ADVERTISEMENT
home / Friends and BFFs
Health Friends of Good Friends

चांगल्या मैत्रीचा आयुष्याबरोबरच आरोग्यावरही होतो सकारात्मक परिणाम 

टेक्नॉलॉजीचा उदय झाल्यापासून जग खूप जवळ आले आहे. माणसे तासंतास आभासी जगात राहून वेळ घालवत आहेत. आभासी दुनियेतील मैत्री, आवडी-निवडी आणि मनोरंजनाने आता लोकांचे आयुष्य अशा प्रकारे वेधून घेतले आहे की ते यातून हवे असले तरी बाहेर पडू शकत नाहीत. पण खऱ्या जगात चांगल्या लोकांशी मैत्री करणे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठीही उत्तम आहे. हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे की वास्तविक जीवनात तुमचे मित्रांसोबत बोलणे, समस्या शेअर करणे आणि अगदी गॉसिपिंग करणे देखील तुमच्या आरोग्यासाठी चांगले असते.नुकताच फ्रेंडशिप डे होऊन गेला आहे आणि जर तुम्ही तुमच्या चांगल्या मित्रमैत्रिणींना भेटला नसाल तर पुढच्या फ्रेंडशिप डे ची वाट बघू नका.  तुमच्या मित्रांसोबतचे तुमचे बंध पुन्हा मजबूत करा. कोरोनाच्या काळात आपल्या सर्वांसमोर अनेक आव्हाने उभी राहिली होती आणि ती अजूनही संपलेली नाही. अशा परिस्थितीत, आपले खरे मित्र आणि प्रियजनांशी जोडलेले राहणे अधिक महत्त्वाचे आहे. चांगल्या लोकांशी असलेली चांगली मैत्री तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी कशी फायदेशीर आहे हे जाणून घ्या. 

मैत्री रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यात मदत करते 

Health Benefits Of Good Friendship
Health Benefits Of Good Friendship

संतुलित,पौष्टिक आहार, व्यायाम आणि तणावाचे व्यवस्थापन हे निरोगी राहण्याचे मार्ग आहेत हे तर आपल्याला ठाऊक असते. परंतु आपल्या आयुष्यात सुख-दुःख वाटून घेण्यासाठी चांगले मित्र असतील तर आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. लांब राहत असल्याने क्वचित भेट होत असली तरी वेळेला आपल्या बरोबर आपले मित्र मदत करायला नक्की येतील या भावनेनेही धीर खूप वाढतो. निराश वाटत असताना तुमच्या मनातील गोंधळ दूर करून सकारात्मक विचार निर्माण करण्यासाठी मित्र तुम्हाला प्रेरणा देतात, तर कधी तुम्ही आजारी असताना किंवा अडचणीत असताना सतत लढायला प्रवृत्त करतात. म्हणूनच चांगले मित्र कळत नकळत रोगप्रतिकारकशक्ती वाढवत असतात. विज्ञान असेही मानते की चांगली मैत्री किंवा समर्थन गट आरोग्यासाठी बूस्टर म्हणून काम करतात.

मित्र देतात भक्कम भावनिक आधार

एकवेळ रक्ताचे नातेवाईक स्वार्थी वागतात पण चांगले मित्र कायम आपल्या पाठीशी उभे रहातात. असा अनुभव तुम्हालाही कधी ना कधी आला असेल की जी समस्या तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत काही कारणास्तव शेअर करू शकत नाही, ती तुम्ही तुमच्या जिवलग मित्राला सांगितली. तुमच्या मित्राने तुमचे म्हणणे ऐकून आणि समजून घेतले इतकेच नाही तर समस्येवर उपायही सांगितले. कठीण काळात मित्रांसोबत राहिल्याने माणसाला मानसिक बळ मिळते. जिवलग मित्र तुमचा तणाव दूर करण्यात मदत करतात, आणि सगळ्या प्रकारचे प्रयत्न करून तुम्हाला तणावातून बाहेर देखील काढतात. यामुळेच मित्रांच्या सहवासात तुम्हाला आनंद वाटतो. चांगली मैत्री माणसाला आयुष्यात भक्कम आधार देण्याचे काम करते. 

मित्रांमुळे वाढतात हॅपी हॉर्मोन्स 

मित्रांसोबत आपण बहुतेक वेळ हा मजा करण्यात, विनोद करण्यात घालवतो. यामुळे आपल्याला थोडा ब्रेक मिळतो, आपले भरपूर मनोरंजन होते आणि त्यामुळे शरीरात हॅपी हॉर्मोन्स स्त्रवतात. जेव्हा तुम्ही मित्रांसोबत असता तेव्हा डोपामाइन, सेराटोनिन सारखे हॅपी हॉर्मोन्स स्त्रवतात. हे संप्रेरक आनंदाची भावना निर्माण करतात तसेच तणाव आणि चिंता यांतून बाहेर पडण्यास मदत करतात.

ADVERTISEMENT
Health Benefits Of Good Friendship
Health Benefits Of Good Friendship

अर्थात हेही ध्यानात ठेवणे गरजेचे आहे की, तुमची मैत्री कशी आहे किंवा ज्या व्यक्तीला तुम्ही मित्र म्हणून निवडले आहे ती व्यक्ती कशी आहे. जर एखादा चांगला आणि समजूतदार मित्र तुम्हाला निरोगी राहण्यास मदत करू शकतो, तर एक स्वार्थी आणि धूर्त व्यक्ती मैत्रीचा गैरफायदा घेऊन तुम्हाला शारीरिक आणि मानसिक वेदना देऊ शकतो. त्यामुळे मैत्री करताना थोडी काळजी घ्या.तुम्ही मित्र म्हणून कोणाला निवडता ही निवड तुमची आहे.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

08 Aug 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT