ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
hair-care-in-winter

थंडीतील केसांची काळजी, तज्ज्ञांच्या टिप्स

हिवाळा आपल्या शरीरासाठी नक्कीच सुखदायक ठरू शकतो, परंतु हा थंड वारा तुमच्या केसांचे खूप नुकसान करू शकतो ज्यामुळे ते ड्राय अर्थात कोरडे, फ्लॅकी आणि फ्रिझी अर्थात गुंतागुंतीचे होतात. पण काळजी करू नका! संपूर्ण हंगामात तुमच्या स्कॅल्प आणि केसांना आनंदी ठेवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी केसांची काळजी घेण्याच्या काही उत्तम टिप्स घेऊन आलो आहोत. सरिना आचार्य, आर्टिस्टिक हेड – हेयर, एंरीच यांच्याकडून आम्ही काही टिप्स घेतल्या. ज्यामुळे तुम्ही थंडीत केसांची व्यवस्थित काळजी घेऊ शकता. थंडीमध्ये केसांची काळजी कशी घ्यावी आणि काय करायला हवे हे अगदी सोप्या पद्धतीने आम्ही सांगत आहोत. सरिना आचार्य यांनी हे अधिक सोप्या पद्धतीने सांगितले आहे. 

1. कंडिशनिंग आवश्यक आहे:

तुम्हाला तुमच्या केसांना कंडीशनिंग (Hair conditioning) करणे आवश्यक आहे असे वाटत असले तरीही, डीप हायड्रेशन (deep hydration) आणि नरिशमेंटसाठी अर्थात केसांच्या पोषणासाठी नारळाचे तेल, ऑलिव्ह ऑईल, जोजोबा तेल आणि शिया बटर यासारखे नैसर्गिक तेल असलेले घट्ट, क्रिमी कंडिशनरने केस मॉइश्चराइझ करणे नेहमीच शहाणपणाचे असते. तुम्ही यापैकी कोणताही पर्याय वापरू शकता आणि विशेषत: थंड हंगामासाठी तुमचा कंडिशनर इंटेन्स मॉइश्चरायझिंग मास्कमध्ये बदलू शकता.

2. स्कॅल्प केअर:

स्कॅल्प (टाळू) हा तुमच्या त्वचेचा विस्तार आहे आणि म्हणूनच हिवाळ्यात टाळूच्या समस्या जसे की कोरडी त्वचा, केसात कोंडा होणे आणि टाळूला खाज सुटणे यासारख्या समस्या थंडीच्या दिवसात अधिक होतात. अशी परिस्थिती टाळण्यासाठी, टाळू स्वच्छ करण्यासाठी आणि डेड सेल्स तयार होण्यापासून मुक्त ठेवण्यासाठी आठवड्याला क्लॅरीफायिंग शँपू वापरा. यामुळे त्वचा अधिक चांगली राहते आणि तुमचे केस थंडीमध्ये खराब होत नाहीत. 

3. प्रोटेक्शन अर्थात केसांची सुरक्षा:

coconut milk

शँपूनंतर आर्द्रता आणि कोरडेपणापासून संरक्षण करणे ही तुमच्या केसांची गुणवत्ता राखण्यासाठी पुढील महत्त्वाची पायरी आहे. अतिरिक्त मॉइस्चर त्यामध्ये अॅड करण्यासाठी लीव्ह इन क्रीम वापरणे आणि त्याला सीरमचे काही थेंबाने टॉपिंग करणे आवश्यक आहे. विशेषत: तुमच्या केसांच्या लांबीवरून सीरम ना केवळ सिल्की, स्मूथ फिनिश देईल तर यामुळे केसांच्या कोरडेपणाची चिन्हेदेखील सहजपणे लपवणे शक्य होते आणि कोरड्या हवामानापासून तुमच्या केसांना संरक्षणदेखील मिळते.

ADVERTISEMENT

4. इंटेन्स मॉइश्चरायझिंग ट्रीटमेंट:

दर आठवड्याला, तुमच्या केसांना पोषण देण्यासाठी आणि स्ट्रँड मजबूत करण्यासाठी डीप कंडिशनिंग ट्रीटमेंट करा. केसांना कोरडे होण्यापासून रोखण्यासाठी पर्यायी कंडिशनर आणि मास्क हा एक सोपा पण प्रभावी उपाय असू शकतो. अंडी आणि मधासारख्या पोषक आणि मॉइश्चरायझिंग घटकांसह एक साधा घरगुती हेयर मास्क चमत्कार दाखवू शकतो. ओव्हरनाईट हायड्रेशनसाठी तुम्ही हेअर ऑइल किंवा सीरमसहदेखील त्याचा वापर शकता.

थंडीमध्ये केसदेखील त्वचेप्रमाणेच कोरडे होतात आणि उन्हाळ्यापेक्षा केसांच्या समस्या अधिक थंडीच्या दिवसांमध्ये होतात. केसांची काळजी थंडीत घेण्यासाठी वरील सोप्या टिप्स तुमची नक्कीच मदत करतील. तसंच तुम्ही तुमच्या त्वचेप्रमाणेच केसांचीही काळजी घेण्याची गरज आहे अन्यथा थंडी संपल्यानंतर केसांना योग्य पोषण न मिळाल्यास केस अधिक खराब होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे वेळीच काळजी घ्या!

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

15 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT