नखं काय सुंदर दिसावी असे आपल्या सगळ्यांना वाटते. त्यामुळेच नखांना नेलपेंट लावण्याचे काम अनेक जण नित्यनेमाने करतात. पण सतत नेलपेंट लावल्यामुळेही नखांना काही त्रास होण्याची शक्यता असते. तुम्हालाही सतत नेलपेंट लावायला आवडत असेल, एक नेलपेंट झाल्यावर तुम्ही दुसरा आवडीचा रंग सतत लावत असाल तर थोडा ब्रेक घ्या. नखांना ब्रेक घेण्याची गरज काय? ते तर निर्जीव आहेत पण या मागेही काही कारणं आहेत. नेलपेंट लावण्यामध्ये तुम्ही किती दिवसांचा गॅप ठेवायला हवा ते आज आपण जाणून घेणार आहोत. चला करुया सुरुवात
नखांच्या रंगावरुन कळू शकतात तुमच्या आरोग्याच्या तक्रारी
नेलपेंटचे वेगवेगळे प्रकार
नेलपेंटमध्ये आता इतके नवे आणि वेगळे प्रकार मिळतात की, प्रत्येकाची क्वालिटी ही वेगवेगळी असते. नेलपेंटमध्ये मॅट, ग्लॉसी, जेलपॉलिश असे प्रकार मिळतात. प्रत्येक नेलपेंटची आपली अशी एक खासियत असते. या व्यतिरिक्तही काही प्रकार प्रचलित आहेत. या नेलपेंट लावण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे या नेलपेंट टिकण्याचा कालावधीही वेगवेगळा आहे.
नेलपेंट टिकण्याचा कालावधी वेगवेगळा
- साधारण प्रत्येक नेलपेंटचा कालावधी हा जास्तीत जास्त आठवड्याभराचा असतो.
- जर तुम्ही कोणतेही काम करत नसाल तर यामध्ये थोडासा बदल असू शकतो. काही जण नेलपेंट जराशी निघाली की, ती लगेच काढून टाकतात.
- रोजच्या नेलपेंट व्यतिरिक्त अनेकांना जेलपॉलिश हा प्रकार देखील खूप आवडतो. जास्त काळ टिकणारा जेलपॉलिश हा उत्तम पर्याय आहे. म्हणून अनेक जण जेलपॉलिश लावण्यास प्राधान्य देतात. कारण त्या अधिक काळासाठी टिकतात.
पैसै वाचवा, घरच्या घरी काढता अॅक्रेलिक नखं (How To Remove Acrylic Nails At Home)
नेलपेंटमध्ये ठेवावा इतका गॅप
नखांना नेल पॉलिश लावण्याची तुम्हाला खूपच आवड असेल तरीदेखील तुम्ही काही काळजी घेणे गरजेचे असते.
- समजा तुम्ही नखांना साधारण 5 दिवसांपूर्वी नेलपेंट लावत असाल तर ती सहाव्या दिवशी चांगल्या अॅसिटोनचा उपयोग करुन काढून टाका.
- एकदा नेलपेंट काढल्यानंतर किमान 2 दिवस तरी तुम्ही नखांना पुन्हा नेलपेंट लावू नका.
- जर तुम्ही नखांना फक्त बेस कोट लावला असेल तर त्याचा इतका त्रास होत नाही. पण जर तुम्ही गडद रंगांची नेलपेंट लावत असाल तर तुम्हाला हा ब्रेक घेणे फारच गरजेचे आहे.
- अनेकदा गडद रंग लावल्यानंतर तुमची नखं पिवळी पडतात. जर तुम्ही याकडे जास्त दुर्लक्ष केले तर नखांना आणखी त्रास होण्याची शक्यता असते.
- सतत नेलपेंट लावल्यामुळे नखांवरील इनॅमल कमी होते. त्यामुळे इनॅमल चांगले राहावे असे वाटत असेल तर नेलपेंट काढून टाकल्यानंतर तुम्ही गरम पाण्यात नखं काही वेळासाठी बुडवून ठेवा त्यावर लिंबू चोळा. कमीत कमी 2 दिवस आणि जास्तीत जास्त एक आठवडाभर तरी नवी नेलपेंट लावू नका.
आता नेलपेंट लावताना ती काढल्यानंतर पुढील नेलपेंट कधी लावावी हा गॅपही लक्षात ठेवा म्हणजे तुमची नखं नेहमीच चांगली राहतील.
नखं वाढवण्यासाठी नक्की वापरा ‘हे’ सोपे घरगुती उपाय (How to Grow Nails Faster in Marathi)
नखांसाठी उत्तम नेलपेंटच्या शोधात असाल तर तुम्ही माय ग्लॅमचे हे प्रोडक्ट नक्की ट्राय करु शकता