तुम्ही सोन्याचे दागिने बनवायला हवेत.

ADVERTISEMENT

गेरु फिनिश दागिन्यांची काळजी

सौजन्य : Instagram

गेरु फिनिश दागिने घेतल्यानंतर त्याची काळजी घेणे देखील तितकेच गरजेचे असते. तुम्ही अशा प्रकारे घेतले असतील तर या गोष्टी लक्षात ठेवा.

  1. गेरु फिनिश दागिने घेताना ते पाण्यापासून लांब ठेवा. 
  2. अशा दागिन्यांवर थेट परफ्युमचा वापर करु नका. कारण असे केल्यामुळे दागिने खराब होऊ शकतात. 
  3. हे दागिने नाजूक असतात. त्यामुळे त्यांना कसेही ठेवून चालत नाही तर ते दागिने नीट ठेवाने लागतात. 

आता नक्की ट्राय करा असे गेरु फिनिश्ड दागिने

अधिक वाचा

सिल्व्हर प्लेटेट दागिने आहे सध्याचा ब्रायडल ट्रेंड

ADVERTISEMENT

पावसाळी चपला लागत असतील तर पायांची अशी घ्या काळजी

चोकर सेट जे वाढवतील तुमच्या गळ्याची शोभा

27 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT