ADVERTISEMENT
home / त्वचेची काळजी
तुमची त्वचा अती संवेदनशील असेल तर असे निवडा मेकअप प्रॉडक्ट

तुमची त्वचा अती संवेदनशील असेल तर असे निवडा मेकअप प्रॉडक्ट

त्वचेचे निरनिराळे प्रकार आहेत. त्वचेच्या  प्रकारानुसार मेकअप प्रॉडक्ट खरेदी करणं गरजेचं आहे. जर तुमची त्वचा अती संवेदनशील असेल तर जास्त काळजी करण्याची मुळीच गरज नाही. फक्त तुम्हाला इतरांपेक्षा त्वचेची निगा जास्त प्रमाणात राखण्याची गरज आहे. कारण बेसावधपणे मेकअप प्रॉडक्ट वापरले तर त्वचेमध्ये खाज, जळजळ, दाह, रॅशेस, फोड येण्याची शक्यता आहे. यासाठीच मेकअप प्रॉडक्ट खरेदी करताना संवेदनशील त्वचेच्या लोकांनी विशेष काळजी घ्यायला हवी.

संवेदनशील त्वचा असेल तर मेकअप करताना या गोष्टी ठेवा लक्षात –

जर तुम्ही मेकअपचे साहित्य नव्याने खरेदी करत असाल तर ते खरेदी करण्यापूर्वी त्याबद्दल तुम्हाला  काही गोष्टी आधीच माहीत असायला हव्या. कारण कोणतेही नवीन प्रॉडक्ट त्वचेवर लावल्यावर त्याचा परिणाम तुमच्या संवेदनशील त्वचेवर होण्याची शक्यता आहे.

मेकअप प्रॉडक्टवरील माहिती वाचा

जेव्हा तुम्ही एखादे प्रॉडक्ट खरेदी करता तेव्हा त्यावर सर्व माहिती असते. तुमच्या त्वचेला सूट होईल असंच प्रॉडक्ट यासाठी खरेदी  करा. त्याचप्रमाणे सर्व मेकअप प्रॉडक्टवर त्याची एक्सायरी डेट दिली असते. जर तुम्ही असे प्रॉडक्ट खराब झाले नाहीत म्हणून जास्त दिवस वापरले तर इतरांपेक्षा संवेदनशील त्वचेवर याचे परिणम लवकर दिसून येतात. यासाठी लक्षात ठेवा नेहमी नवीन मेकअप प्रॉडक्टच वापरा.

चेहरा धुताना फॉलो करा या स्किन केअर टिप्स

ADVERTISEMENT

मेकअप टूल्स स्वच्छ ठेवा

मेकअप करणाऱ्या प्रत्येकाने  हा नियम पाळायलाच हवा. मेकअप टूल्स स्वच्छ आणि निर्जंतूक असतील तर त्वचेला इनफेक्शन होण्याचा धोका कमी असतो. मात्र इतरांपेक्षा संवेदनशील त्वचेला या टूल्समधून इनफेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. यासाठीच तुम्ही तुमचे मेकअप टूल्स स्वतः योग्यय पद्धतीने स्वच्छ होतील याची काळजी घ्यायला हवी. त्याचप्रमाणे मेकअप टूल्सदेखील काही ठराविक काळानंतर बदलून नवीन घ्यायला हवे. कारण तेच तेच ब्युटी ब्लेंडर अथवा मेकअप ब्रश खूप वर्ष वापरण्यामुळे तुमच्या त्वचेला रॅशेस येऊ शकतात.

खडबडीत त्वचेला मेकअपने द्या असा स्मूथ लुक

मेकअपआधी त्वचेला करा तयार

मेकअप करण्याआधी त्वचेची विशेष काळजी घ्यायला हवी. यासाठी मेकअप लावण्याआधी चेहरा धुवून घ्या, टोनर आणि मॉईस्चराईझरने त्वचा नीट तयार करा. तुमच्या त्वचेला सूट करतील असे क्लिंझर, टोनर आणि मॉईस्चराईझर वापरा. मेकअप आधी प्रायमरने चेहरा सुरक्षित करा आणि मगच मेकअपला सुरूवात करा.

पावसाळ्यात असेल लग्न, तर नववधूने लक्षात ठेवाव्या या मेकअप टिप्स

ADVERTISEMENT

मेकअप काढल्याशिवाय झोपू नका 

मेकअप केल्यावर तुम्हाला कितीही उशीर झाला तरी तो व्यवस्थित न काढता मुळीच झोपू नका. कारण जर रात्रभर तुमच्या चेहऱ्यावर मेकअप राहिला तर घामामुळे त्वचेला इनफेक्शनचा धोका निर्माण होऊ शकतो. शिवाय यामुळे रात्रभर तुमच्या त्वचेला ऑक्सिजन मिळत नाही. ज्यामुळे त्वचा निस्तेज आणि कोरडी होते. यासाठीच मेकअप व्यवस्थित काढा. त्वचेला नाईट क्रिम लावा आणि मग झोपा. 

पावसाळ्यासाठी निवडा या खास शेडच्या लिपस्टिक दिसा खास

03 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT