ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
health-benefits-of-eating-curry-leaves

रिकाम्या पोटी कडिपत्ता खाण्याचे अफलातून फायदे

आजकाल आपले आयुष्य इतके बदलले आहे की, आपली तब्बेत सांभाळण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टी कराव्या लागतात. विशेषतः खाण्यावर लक्ष द्यावे लागते. सतत धावपळ, खाण्याची बदलेली वेळ यामुळे खूपच त्रास होतो. पण तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यात काही बदल केले आणि आपले हेल्दी रूटिन थोडेसे बदलले तर तुमचे आयुष्य नक्कीच चांगले राहू शकता. सकाळी उठल्यानंतर तुम्ही कडिपत्ता आपल्या खाण्यात समाविष्ट करून घेतला तर तुमच्या आरोग्यासाठी अफलातून फायदे मिळतात. कडिपत्ता हा तर आपल्याला प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात मिळतो. कडिपत्त्यामुळे जेवणाला एक वेगळा स्वाद मिळतो आणि जेवणाची चव अधिक चविष्ट होते. पण तुम्हाला माहीत आहे का? रिकाम्या पोटी कडिपत्ता खाण्याचे नक्की काय फायदे आहेत? कडिपत्ता हा तुमची त्वचा, केस आणि संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. आपल्या जेवणात फोडणीपलिकडेही तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी कडिपत्ता खाल्ल्याने आरोग्याला फायदा मिळतो. कसा फायदा करून घ्यायचा ते पाहूया. 

केसगळती नियंत्रित करण्यासाठी होते मदत 

कडिपत्ता हा केसगळतीवर अप्रतिम ठरतो. सकाळी सकाळी उठल्यानंतर तुम्ही सर्वात पहिल्यांदा एक ग्लास पाणी प्या. काही मिनिट्सनंतर तुम्ही कडिपत्त्याची ताजी पाने चाऊन खा. हे कडिपत्त्याची पाने तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने चावा. नाश्ता करण्यापूर्वी कमीत कमी 30 मिनिट्सपूर्वी अर्थात अर्धा तास आधी तरी तुम्ही कडिपत्ता खा. कडिपत्त्यामध्ये विटामिन सी, फॉस्फोरस, लोह, कॅल्शियम आणि निकोटिनिक असिड भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे केसगळतीची समस्या असेल तर कडिपत्ता नियमित खाल्ल्याचा उपयोग होतो. केसवाढीसाठीही कडिपत्ता उपयोगी ठरतो.

पचनशक्ती वाढविण्यासाठी मदत करते 

रिकाम्या पोटी कडिपत्त्याचे सेवन केल्यास, तुमची पचनशक्ती अधिक प्रमाणात चांगली होते. जेव्हा पोट रिकामं असतं तेव्हा सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही कडिपत्त्याचे सेवन करा. कडिपत्ता हा पचन एजांईमा उत्तेजित करतो आणि मलत्याग करण्यासाठी उपयोगी ठरतो. तसंच तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर कडिपत्त्याच्या सेवनाने याची समस्या दूर होण्यास मदत मिळते. 

सकाळची मळमळ होत असेल तर फायदेशीर

Malmal Hot Asel Tar Gharguti Upay

बऱ्याच जणांना सकाळी उठल्यानंतर काहीच खावंसं वाटत नाही आणि खूपच मळमळ होते. याला मॉर्निंग सिकनेस असं म्हणतात. पचनक्रिया न झाल्यामुळे हा त्रास होतो. तुम्हालाही असा त्रास असेल तर तुम्ही कडिपत्ता रोज सकाळी न चुकता नियमितपणे खायला हवा. तुम्ही रोज कडिपत्त्याची 4-5 पाने रोज सकाळी रिकाम्या पोटी चावावीत. यामुळे तुम्हाला फायदा मिळतो आणि मॉर्निंक सिकनेसचा त्रास कमी होण्यास मदत मिळते. 

ADVERTISEMENT

वजन कमी करण्यासाठीही फायदा 

कडिपत्ता चाऊन खाल्ल्याने वजन कमी होण्यासही फायदा मिळतो. अधिक चांगले पचन, डिटॉक्सिफिकेशन, उत्तम कोलेस्ट्रॉल आणि आरोग्याचा फायदा होण्यासाठी याचा उपयोग होतो. वजन कमी करण्यासाठी कडिपत्ता तुम्ही नियमित खायला हवे. 

डोळ्यांसाठी होतो कडिपत्त्याचा उपयोग 

डोळ्यांची समस्या दूर करण्यासाठी कडिपत्त्याचे सेवन अत्यंत फायदेशीर ठरते. यामध्ये विटामिन ए असते जे तुमचे आरोग्य तंदुरूस्त राखण्यासाठी उपयोगी ठरते. कडिपत्ता तुमच्या वेगवेगळ्या पदार्थांमध्ये तुम्ही वापरू शकता. तुमच्या आहारात कडिपत्ता समाविष्ट करून तुम्ही डोळ्यांची रेटिना चांगला राहतो. तसंच डोळ्यांना त्रास होत नाही. 

हा लेख सामान्य माहितीनुसार आहे. यातील माहिती ही आम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने दिली असली तरीही तुम्ही याचा वापर करताना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करा. 

28 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT