ADVERTISEMENT
home / मनोरंजन
Govinda and Karisma Kapoor

गोंविदा-करिश्माची सुपरहिट जोडी 22 वर्षांनंतर पुन्हा झळकणार एकत्र, डान्स व्हिडिओ व्हायरल

गोविंदा आणि करिश्मा कपूर या सुपरहिट जोडीने बॉलीवूडमधील नव्वदीचा काळ अक्षरश: गाजवला होता. त्यामुळे चाहत्यांना या जोडीला पुन्हा एकदा एकत्र पाहण्याची नक्कीच इच्छा आहे. विशेष म्हणजे जवळजवळ बावीस वर्षांनी ही सुपरहिट जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. टेलीव्हिजन माध्यमातील सुपरहिट शो ‘इंडियाज गॉट टॅलेंट’च्या होळी स्पेशल एपिसोडमध्ये ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येमार आहे. सध्या या एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये गोविंदा आणि करिश्माच्या त्यांच्या ‘युपी वाला ठुमका’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. त्यामुळे चाहत्यांना या शोचा हा स्पेशल एपिसोड कधी एकदा प्रसारित होतोय असं झालं आहे.

गोविंदा आणि करिश्मा बावीस वर्षांनी एकत्र

गोविंदाचा आणि करिश्मा हे त्यांच्या अभिनयासोबतच युनिक डान्स मुव्हसाठी प्रसिद्ध आहेत. या दोघांनी आजवर अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. ज्यामधील शेकडो गाणी आजही लोकप्रिय आहेत. आता त्यांच्या या डान्सचा जलवा बावीस वर्षांनी पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.कारण गेली अनेक वर्ष ती दोघं कोणत्याही चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आलेली नाहीत. 2000 साली शिकारी चित्रपटातून त्यांनी शेवटचे एकत्र काम केले होते. त्याआधी त्यांचे मुकाबला, प्रेमशक्ती, दुलारा, खुद्दार, कुली नं 1, साजन चले ससुराल, हिरो नं 1, राजाबाबू, हसीना मान जायेगी असे अनेक चित्रपट हिट ठरले होते. आता इतक्या वर्षांनी इंडियाज गॉट टॅलेंच्या होळी स्पेशल कार्यक्रमात या दोघांचे काही परफॉर्मेन्स प्रेक्षकांना पुन्हा पाहायला मिळणार आहेत. गोविंदा आणि करिश्माचा फॅन फॉलोव्हर आजही कमी नाही. त्यामुळे वाहिनीने या दोघांच्या डान्स व्हिडिओमधून कार्यक्रमाचं जोरदार प्रमोशन सुरू केलं आहे.

इंडियाज गॉट टॅलेंटचा नववा सीझन

टेलीव्हिजनवर एखाद्या रिअॅलिटी शोचा सीझन सुरू झाला की तो संपेपर्यंत चाहत्यांना खिळवून ठेवलं जातं. आता इंडियाज गॉट टॅलेंटचा 9 वा सीझन सध्या सुरू आहे. ज्यामध्ये शिल्पा शेट्टी, बादशाह, किरण खेर, मुंताशिर हे परिक्षकाचे काम बघत आहेत. करिश्मा आणि गोविंदा या शोमध्ये पाहुणे कलाकार म्हणून आलेले आहेत. सध्या करिश्मा आणि गोविंदा अशा अनेक रिअॅलिटी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसतात. मात्र पहिल्यांदाच ते दोघं एकत्र एका कार्यक्रमात पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे या शोचा होळी स्पेशल एपिसोड पाहण्याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

11 Mar 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT