ADVERTISEMENT
home / आरोग्य
ear pain home remedies

लहान मुलांचा कान दुखत असेल तर हे घरगुती उपाय करून बघा 

कान दुखणे खूप त्रासदायक असते. कान दुखत असेल तर मोठ्या माणसांनाही काही सुचत नाही तर लहान  मुलांसाठी हा त्रास सहन करणे अधिक कठीण असते. अनेक वेळा मुले रात्री झोपेतून उठतात आणि कानात दुखत असल्याची तक्रार करतात. अशा परिस्थितीत पालकांना असहाय्य वाटते कारण त्यांना त्यावेळी काय करावे हे पटकन लक्षात येत नाही. घरात पेनकिलर औषध असेल तर ठीक, अन्यथा मुलांचा त्रास कमी कसा करावा हे लक्षात येत नाही. रात्रीबेरात्री डॉक्टरांना भेटणेही शक्य नसते. त्यामुळे अशावेळी काही प्रथमोपचार माहित असणे आवश्यक आहे. कान दुखण्याचे कारण लक्षात आले तर त्यावर उपाय करणे सोपे होते. .कानाच्या मध्यवर्ती भागात बॅक्टेरिया किंवा विषाणूंचा संसर्ग, अति पोहण्यामुळे इअर कॅनालच्या अस्तराला संसर्ग, सर्दी, पडसे, घसा खवखवणे, दात किडणे, टॉन्सिल्समुळेही कानात वेदना होऊ शकतात. तसेच इअर कॅनालमध्ये फोड येणे किंवा इअर वॅक्समुळे कान बंद होणे, कानाला जंतुसंसर्ग झाल्यास कानात दुखणे अशी तक्रारही मूल करू शकते. कान दुखणे घरगुती उपाय करून कमी होऊ शकते.

बाळांच्या कानात वेदना होण्याचे कारण काय 

Home Remedies For Ear Pain In Child
Home Remedies For Ear Pain In Child

बाळांना कानात दुखते तेव्हा ते त्रासाने रडू लागतात.संसर्ग, कानात फोड, कानात पाणी जाणे किंवा कानाच्या पडद्याला छिद्र पडणे या कारणांमुळेही कानात वेदना होऊ शकतात. काही वेळा असे देखील दिसून आले आहे की लहान मुलाचे कान इअरबड किंवा इतर कोणत्याही कठीण कपड्याने स्वच्छ केले की त्यांचे कान दुखू लागतात. तसेच कानात शॅम्पू किंवा साबण गेल्यानेही कानात वेदना होतात. बहुतेक प्रकरणांमध्ये, लहान मुलांमध्ये कान दुखणे गंभीर नसते आणि वेळेवर उपचार केल्याने त्यांना बरे वाटते. पण लहान मुलांमध्ये कान दुखणे कमी करण्यासाठी सावधगिरीने औषधे किंवा कानातले ड्रॉप्स वापरण्याचा सल्ला दिला जातो. काही घरगुती उपाय केल्यानेही कान दुखण्यापासून आराम मिळू शकतो. 

कोल्ड कॉम्प्रेस 

रात्रीबेरात्री लहान मुलांना कानात वेदना होऊ लागल्यास अशावेळी प्रथमोपचार म्हणून कानाच्या आजूबाजूच्या भागावर बर्फ लावल्याने थोडा आराम मिळतो. पण कधीही बर्फाचे तुकडे थेट लहान मुलांच्या नाजूक त्वचेवर लावू नका. बर्फाचा खडा एखाद्या रुमालात गुंडाळा आणि वेदना होणाऱ्या भागावर हळूवारपणे लावा. बाळाच्या त्वचेवर बर्फ जास्त काळ ठेवू नये. असे केल्याने रक्ताभिसरणावर परिणाम होऊ शकतो. 

लसूण पाकळ्यांचा वापर करा

जर तुमच्या मुलाला सर्दीमुळे कानात वेदना होत असतील तर लसणाच्या काही पाकळ्या ठेचून त्या ऑलिव्ह ऑईल किंवा तिळाच्या तेलात गरम करा. तेल थोडे कोमट झाल्यावर दुखणाऱ्या भागावर लावा. यामुळे बाळाला वेदनांपासून थोडा आराम मिळेल.

ADVERTISEMENT
Home Remedies For Ear Pain In Child
Home Remedies For Ear Pain In Child

ऑलिव ऑइल 

कान दुखत असताना ऑलिव्ह ऑईलचा वापर वेदनांपासून आराम मिळविण्यासाठी खूप प्रभावी आहे. ऑलिव्ह ऑइल नैसर्गिक असल्याने मुलांसाठी सुरक्षित आहे. पण हा उपाय करण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. जेव्हा मुलाला कानात दुखत असेल तेव्हा ऑलिव्ह ऑइल हलके गरम करा आणि त्याचे काही थेंब मुलाच्या कानात टाका किंवा कोमट केलेल्या ऑलिव्ह ऑईलने जिथे वेदना होत असतील तिथे हलक्या हाताने मसाज करा. 

निलगिरी तेल 

इअरबडला किंवा स्वच्छ कापसाच्या बोळ्याला निलगिरीचे तेल लावा आणि संसर्ग झालेल्या कानात तो कापसाचा बोळा ठेवा.ही प्रक्रिया जोपर्यंत तुम्हाला आराम मिळत नाही तोपर्यंत करा.

तुळशीच्या पानांचा रस लावा

कानात तीव्र वेदना होत असल्यास तुळशीच्या पानांचा रस चोळून त्याचा रस कानात टाकता येतो. तुळशीच्या पानांमध्ये अँटीबैक्टीरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात जे संक्रमण आणि बॅक्टेरिया नष्ट करतात आणि वेदनांपासून आराम देतात.

पण घरगुती उपायांनी मुलांच्या वेदना थांबल्या नाहीत तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

ADVERTISEMENT

Photo Credit – istockphoto

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

14 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT