ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
सुंदर त्वचा सवयी

चांगली त्वचा मिळते या काही सवयींनी, नक्की जाणून घ्या


चांगली सुंदर त्वचा (Beautiful Skin) हे प्रत्येकीचे स्वप्न असते. त्यासाठी काही गोष्टींचा त्याग आणि काही गोष्टींचा स्विकार हा नक्कीच करायला हवा. त्यामध्ये सातत्यही तितकेच हवे असते. खूप जण उत्तम त्वचा मिळवण्याचे स्वप्न उराशी बाळगतात. त्यासाठी काही प्रयत्नही सुरु करतात. पण अचानक कंटाळून सगळे काही सोडून देतात. त्यामुळे तुम्ही चांगली त्वचा मिळवण्यापासून दूर होता. चांगली त्वचा मिळते ती काही चांगल्या सवयींनी या सवयी कोणत्या त्या तुम्ही जाणून घ्यायला हव्यात. जर तुम्ही नव्याने सगळे काही करण्याचा विचार करत असाल तर या काही सवयी चांगल्या त्वचा मिळवण्यासाठी उपयोगी येतील.

( या टिप्स तुम्हाला आवडल्या तर तुमच्या खास मित्रांसोबत शेअर करायला अजिबात विसरु नका.)

स्किनकेअर टाळू नका

स्किनकेअर टाळू नका

स्किनकेअर खूप जणांना टाळायची सवय असते. पण तुमची त्वचा चांगली राहावी यासाठीच हे स्किनकेअर असते. हल्लीचे वातावरण आणि लाईफस्टाईल पाहता आपल्याला चेहऱ्यावर केमिकल्सयुक्त अशा काही स्किनकेअरचा उपयोग करावा लागतो अशी भिती असेल तर हल्ली अनेक नैसर्गिकघटक असलेले स्किनकेअर मिळतात. त्यामुळे अशा स्किनकेअरचा उपयोग करा. फेशवॉश,टोनर, मॉश्चरायझर, सनस्क्रिन असे तुम्ही स्किन रुटीनमध्ये फॉलो केले तर त्याचे चांगले परिणाम त्वचेवर नक्कीच दिसून येतात. त्यामुळे शक्यतो तुम्ही सगळे स्किनकेअर करा. 

पाण्याचे सेवन करा

पाणी हे त्वचेसाठी खूपच महत्वाचे असते. जर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी प्याल तर तुम्हाला त्याचे योग्य परिणाम मिळते. त्वचेला पाण्याची फारच गरज असते. पाण्यामुळे पोटाचे आरोग्य चांगले राहते. शिवाय त्वचेखाली असलेले कोलॅजनही त्यामुळे बुस्ट होण्यास मदत मिळते. त्यामुळे चांगली त्वचा हवी असेल तर तुम्ही अगदी नियमतपणे पाण्याचे सेवन करा. 

ADVERTISEMENT

प्रयोग टाळा

खूप जणांना चेहऱ्यावर सतत प्रयोग करण्याची सवय असते. पण हे प्रयोग योग्य पद्धतीने झाले तर ठिक. पण जर तुम्ही करत असलेले प्रयोग चुकीचे असतील तर त्यामुळे त्वचा खराब होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे त्वचेवर ऑनलाईन प्रयोग करणे टाळा. त्याऐवजी एक योग्य डॉक्टर करुन किंवा योग्य सल्ला घेऊन तुम्ही मग प्रयोग करा त्यामुळे त्वचा चांगली राहते. 

काळजी घेणे सोडू नका

काळजी घेणे सोडू नका

त्वचा चांगली झाली की आपण इतके खूश होतो की, आपल्याला आता काहीही काळजी करायची गरज नाही. असे आपल्याला वाटू लागते. पण ही तुमची सगळ्यात मोठी चूक आहे.  त्वचेची काळजी ही त्वचा वाईट असो वा चांगली घेणे कायम गरजेचे आहे. बाहेरुन आल्यानंतर मेकअप काढणे, चेहरा स्वच्छ करणे, मॉश्चरायईज करणे असे सगळे करणे फार जास्त गरजेचे असते. त्यामुळे काळजी घेणे सोडू नका. चेहऱ्यासाठी एखादा व्यायाम माहीत असेल तर तो देखील अगदी आवर्जून करा. त्यामुळेही त्वचा सुंदर राहते

चेहऱ्यावर प्रेम करा

आपली त्वचा कशीही असो ती आपली आहे त्यामुळे त्याच्यावर प्रेम करणे अजिबात सोडू नका. खूप जण आपली त्वचा आणि दुसरी त्वचा याची सतत तुलना करत राहतात. अशी तुलना ही त्वचेसाठी फारच घातक असते. तुमचा चेहरा जसा आहे तसा असू द्या काही हरकत नाही. कालांतराने तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला हा फरक नक्कीच दिसून येईल. त्यामुळे स्वत:वर प्रेम करणे सोडू नका. 

आता चांगली त्वचा मिळवण्यासाठी या काही चांगल्या सवयी नक्की लावा. 

ADVERTISEMENT
12 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT